Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारी टोळी गजाआड

व्हीएस न्यूज उभ्या केलेल्या वाहनाची काच फोडून रोख रकमेसह चीजवस्तु चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीला पिंपरी पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून साडे चार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

शंकर अशोक चव्हाण (वय 30, रा. खेड सटवाई, उत्तर सोलापूर), प्रकाश अशोक पवार (वय35, रा. हनमगाव, दक्षिण सोलापूर), प्रमोद विजय जाधव (वय 34, रा. शिवतीर्थ कॉलनी, थेरगाव) आणि करण मोहन सिंग (वय 25,चिंचपाडा, ऐरोली, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गेल्या आठवड्यात खराळवाडी पोस्ट ऑफीसजवळ डॉ. परेश चव्हाण यांनी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने एकूण दीड लाखांचा ऐवज चोरुन नेला. याच दिवशी डॉ. भूषण वाडेकर यांनी खराळवाडीतील केएसबी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या केलेल्या कारची काच फोडून रोख साडे पाच लाख रुपयांसह सहा लाख, 83 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

या दोन्ही गुन्ह्याचा तपास करताना, या परिसरात एक रिक्षा संशयितपणे फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. या रिक्षाच्या क्रमांकावरुन मालकाचा शोध घेतला. प्रमोद जाधव ही रिक्षा चालवत असल्याचे समजल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींकडून रोख दोन लाख 40 हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व एक दुचाकी असा एकूण साडे चार लाखांचा ऐवज जप्त केला. पिंपरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिल्यास व्यवसाय वृद्धी – संजय नारागुडे

व्हीएस न्यूज हातगाडी किंवा टपरीधारक अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यवसाय करताना स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिल्यास व्यवसाय वृद्धी होईल, असा विश्वास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अन्न विक्रेता विकास या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद केलेल्या शंभर विक्रेत्यांना परवाने व परन देण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी एस. एस. धुळे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, समिती सदस्य विजय शहापूरकर, अन्न सुरक्षा अधिकारी के. बी. जाधव, आर. जे. जेगटे, एल. एस. साळवे, आर. जी. नागवेकर, दिलीप करंजखेले आदी उपस्थित होते.

नारागुडे पुढे म्हणाले की, भविष्यात अन्न विक्रेता परवाने धारकास अन्न प्रशिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे. ग्राहक हा तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे खाण्यासाठी येत असतो. त्यांना स्वच्छ व आरोग्यदायी खाद्यपदार्थ देणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. या बाबतीत जो कायद्याचे उल्लंघन करेल त्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी शेवटी दिला.

महासंघाचे अध्यक्ष नखाते म्हणाले की, नव्या युगात नव्या संकल्पनेचे आकलन करून संत गाडगे बाबांनी घालून दिलेल्या स्वच्छतेचा आदर्श समोर ठेवून आपली गाडी किंवा स्टॉल आपल्या घरासारखी स्वच्छ ठेवली पाहिजेत. आज आपल्या समोर मॉल संस्कृतीचे मोठ्या आव्हान आहे. त्यामुळे आपली बोलीभाषा व व्यावसायिक मांडणी यात आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. अन्यथा मॉल संस्कृतीत आपले अस्तित्व धोक्‍यात येईल.

यावेळी सुमारे पाचशे खाद्य पदार्थ विक्रेते सहभागी झाले होते. सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभागाबद्दल प्रमाणपत्रे देण्यात आले. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी धुळे यांनी दृकश्राव्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन अस्मिता गायकवाड यांनी तर आभार दिलीप करंजखेले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ खंडीझोड, कासीम तांबोळी, मनोज पाटील, किरण साडेकर, प्रकाश साळवे, नितीन भराटे, ओमप्रकाश मोरया, ज्ञानेश्वर बिरादार, तुकाराम माने, मधुकर वाघ, सुरेश देंड, मनीषा राऊत, सुनंदा चिखले, सलीम हवालदार, गोपाल अहीर, पोपट सकट, वहिदा शेख, तुकाराम माने यांनी परिश्रम घेतले.

