व्हीएस न्यूज - तळेगाव स्टेशन चौकामध्ये बेकायदेशीर रीतीने चालविण्यात येणाऱ्या ताडीच्या बुथ्यावर तळेगाव पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालासह एका इसमाला अटक केली त्याच्याकडून सुमारे 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. उमाकांत जाधव (रा . तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्टेशन चौकातील एका चाळीमध्ये हा अवैद्य व्यवसाय चालू होता. यामुळे परिसरातील नागरिक आणि महिला वर्ग त्रस्थ झाला होता काही महिलांनी याबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्याकडे तक्रार केली होती. महिलांच्या दबावामुळे आणि शेळकेंच्या प्रयत्नामुळे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी या ताडीच्या दुकानावर धाड टाकली यामध्ये प्लास्टिकच्या करेट मधील 252 काचेच्या बाटल्या, प्लास्टिकचे बॅरेल मध्ये अंदाजे 200 लिटर ताडीसारखे उग्र वास येणारे रसायन व इतर मुद्देमाल जप्त केला याची किमत सुमारे 9 हजार रुपये पर्यंत होत आहे. या ताडीच्या बुथ्यावरील धाडीमुळे परिसरातील महिलांनी शेळके व पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.