खराळवाडीत मोठा वृक्ष रस्त्यावर कोसळला ,मोठा अनर्थ टाळला
खराळवाडी
2018-02-11
व्हीएस न्युज - खराळवाडी पिंपरी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल शेजारील आनंदी
बाग सोसायटी च्या आवारात असलेला एक जीर्ण वृक्ष अचानक तुटून रस्त्यावर कोसळला.
रविवार आणि दुपारची वेळ असल्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर वाहनांची व माणसांची
वर्दळ कमी असल्या मुळे मोठी जिवीत हानी होता होता टळली .
सदरील कोसळलेल्या वृक्ष्या विषयी स्थानिक नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण
कार्यालयात वेळो वेळी तक्रार देऊन सुद्धा संबंधित अधिकारी ,कर्मचारी यांच्या दुर्लक्षपण मुळे हा प्रकार घडला असे
नागरिकांकडून वर्तवले जाते.
नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले कि शेजारीच पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे ,त्या मध्ये हजारो लहान मुलं- मुली शिकत
आहेत व हा रास्ता रहदारीचा असल्यामुळे
नागरिकांची व वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते हा प्रकार इतर दिवशी झाला असता
तर, शाळकरी मुले व
नागरिकांच्या जीवावर बेतले असते.
या सर्व दुर्घटनेला वृक्ष प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार
आहेत अशा कडव्या प्रतिक्रिया नागरिकांनी वर्तवल्या.