...Read More

V. S. News
नाभिक समाजाचे सलून बंद आंदोलन

व्हीएस न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार (दि. 15) रोजी पाटस (दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी नाभिक समाजाबद्दल अपशब्द बोलून अपमान केल्याच्या विरोधात मावळ तालुका नाभिक संस्थेच्या वतीने जाहीर निषेधार्थ शनिवार (दि. 18) रोजी सलून बंद ठेवून निषेध करण्यात येणार असल्याचे निवेदन शुक्रवारी (दि.17) सायंकाळी मावळ नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांना दिले. या वेळी चंद्रशेखर शिंदे, शांताराम गायकवाड, निलेश मोरे, सौरभ दळवी, विवेक गायकवाड, राजेंद्र मोरे, हर्षल शिंदे, रवींद्र राऊत, रोहिदास आंबेकर, किसान आंबेकर, ज्योतिराम गायकवाड ब बहुसंख्य नाभिक समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

...Read More

V. S. News
भोसरीतील १०० कोटींचा पूल कचऱ्यात!

व्हीएस न्युज - कोटीच्या कोटी उड्डाणे घेत तब्बल १०० कोटीच्या घरात पोहचलेला भोसरीत उड्डाणपूल आता चक्क कचऱ्यात गेल्याचे चित्र आहे. १०० कोटींच्या या पुलाबद्‌दल कित्येक रंजक स्वप्ने नागरिकांनी दाखविण्यात आली होती. पुलाखाली उद्यान, पे अँण्ड पार्क होणार, यामुळे या परिसराचा कायापालट होणार अशा बऱ्याच घोषणा झाल्या होत्या. परंतु हे सर्व काही कागदावरच राहिले असून नियोजना अभावी या पुलाखाली अक्षरशः कचराकुंडी निर्माण झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहर एकीकडे स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना भोसरीचे चित्र मात्र थोडे वेगळे दिसत आहे. गावठाणातून जाणारा भोसरीतील या उड्डाणपूलाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव आणि प्रशासकीय नाकर्तेपणामुळे या पुलाखाली प्रचंड घाणीचे साम्राज्य वाढले आहे. जिथे उद्यान होणार होते तिथे कचराकुंडी नव्हे तर कचरा डम्पिंग ग्राउंड झाले आहे. ज्या उद्यानात नागरीक आनंदाने फिरणार होते तिथे आज मोकाट जनावरांचे वास्तव्य आहे. जिथे पे अँड पार्क करणार होते, तिथे सध्या अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे
...Read More

V. S. News
अनधिकृत बांधकामाबाबत नगरसेवकाच्या मुलाला नोटीस

व्हीएस न्यूज महापालिकेचे भाजप नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य लक्ष्मण धोंडू उंडे यांच्या मुलाला दिघीतील स.नं.84/2 ब मधील अनधिकृत बांधकामाबाबत दीपक लक्ष्मण उंडे यांचे नावे कलम 53 अन्वये पालिकेने नोटीस बजाविली आहे.

पिंपरी महापालिका हद्दीतील मौजे दिघी येथील स.नं. 84/2 ब मधील नगरसेवक लक्ष्मण धोंडू उंडे यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत पालिका निवडणूक विभागाने अहवाल मागितला आहे. तसेच संबंधित नगरसेवक उंडे यांच्या विरोधात तक्रार करुन चौकशीची मागणीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने हे बांधकाम अनधिकृत असल्याने दीपक लक्ष्मण उंडे यांचे नावे कलम 53 अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहे. याबाबतचा पुढील कार्यवाहीसाठी अहवाल निवडणूक विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे.

...Read More

V. S. News
‘नीम’च्या माध्यमातून कामगार उध्वस्त करण्याचे सरकारचे धोरण !

व्हीएस न्यूज - लोककल्याणकारी योजनेवरील खर्च कमी करुन परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कामगार कायदे बदलण्याचा घाट घालत रोजगार निर्मितीच्या नावाखाली नॅशनल एम्प्लॉयमेंट इन्हान्समेंट स्कीम (नीम) सरकार लादू पाहत आहे. त्यामुळे जुने कंत्राटी व कायम कामगार उध्वस्त होणार असल्याची भीती कॉम्रेड भालचंद्र कानगो यांनी आकुर्डी येथे व्यक्‍त केली.

ग्रीव्हज कॉटन ऍण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियनची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आकुर्डीतील श्रमशक्ती भवनामध्ये पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानाहून कॉम्रेड कानगो बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी युनियनच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. सभेमध्ये 31 डिसेंबर 2016 पर्यंतचा आर्थिक वर्षाचा ताळेबंद व अहवाल सादर करण्यात आला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली.

कॉम्रेड कानगो म्हणाले की, मोदी सरकार कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल करु पाहत आहे. याचा परिणाम कामगार वर्गावर जाणवत आहे. नीमच्या नावाखाली जुन्या कंत्राटी व कायम कामगारांना पर्याय म्हणून स्वस्तात मनुष्यबळ मिळवून देण्याचा मार्ग भांडवलदारांसाठी सरकारने खुला करुन दिला आहे. यामुळे कामगारांना तात्पुरता रोजगार मिळेल. मात्र, कायमस्वरुपी नोकरीला त्यांना मुकावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून अल्प वेतन मिळणार असल्याने त्यात उदारनिर्वाह देखील अशक्‍य होणार आहे. एकीकडे कामगार वर्गात अस्वस्थता असताना दुसरीकडे सरकारने नोट बंदी केली. या निर्णयाला एक वर्ष झाले. परंतु, देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. जुन्या व पारंपारिक व्यवसायावर नोट बंदीचा मोठा परिणाम झाला आहे. काळा पैसा मिळाला नाहीच उलट सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

जीएसटी विधेयक लादल्याने महागाई, बेरोजगारी आणि विषमता वाढत चालली आहे. वेळोवेळी कर्जमाफी व शेतमालाला योग्य हमी भावाचे गाजर दाखवून तसेच व्यापार नियोजनाच्या अभावामुळे सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचा आरोप कॉम्रेड कानगो यांनी केला. कामगार संघटनांचे मूलभूत हक्‍क व मागण्यांकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करुन सरकार परदेशी गुंतवणूक देशात आणून कामगारांना त्यांचे गुलाम करु पाहत आहे. खोट्‌या जाहिराती करुन सरकार प्रसार माध्यमे विकत घेवू पाहत आहे. मोदी सरकार पुन्हा निवडून न येण्याची काळजी कामगार वर्गाने घ्यावी ही येत्या काळाची व देशाची गरज असल्याचे आवाहन कानगो यांनी केले. कामगार नेते एम. बी. रोहम, एस. डी. गोडसे, टी. ए. खराडे यांनी सभेत मार्गदर्शऩ केले. प्रास्ताविक व्ही. व्ही. कदम यांनी केले. एस. जी. सुळके, एन. आर. आकोटकर, एम. आर. कुंभार, ए. एम. रोहम, यु. टी. धर्मगुत्ते, आर. एल. घाडगे, एस. बी. चौधर यांनी संयोजन केले.

संघटनेची कार्यकारिणी जाहीर

सभेमध्ये ग्रीव्हज कॉटन ऍण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी भालचंद्र कानगो, उपाध्यक्षपदी एस. डी. गोडसे, आर. एम. डेमसे, एस. जी. सुळके, सरचिटणीसपदी एम. बी. रोहम, सहसरचिटणीपदी व्ही. व्ही. कदम,सचिवपदी टी. ए. खराडे, डी. पी. गायधनी, एस. बी. चौधर, खजिनदारपदी एम. आर. कुंभार, सहखजिनदारपदी के. एम. भांगरे, सदस्यपदी एन. आर. आकोटकर, ए. एम. गायकवाड, एस. व्ही. गोडसे, पी. आर. चौधरी, डी. एम. देवकाते, एस. आर. माने, टी. एन. गाडे, आर. बी. शिरसाठ, बी. बी. मांडे, आर. के. सावंडे, शिवा शेट्टी तसेच सभासदपदी ए. एस. कदम, के. एस वालकर, एल. एस. मारु, आर. एम. लोंढे, ए. एम. रोहम यांची निवड करण्यात आली.

