Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे साईबाबा मंदिर शिरगाव येथे स्वच्छता अभियान

व्हीएस न्यूज - मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने तीर्थक्षेत्र शिरगाव श्री साईबाबा मंदिर प्रतीशिर्डी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्येष्ठांचा मोठा सहभाग, हे या अभियानाचे वैशिष्ट्य होते.
या अभियानाची सुरुवात शारदाश्रम या आश्रमातील 150 बालकांना शैक्षणिक साहित्य (वही, पेन, कंपास, पेन्सिल, रंगपेटी), तसेच स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने स्वच्छताविषयक (हॅडवॉश, साबण, नॅपकीन) साहित्याचे वाटप करण्यात आले. शिरगाव मंदिर येथे शिरगाव साईबाबा मंदिर मार्गातील रस्ते, दर्शनरांग, वाहनतळ, मंदिराबाहेरचा परिसर, भोजनालया समोरील परिसर, गायींचा गोठा परिसर आदी भागाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी समाजप्रबोधनकार शारदा मुंडे, मराठवाडा जनविकास संघ संचलीत मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अरुण पवार, मराठवाडा जनविकास संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, हरिभाऊ घायाळ, ज्ञानेश्वर खोसे, बाळासाहेब साळुंखे, भीमाशंकर भोसले, आण्णा जोगदंड, सुनील भोसले, साहेबराव धुमाळ, युवराज भोसले, विजय वडमारे, आदिती निकम, दिनेश वाकचौरे, शेषेराव नांगरे, प्रताप साबळे, शिवाजी सुतार, कल्पना बोलके, श्रीनिवास पानसरे,मालती पाटील, रोहिदास पाटील, भाऊसाहेब केदार, लीलावती घोलप, चंद्रकांत चौगुले, नारायण डोळस, रेखा वळसे, रामकिसन काळे, भगवान जगदाळे, प्रकाश झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोपाळ माळेकर म्हणाले, स्वच्छतेतून विचारांची सांगड व शैक्षणिक मदतीतून आपला देश घडू शकेल. भाविकांनीही मंदिर परिसर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. प्रताप साबळे यांनी अरुण पवार यांच्या 30 वर्षाच्या कार्याच्या आठवणी जागा केल्या. ते म्हणाले, संघाचे वृक्ष संवर्धन विषयक कार्य, खेळाडूंसाठी प्रोत्साहनात्मक कार्य, समाजप्रबोधन, महापुरुषांच्या जयंतीविषयक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक संघ विषयक कार्य, स्वच्छता अभियान, वन्य प्राण्यांसंदर्भातील विशेष कार्य, दुष्काळ भागासाठी पाणी पुरवठा अशी असंख्य सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात चालू असतात. स्वच्छता अभियानामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण होते. सूत्र्संचालन गोपाळ माळेकर यांनी, तर आभार कृष्णाजी खडसे यांनी मानले.
...Read More

V. S. News
निगडीत दोघांची गळफास घेवून आत्महत्या

व्हीएस न्यूज - पत्नीशी झालेल्या भांडणातून पतीने राहत्या घरातील पंख्याला तर एका तरूणाने घराच्या छाताला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. या दोन्ही घटना निगडीतील राहुल नगर, ओटा स्कीम येथे सोमवारी उघडकीस आल्या.
पहिल्या घटनेमध्ये श्रावण गोरख कुसाळकर (वय-26, रा. राहुल नगर, ओटा स्कीम, निगडी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री श्रावण दारू पिऊन घरी आला होता. रात्री श्रावणचा पत्नी नितासोबत वाद झाला. श्रावणने दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. भांडणाची माहिती समजताच खालच्या मजल्यावर राहणारी निताची बहीणवर आली आणि तिने निताला खाली नेले. दरम्यान, रात्री श्रावणने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावणचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
दुसऱ्या घटनेत आबू दशरथ जाधव (वय 32, रा. राहुलनगर, ओटा स्कीम, निगडी), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबूने घराच्या छताच्या हुकास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
सांगवीत जुन्या भांडणातून युवकाला टोळक्याची मारहाण

