व्हीएस न्यूज - पूर्व वैमनस्यातून आठ जणाच्या टोळक्याने एका तरूणाला शिवीगाळ करत हाताने, लोखंडी रॉड व दगडाने जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता फुगेवाडीतील जय भारत नगर येथे घडली. याप्रकरणी तिन आरोपींना भोसरी पोलीसांनी अटक केली आहे.
युवराज चांगदेव फुगे (वय-20), सागर नाना अवसरमल (वय-20), विकास विजय दिनकर (वय-20, सर्व रा. फुगेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्याचे पाच साथीदार पसार आहेत. विनोद बाळकृष्ण स्वामी (वय-28, रा. आनंनदनगर, पिंपळे-गुरव) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा भाऊ सलोराज बाळकृष्ण स्वामी (वय-32) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद स्वामी व आरोपी यांच्यामध्ये पुर्व वैमनस्य आहे. याचा राग धरून आरोपींनी शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता जय भारत नगर येथे विनोद आला असता त्याला शिवीगाळ करत तोंडावर हाताने, लोखंडी रॉड व दगड मारून गंभीर जखमी केले. यातील तिन आरोपीना अटक करण्यात आले असून त्याचे पाच साथीदार पसार आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002