...Read More

V. S. News
भूखंडाचा चालू बाजारभाव आणि अवैध बांधकाम नियमितीकरण दंड आकारणार

मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची माहिती

व्हीएस न्यूज - भूखंडाचा चालू बाजारभाव आणि अवैध बांधकाम नियमितीकरण दंड आकारून पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) हद्दीतील बांधकामे नियमित केली जाणार आहे. त्यासाठी आकुर्डीतील पीसीएनटीडीए कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. शुक्रवारपासून नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. संपादित क्षेत्रावरील बांधकामे नियमितीकरणासाठी भूखंडाची किंमतही बांधकामधारकाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सतीशकुमार खडके म्हणाले, महापालिका क्षेत्र आणि पीसीएनटीडीए क्षेत्रातील बांधकामे हा वेगवेगळा विषय आहे. पीसीएनटीडीएने संपादित केलेल्या जागांवर झालेली बांधकामे नियमितीकरण सरकारी धोरणानुसारच केले जाणार आहे. त्यासाठी अवैध आणि अतिक्रमित बांधकाम अशी वर्गवारी करण्यात आली आहे. पीसीएनटीडीए कार्यालयात या कामी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी नागरिकांना अर्ज जमा करता येणार असून त्यासाठी प्रति अर्ज दोनशे रूपये शुल्क आकारले जाणार आहे. नामिकासुचीतील वास्तुविशारदांमार्फत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. 31 डिसेंबर 2015 पर्यंतचीच बांधकामे नियमित केली जाणार आहे.

अर्जासमवेत भूखंड भोगवट्याबाबतचा कायदेशीर पुरावा, जसे भाडेपट्टा किंवा सातबारा किंवा इंडेक्‍ट टू, रजिस्टर्ड खरेदी खत, नोटरी केलेले खरदी खत किंवा कायदेशीर पुरावा आवश्‍यक आहे. 31 डिसेंबर 2015 पूर्वी महापालिकेकडे टॅक्‍स भरलेले पुरावे, कर भरल्याची पावती, कर मागणीपत्र. बांधकामाचे खरेदीखत, अभिलेख पुरावा, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, विजेचे बील यासारखे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. नियमितीकरणाबाबतचे हमीपत्र, सिटी सव्रहे विभागाकडील मोजणी आणि मोजणी शुल्क, अधिकमुल्य, विकास प्रशमन शुल्क भरण्यासंदर्भात संमतीचे हमीपत्र, बांधकामाचे स्थळदर्शक नकाशे चतु:सीमांसह चार प्रति देणे आवश्‍यक आहे. तसेच स्ट्रक्‍चरल ऑडीटचे प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक आहे. एकापेक्षा अधिक सहधारक असल्यास त्या भूखंडावरील सहधारकांचे एकत्रित अर्ज आणि हमीपत्र देता येणार आहे.

असा असेल रहिवास क्षेत्रासाठी दंड

रहिवास क्षेत्रासाठी चालू बाजारभावाप्रमाणे जागेची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्याचबरोबर विकास शुल्कही आकारण्यात येणार आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ गुणिले जमीनीचे बाजारमुल्य तक्‍यातील दर, गुणीले अर्धा टक्का, बांधकामाचे क्षेत्रफळ, जमीनीचे बाजारमुल्य तक्‍यातील दर गुणीले दोन टक्के असे विकास शुल्क तसेच इतकेच पायाभूत सुविधा शुल्क, तसेच प्रशमन शुल्क हे विकास शुल्काच्या दुप्पट असणार आहे.

वाणिज्य वापरासाठी दुप्पट दर

रहिवास वापर आणि वाणिज्य वापरासाठी वेगवेगळे दर असणार आहेत. रहिवासासह वाणिज्य वापरासाठी रहिवास दराच्या दीडपट आणि वाणिज्य वापरासाठी दुप्पट दर लागू असेल. वाणिज्य वापरासाठी रेडीरेकनरच्या दुप्पट दर आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर विकास शुल्क, पायाभूत सुविधा शुल्क तसेच प्रशमन शुल्क भरावे लागणार आहे. पीसीएनटीडीए परिसरातील बांधकामांसाठी एक चटई निर्देशांक संमत आहे. याशिवाय बाल्कनी, पॅसेज, टेरेस, जिना या करीता अधिमूल्य (प्रिमीयम) भरावा लागणार आहे. वाढीव मजले नियमितीकरणासाठी जादा दर भरावा लागेल.

...Read More

V. S. News
कुदळवाडीतील उड्डाणपुलाची वीज खंडीत

8 हजार 125 ग्राहकांवर कारवाई

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात थकबाकीदार असलेल्या 8 हजार 125 जणांची वीज महावितरणने तोडली आहे. अडीच लाखांचे वीज बिल थकवल्याबद्दल वीज पुरवठा खंडीत केल्याने कुदळवाडी चौकातील उड्डाणपूल अंधारात सापडला आहे.

