व्हीएस न्यूज - प्रद्युम्न हत्याकांडातील आरोपी विद्यार्थ्याला सज्ञान धरले जाणार असून त्याप्रमाणेच त्याच्यावर खटला चालणार आहे. बाल हक्क न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.
व्हीएस न्यूज - ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमार, शेतकरी आणि फळबागायतदारांना राज्य सरकारने आज भरीव मदत जाहीर केली. या वादळात नुकसान झालेल्या बहुवार्षिक फळबागांसाठी प्रतिहेक्टर 18 हजार रुपये , फळबागांसाठी साडेतेरा हजार रुपये प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टर सहा हजार आठशे रुपये मदत देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषेत केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002