सांगवीत एकाच दिवशी चार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद
सांगवी
2018-02-10
तीन अल्पवनीय मुलीवर बलात्कार, एक नराधम गजाआड
व्हीएस न्यूज - लग्नाचे अमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलीवर तर एका महिलेवर बलात्कार केला आहे. शहरात एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. एका घटनेतील आरोपीला सांगवी पोलीसांनी गजाआड केले असून तीन घटनेतील आरोपीचा शोध सुरू आहे. पहिल्या घटनेत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण देखील करण्यात आली. याबाबत पीडितेच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात आरोपी हरी गोविंद राठोड विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी अजय (पूर्ण नाव समजू शकले नाही) विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने फिर्याद दिली. यामध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने नाशिक फाटा येथील नदी पात्रात व राजस्थानमधील धोलपुर येथे नेऊन बलात्कार केला. व मुलीला गर्भवती ठेवले. दोन्ही घटनांचा पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील करीत आहेत. तिसऱ्या घटनेप्रकरणी पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 17 वर्षीय अल्पवनीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार पिंपळे-सौदागर येथे घरी बलात्कार केला. याप्रकरणी गणेश मारुती म्हस्के (रा. ताडीवाला रोड, पुणे) याला पोलीसांनी औंध येथून शनिवारी अटक केली आहे. पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अल्पवनीय मुलीला आरोपीने कात्रज येथील लॉजवर नेऊन शरीर संबंध ठेवले. चौथ्या घटनेप्रकरणी एका 42 वर्षीय महिलेने संतोष महाले (मूळगाव- अंतरवली, नाशिक) याच्या विरोधात बलात्कार व फसवणुकीची फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वारंवार फिर्यादी यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच जमीन खरेदी करण्याच्या बहाण्याने सहा लाख रुपये, 50 हजार रुपये रोख व एक मोबाईल फोन अशी एकूण 6 लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तपास सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. शिंदे करीत आहेत. दरम्यान, एकाच दिवशी बलात्कार सारख्या घटनेप्रकरणी चार गुन्हे दाखल झाल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. एका घटनेतील आरोपीला गजाआड करण्यात पोलीसांना यश आले आहे. एक आरोपी राजस्थान दुसरा कर्नाटक येथे पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. तर तिसरा आरोपी शहरात असल्याची माहिती मिळाली आहे. तिन्ही आरोपींना लवकरात-लवकर अटक केली जाईल, असे सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी सांगितले.