व्हीएस न्यूज – उभ्या केलेल्या वाहनाची काच फोडून रोख रकमेसह चीजवस्तु चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीला पिंपरी पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून साडे चार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
शंकर अशोक चव्हाण (वय 30, रा. खेड सटवाई, उत्तर सोलापूर), प्रकाश अशोक पवार (वय35, रा. हनमगाव, दक्षिण सोलापूर), प्रमोद विजय जाधव (वय 34, रा. शिवतीर्थ कॉलनी, थेरगाव) आणि करण मोहन सिंग (वय 25,चिंचपाडा, ऐरोली, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गेल्या आठवड्यात खराळवाडी पोस्ट ऑफीसजवळ डॉ. परेश चव्हाण यांनी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने एकूण दीड लाखांचा ऐवज चोरुन नेला. याच दिवशी डॉ. भूषण वाडेकर यांनी खराळवाडीतील केएसबी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या केलेल्या कारची काच फोडून रोख साडे पाच लाख रुपयांसह सहा लाख, 83 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.
या दोन्ही गुन्ह्याचा तपास करताना, या परिसरात एक रिक्षा संशयितपणे फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. या रिक्षाच्या क्रमांकावरुन मालकाचा शोध घेतला. प्रमोद जाधव ही रिक्षा चालवत असल्याचे समजल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींकडून रोख दोन लाख 40 हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व एक दुचाकी असा एकूण साडे चार लाखांचा ऐवज जप्त केला. पिंपरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002