व्हीएस न्यूज – महापालिकेच्या विकास कामात नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने यंदाही नागरिकांकडून महापालिकेने सूचना मागवल्या. पालिकेच्या संकेत स्थळावर आणि क्षेत्रीय कार्यालयात 6 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांनी चांगला प्रतिसाद देवून 101 सूचना पाठवल्या आहेत. आता मुदत संपली आहे.
महापालिकेने 2007 पासून हा उपक्रम सुरू केला. क्षेत्रीय कार्यालय व वॉर्डातील कामे सुचविण्याबाबत जाहीर प्रकटनाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली. सन् 2018-19 चे अंदाजपत्रक तयार करताना नागरिकांनी सुचविलेली कामे विचारात घेण्यात येणार आहेत. अ-प्रभागातून सर्वाधिक 32 आणि ग-प्रभागातून सगळ्यात कमी 1 सूचना आली आहे. क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता सूचनांची शहानिशा केल्यानंतर विकास कामांचा समावेश अर्थ संकल्पात होईल.
रस्ते, पदपथ दुरुस्ती, पथदिवे, ट्रॅफिक सिग्नल, पाणी पुरवठा, सार्वजनिक वाचनालये, सायकल मार्ग आदीबाबत नागरिकांनी सूचना दिलेल्या आहेत. 32 प्रभागांतील संपूर्ण विकासासाठी दहा लाख रुपयांपर्यंतच्या विकास कामांसाठी नागरिकांनी सूचना केल्या आहेत. सूचना अर्ज सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांनी नागरीकांना टोकन क्रमांक दिला आहे. सूचना स्विकारली किंवा नाकारली त्यांना ई-मेल, एसएमएसद्वारे कारणे देण्यात येणार आहेत. मात्र, जनजागृती अभावी कोणालाही याची माहिती नसल्यास त्यांनी त्या-त्या प्रभाग कार्यालयात 15 नोव्हेंबरपर्यत कामांचे अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002