व्हीएस न्यूज - बाराव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता काळेवाडी येथे घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
पल्लवी उदयन मुजुमदार (वय-30, रा. पार्क स्ट्रीट, वाकड) असे आत्महत्या केलेल्या महिलाचे नाव आहे. पल्लवी या एका कंपनीत कामाला होत्या. त्यांना सहा वर्षाचा एक मुलगा आहे. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजण यांनी माहिती दिली. पल्लवी सायंकाळी इमारतीच्या 12 व्या मजल्यावर गेल्या. त्यांनी तेथून खाली उडी मारली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमणे कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.