व्हीएस न्यूज - जुन्या भांडणातून आठ जणाच्या टोळक्याने एका युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रहाटणीतील श्रीहरी कॉलनी समोर घडली.
निशांत समाधान धनवे (वय-19, रा. धनवेचाळ , शिवाजी चौक, पवनानगर, रहाटणी) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. भरत पालमपल्ले, राहूल सावंत, शत्रुघ्न पालमपल्ले, खंडू लोंढे, अविनाश जाधव याच्यासह त्याची तीन साथीदारांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत व आरोपी यांच्यात पुर्वी भांडणे झाली होती. त्याचाच राग धरून आरोपींनी रविवारी दुपारी साडेचार वाजता निशांतला श्रीहरी कॉलनी येथे अडवून शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉडने डोक्यात, पाठीत, हातावर मारहाण केली. निशांतला सोडविण्यासाठी आलेल्या समाधान धनवेच्या छातीत लोखंडी रॉडने व लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
भोसरीत पूर्व वैमनस्यातून टोळक्याची तरूणाला बेदम मारहाण

व्हीएस न्यूज - पूर्व वैमनस्यातून आठ जणाच्या टोळक्याने एका तरूणाला शिवीगाळ करत हाताने, लोखंडी रॉड व दगडाने जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता फुगेवाडीतील जय भारत नगर येथे घडली. याप्रकरणी तिन आरोपींना भोसरी पोलीसांनी अटक केली आहे.
युवराज चांगदेव फुगे (वय-20), सागर नाना अवसरमल (वय-20), विकास विजय दिनकर (वय-20, सर्व रा. फुगेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्याचे पाच साथीदार पसार आहेत. विनोद बाळकृष्ण स्वामी (वय-28, रा. आनंनदनगर, पिंपळे-गुरव) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा भाऊ सलोराज बाळकृष्ण स्वामी (वय-32) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद स्वामी व आरोपी यांच्यामध्ये पुर्व वैमनस्य आहे. याचा राग धरून आरोपींनी शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता जय भारत नगर येथे विनोद आला असता त्याला शिवीगाळ करत तोंडावर हाताने, लोखंडी रॉड व दगड मारून गंभीर जखमी केले. यातील तिन आरोपीना अटक करण्यात आले असून त्याचे पाच साथीदार पसार आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
मेडिकलचे शटर उचकटुन पावणे दोन लाखांची चोरी

व्हीएस न्यूज - मेडीकलचे शटर उचकटुन दुकानातील 1 लाख 83 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. ही घटणा शनिवारी रात्री 10 ते रविवारी पहाटे दरम्यान घडली. चार दिवसातील घरफोडीची ही दुसरी घटना आहे.
दुकानाचे मालक ओमप्रकाश जयसिंह पुरोहित (वय 34 रा. उत्तम टाऊन स्केप विश्रांतवाडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुरोहित यांचे शिवाजी पुतळ्या शेजारी ओम मेडिकल स्टोअर्स नावाचे औषध विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री 11 वाजता नेहमी प्रमाणे त्यांनी मेडीकल बंद करुन घरी गेले. रविवारी सकाळी ते मेडीकल उघडण्यास आले असता त्यांना मेडीकलचे शटर उचकटलेले निदर्शनास आले. आत जाऊन पाहिले असता ड्रॉंवर मधील रोख 1 लाख 82 हजार 500 रुपये 11 व 50 शे रुपये किंमतीचे फेअर अँन्ड लव्हली क्रिमचे बॉंक्स असे एकुण 1 लाख 83 हजार 500 रुपयांचा चोरट्यांनी चोरून नेली.
दरम्यान, घटना घडली त्यादिवशी काही कारणास्त व दुकानदार पुरोहित यांनी सीसीटीव्ही काढुन टाकले होते. मेडीकल शेजारी असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजवरुण आरोपींचा शोध घेतला जाईल असे पोलीसांनी सांगितले. खडकी भागात चार दिवसातील घरफोडीची ही दुसरी घटना आहे. अँम्युनिशन फॅंक्टरीतील अधिकारी विश्वजित मित्रा यांच्या अर्जुन मार्ग येथिल बंगल्यात सहा लाख रुपयांची घरफोडी केली होती. या घटनेतील आरोपी अद्याप फरार आहेत. लिस उप निरिक्षक मोहन कालगुडे अधिक तपास आहेत.
...Read More

