मोरवाडी चौकात पिंपरी वाहतूक शाखेच्या वतीने कार्यवाही
मोरवाडी
2018-02-10
व्हीएस न्यूज - पिंपरी वाहतूक शाखेच्या वतीने उप पोलीस निरीक्षक एम. एच. भागवत यांच्या नेतृत्वा खाली मोरवाडी चौक येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी,चारचाकी वाहन धारकांनवर पूर्वी केलेल्या दंडात्मक कारवाईच्या वसुलीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. किमान ३५ वाहनधारांकडून १०००० रुपये चा भरणा वसूल करण्यात आला.
या प्रकारच्या कार्यवाही मुळे शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांना जरब बसून वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल .