व्हीएस न्यूज - मेडीकलचे शटर उचकटुन दुकानातील 1 लाख 83 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. ही घटणा शनिवारी रात्री 10 ते रविवारी पहाटे दरम्यान घडली. चार दिवसातील घरफोडीची ही दुसरी घटना आहे.
दुकानाचे मालक ओमप्रकाश जयसिंह पुरोहित (वय 34 रा. उत्तम टाऊन स्केप विश्रांतवाडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुरोहित यांचे शिवाजी पुतळ्या शेजारी ओम मेडिकल स्टोअर्स नावाचे औषध विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री 11 वाजता नेहमी प्रमाणे त्यांनी मेडीकल बंद करुन घरी गेले. रविवारी सकाळी ते मेडीकल उघडण्यास आले असता त्यांना मेडीकलचे शटर उचकटलेले निदर्शनास आले. आत जाऊन पाहिले असता ड्रॉंवर मधील रोख 1 लाख 82 हजार 500 रुपये 11 व 50 शे रुपये किंमतीचे फेअर अँन्ड लव्हली क्रिमचे बॉंक्स असे एकुण 1 लाख 83 हजार 500 रुपयांचा चोरट्यांनी चोरून नेली. दरम्यान, घटना घडली त्यादिवशी काही कारणास्त व दुकानदार पुरोहित यांनी सीसीटीव्ही काढुन टाकले होते. मेडीकल शेजारी असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजवरुण आरोपींचा शोध घेतला जाईल असे पोलीसांनी सांगितले. खडकी भागात चार दिवसातील घरफोडीची ही दुसरी घटना आहे. अँम्युनिशन फॅंक्टरीतील अधिकारी विश्वजित मित्रा यांच्या अर्जुन मार्ग येथिल बंगल्यात सहा लाख रुपयांची घरफोडी केली होती. या घटनेतील आरोपी अद्याप फरार आहेत. लिस उप निरिक्षक मोहन कालगुडे अधिक तपास आहेत.