V. S. News
अज्ञात वाहनाच्या धडकेत ठेकेदार तरूणाचा मृत्यू 

व्हीएस न्यूज - अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जाहिरात फलक लावण्याचे ठेके घेणाऱ्या तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजता दिघीतील एआयटी महाविद्यालयासमोर घडली.
श्रीकांत चरणाप्पा कांबळे (वय-24, रा. मारूती मंदिराजवळ, ताडीवाला रोड, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याचा भाऊ शिवानंद चरणाप्पा कांबळे (वय-35) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार टोके यांनी माहिती दिली. श्रीकांत हा जाहिरात फलक लावण्याचे ठेके घ्यायचा. शनिवारी दिघीत काम आटोपून रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता. एआयटी महाविद्यालयसमोर अज्ञात मोटारीन त्याच्या दुचाकीला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या श्रीकांतला तात्काळ खासगी रूग्णालयात हालविण्यात आले. परंतू, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबता मोटार चालक पसार झाला. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
... पुन्हा बस ला लागली आग ,डेपो व्यवस्थापकांचा दुर्लक्षी पणा

व्हीएस न्युज - आजरोजी नेहरू नगर डेपोतील पीएमपीएल बस नं. एम एच १२ एफ झेड ८३७६ हि बस पिंपरी गांवातून भोसरी कडे १५ प्रवाशी घेऊन जात असताना पिंपरी महापालिकेच्या समोर शॉर्टसर्किट मुळे अचानक गाडीने पेट घेतला .हाहा... म्हणता आगीने रौद्र रूप धारण केले . चालक आणि कंडक्टर यांच्या तत्परते मुळे प्रवास्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले . या वेळी कोणतीही जीवीतहानी झाली नाही. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासाच्या आत आथंग प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली आहे.
प्रत्यक्षदर्शनी पाहता नेहरूनगर डेपो व्यवस्थापक व कर्मचारी यांनी चालकाने रात्री गाडी डेपो मध्ये लावल्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी प्रवाशी वाहतूक करण्यास पटवण्या अगोदर गाडीची तपासणी करणे गरजेचे असते ,परंतु नेहरूनगर डेपो व्यवस्थापकांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहर मध्ये वारंवार अशा घटना घडताना दिसतात. पीएमपीएल वाहतूक सेवा हि अतिआवश्यक सेवा म्हणून गणली जाते तरीदेखील या कडे डेपो व्यवस्थापकांचा दुर्लक्षी पणा निदर्शनात येतो ,हि शरमेची बाब आहे. वरिष्ठांनी या बाबीचा सखोल विचार करावा .
...Read More

V. S. News
खराळवाडीत मोठा वृक्ष रस्त्यावर कोसळला ,मोठा अनर्थ टाळला

व्हीएस न्युज - खराळवाडी पिंपरी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल शेजारील आनंदी बाग सोसायटी च्या आवारात असलेला एक जीर्ण वृक्ष अचानक तुटून रस्त्यावर कोसळला.

रविवार आणि दुपारची वेळ असल्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर वाहनांची व माणसांची वर्दळ कमी असल्या मुळे मोठी जिवीत हानी होता होता टळली .

सदरील कोसळलेल्या वृक्ष्या विषयी स्थानिक नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयात वेळो वेळी तक्रार देऊन सुद्धा संबंधित अधिकारी ,कर्मचारी यांच्या दुर्लक्षपण मुळे हा प्रकार घडला असे नागरिकांकडून वर्तवले जाते.

नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले कि शेजारीच पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे ,त्या मध्ये हजारो लहान मुलं- मुली शिकत आहेत व हा रास्ता रहदारीचा असल्यामुळे नागरिकांची व वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते हा प्रकार इतर दिवशी झाला असता तर, शाळकरी मुले व नागरिकांच्या जीवावर बेतले असते.

या सर्व दुर्घटनेला वृक्ष प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत अशा कडव्या प्रतिक्रिया नागरिकांनी वर्तवल्या.

