थिसेनक्रुप इंडस्ट्रीजच्या सायकल फेरीस प्रचंड प्रतिसाद
पिंपरी चिंचवड
2018-02-09
व्हीएस न्यूज - पिंपरीतील थिसेनक्रुप इंडस्ट्रीजने प्रदूषण निर्मूलन आणि आरोग्यरक्षणाचा संदेश देण्यासाठी नुकतीच सायकल फेरी आयोजित केली होती. या फेरीत कंपनीचे कार्यकारी संचालक मलई दास, वित्तविभाग संचालक गिरीश केतकर, मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र नागेशकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र वाईंगडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार सहभागी झाले होते. 12 किलोमीटर अंतराच्या या सायकल फेरीमध्ये 480 जणांनी भाग घेतला. त्यात महिला कर्माचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. ज्या कर्मचाऱ्यांकडे सायकल नाही अशा कर्मचाऱ्यांनी हे अंतर चालून पार केले.