परेड सुरु असताना चक्कर आलेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू
देहूरोड
2018-02-10
व्हीएस न्यूज - येथील आर्मी ग्राउंडवर परेड सुरु असताना एका जवानाला अचानक चक्कर आल्याने त्याला आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. जवानाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चक्कर आल्याची घटना शुक्रवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास देहूरोड येथे घडली. चंद्रकांत चोरवाजी दाभाडगे (वय39) असे मृत जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान देहूरोड येथील 787 ब्रिगेड ग्राउंडवर ए डी ब्रिगेड परेड सुरु होती. परेड अंतिम टप्प्यात असताना चंद्रकांत दाभाडगे या जवानाला अचानक चक्कर आली. मैदानात उभी असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये जवानाला उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात हालविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दाभाडगे यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.