...Read More

V. S. News
जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेद - युवराज दाखले

व्हीएस न्यूज - जम्मू-काश्मीरमध्ये पाकने आतिरेक्यांच्या मदतीने लष्कराच्या तळावर हल्ला केला.पठाणकोट महामागाॕवरच्या कॕम्पबाहेर भारतीय जवानांनवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
या घटनेचा शिवसेना राहटणी काळेवाडी विभागाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला . भारतीय जानता पाटीॕने ने नारायण राणेला शिवसेनेवर टिका व मोकाटभाषन बाजी करण्यासाठी सोडण्या पेक्षा देश हितासाठी पाकिस्तानवर टिका करायच्या सुचना द्याव्यात भाजपाच्या नेत्यांनी देश हितासाठी पाकला धडा शिकवला पाहीजे निषेध बैठकीचे आयोजन शिवसेना शाखा तापकिर नगर या ठिकाणी करण्यात आले होते त्या बैठकीत युवराज दाखले यांनी खरपुच समाजार घेतला.

यावेळी शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले ,गणेश आहेर,दिपक कांबळे,निलेश भोरे ,गोरख पाटील,आशिश वाळके,रविकिरण घटकार,बाळासाहेब गायकवाड,आदी शिवसैनिक उपस्थित होते.

...Read More

V. S. News
सह्याद्रीचे मावळे शिवजयंती साजरी करणार टांझानियातील किलीमांजरो पर्वतावर   

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड उदयोगनगरीतील सह्याद्रीचे मावळे अनिल दत्तात्रय वाघ (वय 33 वर्षे), क्षितीज अनिल भावसार (वय 27 वर्षे) आणि रवि मारुती जांभूळकर (वय 30 वर्षे) हे युवक सोमवार दि. 19 फेब्रुवारीला साजरी होणारी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वात उंच माऊंट किलीमांजरो (समुद्र सपाटीपासून उंची 5895 मीटर) या पर्वतावर साजरी करणार आहेत. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशिल सुधीर दुधाणे, सुर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम होणार आहे. शिखर चढणे व उतरणे अशी एकूण सहा दिवसांची ही मोहिम आहे. यासाठी सोमवारी (दि. 12 फ्रेबुवारी) हे युवक मुंबईतून दक्षिण आफ्रिकेला प्रयान करणार आहेत. दक्षिण आफ्रिका, टांझानिया येथील सर्वात उंच किलीमांजरो या पर्वतावर शंकू, कोंबो, मवेन्झी आणि शिरा हे निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. हा पर्वत सर करण्याचे धाडस खुप कमी गिर्यारोहकांनी दाखवले आहे. सह्याद्रीचे हे मावळे शिवजयंतीच्या दिवशी तेथे छत्रपती शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करुन छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत. हा एक जागतिक विक्रम होणार आहे. या ऐतिहासिक क्षणांचे ड्रोन कॅमेराव्दारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मोहिम यशस्वी झाल्यानंतर हे चित्रीकरण सर्वांसाठी यु ट्युबवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. गिर्यारोहणासारख्या साहसी क्रिडा प्रकारात युवकांनी यावे यासाठी देश परदेशात अशा मोहिमांचे आयोजन आम्ही करतो. यासाठी सामाजिक संस्था, उद्योजक, कंपन्या व दानशूर व्यक्तींनी मदत करावी. असे आवाहन सुशिल दुधाणे यांनी केले.


या मोहिमेसाठी राहण्याची व वैद्यकीय सुविधा बेंगलोर माऊंटेनिंग क्लबच्या एजन्सी मार्फत होणार आहे. अनिल वाघ हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अग्निशामक दलात सेवेत आहे. त्याने आतापर्यंत हिमालयातील अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. तसेच ‘लिंगाणा’(1000 फूट उंच) अवघ्या 22 मिनिटात चढून 23 मिनिटात उतरण्याचा विक्रम त्याने केला आहे. लिंगाणावर चढण्यासाठी दोरीचा वापर करावा लागतो मात्र वाघ याने कोणत्याही साधनाचा वापर न करता अनवाणी पायाने ही मोहिम यशस्वी केली. तसेच वजीर, वानरलिंगी सुळका, तैलबैला अशा अवघड मोहिमा त्यांनी यशस्वी केल्या आहेत. क्षितीज भावसार हा मुंबईत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करतात. अनेक शॉर्टफिल्म, सिरीयल व जाहीराती त्यांनी चित्रीत केल्या आहेत. प्रसिध्द हरिचंद्र गड, कळसूबाई शिखर, अलंगमदन या गडांवर त्याने यशस्वी चढाई व ड्रोन कॅमेराव्दारे चित्रीकरण केले आहे. रवि जांभूळकर चिखलीतील शेतकरी कुटूंबातील तरुण पहिल्यांदाच गिर्यारोहणातील परदेशी मोहिमेत सहभागी होत आहे. व्यवसायाने बांधकामी व्यवसायीक असून तरी दर रविवारी गडकिल्यांवर चढाई करणे त्याचा छंद आहे. तैलबैला, लिंगाणा, हरिचंद्र, तारामती, कळसूबाई शिखरांसह त्याने आतापर्यंत 80हून जास्त गडकिल्यांवर यशस्वी चढाई केली आहे.

