व्हीएस न्यूज - पत्नीशी झालेल्या भांडणातून पतीने राहत्या घरातील पंख्याला तर एका तरूणाने घराच्या छाताला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. या दोन्ही घटना निगडीतील राहुल नगर, ओटा स्कीम येथे सोमवारी उघडकीस आल्या.
पहिल्या घटनेमध्ये श्रावण गोरख कुसाळकर (वय-26, रा. राहुल नगर, ओटा स्कीम, निगडी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री श्रावण दारू पिऊन घरी आला होता. रात्री श्रावणचा पत्नी नितासोबत वाद झाला. श्रावणने दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. भांडणाची माहिती समजताच खालच्या मजल्यावर राहणारी निताची बहीणवर आली आणि तिने निताला खाली नेले. दरम्यान, रात्री श्रावणने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावणचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
दुसऱ्या घटनेत आबू दशरथ जाधव (वय 32, रा. राहुलनगर, ओटा स्कीम, निगडी), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबूने घराच्या छताच्या हुकास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002