महावितरणच्या पुणे परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी शून्य थकबाकी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुणे परिमंडळामध्ये सुमारे 174 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी असून, ही मोहीम 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअतंर्गत करवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, वीज ग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे, हे न पाहता वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक अशा 8 हजार 125 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 8 कोटी 8 लाख रुपयांची थकबाकी या ग्राहकांमध्ये होते. यामध्ये 900 थकबाकीदारांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडी करण्यात आला आहे. भोसरी विभागांतर्गत 3 कोटी 68 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी 2 हजार 966, पिंपरी विभागांतर्गत 4 कोटी 40 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी 5 हजार 159 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कुदळवाडीतील उड्डाणपुलाचा समावेश आहे. सात महिन्यांचे तब्बल अडीच लाखांचे बील थकल्याने पुलाचा वीज पुरवठा महावितरणने खंडीत केला आहे.

पथदिव्याअभावी रात्रीच्या वेळी उड्डाणपुलावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार पुलाला तीन पूल जोडण्यात आले आहेत. त्यामुळे कुदळवाडी- चिखली, निगडी, पिंपरी व भोसरी दिशेला पुलावरुन जाणाऱ्या मार्गावर अंधार पसरलेला असतो. तसेच पुलाखालूनही चारही दिशेला जाणारा रस्ता काळोखात बुडत आहे. भोसरी – चिखली, तळवडे, चाकण या औद्योगिक पट्टयाबरोबरच जवळच असलेल्या देहू – आळंदी या धार्मिक स्थळांकडे जाणारे भाविक मोठ्या संख्येने या पुलाचा वापर करतात. कार्तिकी एकादशीमुळे या उड्डाणपुलावरुन मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती. मात्र, रात्रीच्या वेळी गैरसोईचा सामना वारकरी तसेच भाविकांना करावा लागला, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वीज बिल थकल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर वीज बिल मिळालेच नसल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्याशी संपर्क साधला असता कुदळवाडी उड्डाणपुलाचा वीज पुरवठा खंडीत केल्याबद्दल आपल्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगत हात वर केले.

थकबाकी भरा, कारवाई टाळा

शून्य थकबाकी मोहिमेमध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बील भरणा केद्रांसह घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरण www.mahadiscom.in ही वेबसाइट; तसेच मोबाइल ऍपचा पर्याय उपलब्ध असून ग्राहकांनी थकबाकी भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

...Read More

V. S. News
थेरगावात कारच्या धडकेने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

व्हीएस न्यूज - राहत्या घराजवळ पार्किंगमध्ये बसलेल्या एका 80 वर्षाच्या महिलेचा कारच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चंद्र सावित्री पार्क, एफ/7, गणेशनगर, थेरगाव येथे घडली.

जामनाबाई बारीकराव घोडके(वय 80, रा. गणेशनगर, थेरगाव)या प्रकरणी शिवाजी घोडके (वय 20, रा.गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वाकड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपक विष्णु गुजर असे आरोपीचे नाव आहे. जामनाबाई दुपारच्या वेळी घराजवळील पार्किंगमध्ये बसल्या असता, दिपक गुजर यांनी निष्काळजीपणे कार पाठीमागे घेत त्यांच्या अंगारवर घातली. या अपघातात जखमी होऊन जामनाबाई यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.एल.जाधव करत आहेत.

...Read More

V. S. News
केएसबी चौकातील ग्रेडसेपरेटरला पाटील यांचे नाव द्या !

व्हीएस न्यूज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने के. एस. बी चौकात बांधण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटला माथाडी कामगारांचे दैवत कै. अण्णासाहेब पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे.

याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची ओळख औद्योगिकनगरी अशी आहे. शहरात विविध क्षेत्रात काम करणा-या कामगारांसोबत माथाडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊनच पालिकेने माथाडी कामगारांचे आराध्य दैवत आमदार कै. आण्णासाहेब पाटील यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. के.एस.बी. चौकाची ओळख अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा चौक अशी निर्माण झाली आहे.