जगातील सात उंच शिखरांपैकी (Seven summit ) चौथ्याक्रमांकाचे शिखर किलीमांजरोसह माऊंट एव्हरेट (समुद्र सपाटीपासून उंची 8,848 मीटर), ॲकॉनकागुआ (6961 मीटर), देनाली (6194 मीटर), माऊंट इलब्रस (5642 मीटर), माऊंट ब्लान्स (4810 मीटर) ही सर्व शिखरे आगामी काळात सात मावळ्यांना बरोबर घेऊन पादाक्रांत करु, व तेथे छत्रपतींच्या पुतळ्याचा अभिषेक करुन अभिवादन करण्याचा मनोदय अनिल वाघ यांनी पिंपरी (पुणे), येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
...Read More

V. S. News
बेकायदेशीर ताडीच्या बुथ्यावर पोलिसांचा छापा

व्हीएस न्यूज - तळेगाव स्टेशन चौकामध्ये बेकायदेशीर रीतीने चालविण्यात येणाऱ्या ताडीच्या बुथ्यावर तळेगाव पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालासह एका इसमाला अटक केली त्याच्याकडून सुमारे 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
उमाकांत जाधव (रा . तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्टेशन चौकातील एका चाळीमध्ये हा अवैद्य व्यवसाय चालू होता. यामुळे परिसरातील नागरिक आणि महिला वर्ग त्रस्थ झाला होता काही महिलांनी याबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्याकडे तक्रार केली होती.
महिलांच्या दबावामुळे आणि शेळकेंच्या प्रयत्नामुळे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी या ताडीच्या दुकानावर धाड टाकली यामध्ये प्लास्टिकच्या करेट मधील 252 काचेच्या बाटल्या, प्लास्टिकचे बॅरेल मध्ये अंदाजे 200 लिटर ताडीसारखे उग्र वास येणारे रसायन व इतर मुद्देमाल जप्त केला याची किमत सुमारे 9 हजार रुपये पर्यंत होत आहे. या ताडीच्या बुथ्यावरील धाडीमुळे परिसरातील महिलांनी शेळके व पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
...Read More

V. S. News
कार्यालयात घुसून पिस्तुलाच्या धाकाने साडेचार लाखाचा ऐवज लुटला

व्हीएस न्यूज - कार्यालयात घुसून चाळमालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत दोघा चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल आणि 12 हजाराची रोकड असा 4 लाख 40 हजार रूपये किमतीचा ऐवज लुटला आणि शौचालयात कोंडून चोरटे पसार झाले. ही घटना वाल्हेकरवाडी येथे गुरूद्वाराजवळ शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
दिलीप धर्माजी वाल्हेकर (वय 57, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक विनायक साळूंखे यांनी याबाबत माहिती दिली. वाल्हेकर यांची शिवम कॉम्प्लेक्स येथे मोठी चाळ आहे. या चाळीत त्यांचे कार्यालय आहे. वाल्हेकर हे शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात बसले होते. एकच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधलेले दोन जण कार्यालयात आले. वाल्हेकर यांना कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि 12 हजाराची रोकड असा 4 लाख 40 हजार रूपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर त्यांना शौचालयात कोंडून बाहेरून कडी लावून चोरटे पसार झाले. वाल्हेकर यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर आजुबाजूच्या नागरिकांनी त्यांची सुटका केली. चोरटे नेमके कोणत्या वाहनातून आले, हे समजू शकले नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!