Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
धर्मेंद्र सोनकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला; अटक होणार का? प्रफुल्ल कदम यांच्या ‘महाराष्ट्र दुष्काळ मुक्ती’ उपोषणाला पिंपरी-चिंचवडच्या मराठवाडा जनविकास संघाचा जाहीर पाठिंबा‘भ्रष्टाचाराची कीड’ नष्ट करण्यासाठी सक्षम कायद्याची गरज – डॉ. बाबा कांबळेघरकुलात फुलला हरित संकल्प! ‘एक व्यक्ती, एक झाड’चा संदेश देत देशी वृक्षांचे वृक्षारोपणजय हिंद स्कूलविरोधातील तक्रारी प्रलंबित; चौकशी समिती दीड वर्षानंतरही निष्क्रिय असल्याचा आरोप!अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे पदाधिकारी मच्छिंद्र चिंचोळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरीसागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी चिंचवड

दोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप

· 383 reads

दोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप

संजय पटनी यांच्या नियुक्त्यांवरून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये खळबळ; सचिन काळभोर यांचा सवाल — ‘जुन्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे काय?’

व्हिएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील संघटनात्मक नियुक्त्यांवरून पक्षांतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. एका व्यक्तीला शहर संघटनेतील दोन महत्त्वाची पदे देण्याची गरज नेमकी काय? असा सवाल भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी उपस्थित केला आहे.

Om sai interior

संजय पटनी यांची काही महिन्यांपूर्वी शहर भाजपच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांची शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याने जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

आमदारांशी निकटता असल्यानेच पदांची ‘वाट’ सोपी?

संजय पटनी हे आमदार महेश लांडगे यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याने त्यांना संघटनेतील महत्त्वाची पदे तुलनेने सहजपणे मिळत असल्याचे आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे.

“पक्षासाठी वर्षानुवर्षे रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदासाठी प्रतीक्षा करावी लागते; मात्र आमदारांच्या जवळच्या व्यक्तींना संघटनेतील महत्त्वाची पदे सहज मिळतात, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. हे पक्षाच्या संघटनात्मक न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे का?” असा सवाल काळभोर यांनी उपस्थित केला.

मार्च २०२६ मध्ये संजय पटनी यांची शहर भाजपच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२६ रोजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते पटनी यांना शहर जिल्हा सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

शहराध्यक्षांचा कलही आमदारांच्या गटाकडे?

दरम्यान, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या कार्यपद्धतीबाबतही काळभोर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शहराध्यक्षांचा कल आमदार महेश लांडगे यांच्या राजकीय गटाकडे अधिक असल्याची भावना पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शहर संघटनेतील नियुक्त्यांमध्ये सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी व्यापक चर्चा होण्याऐवजी विशिष्ट नेतृत्वाच्या जवळच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना निर्माण होत असेल, तर त्याचा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर परिणाम होऊ शकतो, असे काळभोर यांनी म्हटले आहे.

‘बापू, तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही का?’

“एका व्यक्तीला शहर कार्यकारिणीत दोन महत्त्वाची पदे दिली जात असतील, तर पक्षासाठी अनेक वर्षे अहोरात्र काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेकडे पाहायचे तरी कसे? आमच्यावर विश्वास नाही का?” असा थेट सवाल काळभोर यांनी केला आहे. पक्षासाठी आंदोलने, मोर्चे, नागरिकांच्या प्रश्नांवर पाठपुरावा आणि संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र नियुक्त्यांमध्ये संधी मिळत नसल्याची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार होणार की ‘जवळच्या’ कार्यकर्त्यांनाच संधी?

भाजपमध्ये अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते पक्षासाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च करतात. निवडणुका असोत किंवा नागरिकांचे प्रश्न, हे कार्यकर्ते सातत्याने मैदानात दिसतात. मात्र, पदांच्या नियुक्तीच्या वेळी त्यांच्याऐवजी नेतृत्वाच्या जवळच्या व्यक्तींनाच वारंवार संधी मिळत असल्याची भावना निर्माण झाली, तर ‘निष्ठेची किंमत काय?’ हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दखल घ्यावी

या संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षातील वरिष्ठांनी विचार करावा तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक पातळीवरील नियुक्त्यांबाबत व्यापक चर्चा करून निर्णय प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘एकाच व्यक्तीला दोन महत्त्वाची पदे नकोत’

शहर कार्यकारिणीत एका व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक महत्त्वाची पदे देण्याऐवजी पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या विविध कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यात संघटनात्मक विषयांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. तसेच ३० सप्टेंबरच्या वृत्तानुसार पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी आणि पक्षनिष्ठेला महत्त्व देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे एका बाजूला ‘निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी’ देण्याची भूमिका आणि दुसऱ्या बाजूला संजय पटनी यांच्या सलग दोन महत्त्वाच्या नियुक्त्या यामुळे पिंपरी-चिंचवड भाजपच्या संघटनात्मक कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

"लवकरच मी एका पदाचा राजीनामा देणार आहे."

- संजय पटनी यांची प्रतिक्रिया

Om sai interior