... पुन्हा बस ला लागली आग ,डेपो व्यवस्थापकांचा दुर्लक्षी पणा
पिंपरी
2018-02-12
व्हीएसन्युज - आजरोजी नेहरू नगर डेपोतील पीएमपीएल बस नं. एम एच १२ एफ झेड ८३७६ हि बस पिंपरी गांवातून भोसरी कडे १५ प्रवाशी घेऊन जात असताना पिंपरी महापालिकेच्या समोर शॉर्टसर्किट मुळे अचानक गाडीने पेट घेतला .हाहा... म्हणता आगीने रौद्र रूप धारण केले . चालक आणि कंडक्टर यांच्या तत्परते मुळे प्रवास्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले . या वेळी कोणतीही जीवीतहानी झाली नाही. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासाच्या आत आथंग प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली आहे.
प्रत्यक्षदर्शनी पाहता नेहरूनगर डेपो व्यवस्थापक व कर्मचारी यांनी चालकाने रात्री गाडी डेपो मध्ये लावल्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी प्रवाशी वाहतूक करण्यास पटवण्या अगोदर गाडीची तपासणी करणे गरजेचे असते ,परंतु नेहरूनगर डेपो व्यवस्थापकांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहर मध्ये वारंवार अशा घटना घडताना दिसतात. पीएमपीएल वाहतूक सेवा हि अतिआवश्यक सेवा म्हणून गणली जाते तरीदेखील या कडे डेपो व्यवस्थापकांचा दुर्लक्षी पणा निदर्शनात येतो ,हि शरमेची बाब आहे. वरिष्ठांनी या बाबीचा सखोल विचार करावा .