काबाडकष्टाने आणि अंगमेहनतीने जीवन जगणा-या राज्यातील लाखो माथाडी कामगारांच्या जीवनास स्थिरता व स्थैर्य कै. अण्णासाहेब पाटील यांनी मिळवून दिले. कष्टक-यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. गोरगरीब कष्टकरी माथाडी, मापाडी व हमाल अशा कामगारांसाठी त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे. माथाडी कामगारांना एकत्र आणून त्यांच्या आर्थिक सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल करणारा माथाडी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी मोलाचे योगदान आहे. माथाडी, मापाडी व कष्टकरी कामगार यांना ख-या अर्थाने न्याय देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने बनविण्यात येणा-या ग्रेडसेपरेटरला माथाडीचे आराध्य दैवत कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

शिष्टमंडळात कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष किसान बावकर, सचिव प्रवीण जाधव, खंडू गवळी, सर्जेराव कचरे, भिवाजी वाटेकर, ज्ञानोबा मुजुमले, मुरलीधर कदम, पांडुरंग कदम, राजू तापकीर, सुनील सावळे, ओमकार माने, सतीश कंटाळे, मारुती वाळुंज, बालाजी खैरे, समर्थ नाईकवडे, नागेश वनवटे, राहूल कोलटकर, पांडुरंग काळोखे उपस्थित होते.

...Read More

V. S. News
भाजप नगरसेवक कामठे यांची पोलिसांसमोर शरणागती

व्हीएस न्यूज – निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या बनावट कागदपत्रांमुळे अडचणीत आलेले पिंपळे-निलख प्रभागातील भाजपचे नगरसेवक तुषार गजानन कामठे यांनी गुरूवारी सकाळी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. बनावट कागदपत्र दाखल करून निवडणूक लढवल्याप्रकरणी त्यांच्यावर सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तुषार कामठे यांनी अटकपूर्व जामीन मिळावण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर पोलिस त्यांच्या अटकेच्या तयारीत होते. पण, आज कामठे स्वत:हून सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या निवडणुकीत १२ वी उत्तीर्ण असल्याचे खोटे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले होते. याप्रकरणी २७ ऑक्टोबरला सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून कामठे फरार होते. कधीही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर २० दिवसांनी ते स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तुषार कामठे हे पिंपळे निलख येथील प्रभाग क्रमांक २६ (ब) येथून निवडणुकीला उभे राहिले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सचिन साठे यांना मोठ्या फरकाने पराभूत करत निवडणूक जिंकली होती.

...Read More

V. S. News
महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांकडून 101 सूचना

व्हीएस न्यूज महापालिकेच्या विकास कामात नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने यंदाही नागरिकांकडून महापालिकेने सूचना मागवल्या. पालिकेच्या संकेत स्थळावर आणि क्षेत्रीय कार्यालयात 6 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांनी चांगला प्रतिसाद देवून 101 सूचना पाठवल्या आहेत. आता मुदत संपली आहे.

महापालिकेने 2007 पासून हा उपक्रम सुरू केला. क्षेत्रीय कार्यालय व वॉर्डातील कामे सुचविण्याबाबत जाहीर प्रकटनाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली. सन्‌ 2018-19 चे अंदाजपत्रक तयार करताना नागरिकांनी सुचविलेली कामे विचारात घेण्यात येणार आहेत. अ-प्रभागातून सर्वाधिक 32 आणि ग-प्रभागातून सगळ्यात कमी 1 सूचना आली आहे. क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता सूचनांची शहानिशा केल्यानंतर विकास कामांचा समावेश अर्थ संकल्पात होईल.

रस्ते, पदपथ दुरुस्ती, पथदिवे, ट्रॅफिक सिग्नल, पाणी पुरवठा, सार्वजनिक वाचनालये, सायकल मार्ग आदीबाबत नागरिकांनी सूचना दिलेल्या आहेत. 32 प्रभागांतील संपूर्ण विकासासाठी दहा लाख रुपयांपर्यंतच्या विकास कामांसाठी नागरिकांनी सूचना केल्या आहेत. सूचना अर्ज सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांनी नागरीकांना टोकन क्रमांक दिला आहे. सूचना स्विकारली किंवा नाकारली त्यांना ई-मेल, एसएमएसद्वारे कारणे देण्यात येणार आहेत. मात्र, जनजागृती अभावी कोणालाही याची माहिती नसल्यास त्यांनी त्या-त्या प्रभाग कार्यालयात 15 नोव्हेंबरपर्यत कामांचे अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!