Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
मेघालयच्या मुख्यमंत्रिपदी कोनराड संगमा विराजमान

व्हिएस न्यूज – मेघालयच्या मुख्यमंत्रिपदी नॅशनल पीपल पार्टीचे (एनपीपी) अध्यक्ष कोनराड संगमा विराजमान झाले असून संगमा यांना मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या सोहळ्यास गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित आहेत.

३४ आमदारांनी नॅशनल पीपल पार्टीला पाठिंबा दिला असून संगमा यांनी ४ मार्च रोजी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली होती. भाजप-एनपीपी यांच्या युती सरकारमध्ये युडीपीचे ६, एनपीपीचे १९,पीडीएफचे ४, एचएसपीडीपीचे २, भाजपचे २ आणि १ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस राज्यात सर्वाधिक २१ जागा जिंकलेला पक्ष आहे. पण ३१ हा बहुमताचा आकडा पार करण्यासाठी त्यांना मित्रपक्षांना सोबत घेता न आल्यामुळे त्यांना सत्तेत सहभागी होता आले नाही.

...Read More

V. S. News
पीएनबी घोटाळा : आयसीआयसीच्या सीईओ चंदा कोच्चर यांना समन्स

व्हीएस न्यूज - पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्सला कर्ज दिल्याप्रकरणी गंभीर आर्थिक फसवणूक चौकशी विभागाने (एसएफआयओ) आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोच्चर आणि अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा यांना समन्स बजावले आहे. चंदा कोच्चर व शिखा शर्मा यांनी स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीने आज एसएफआयओसमोर हजर राहून पीएनबीच्या बनावट एलओयूना प्रतिसाद देत गीतांजली जेम्सला ५ हजार २०० कोटी रुपये कसे दिले याची माहिती द्यावी, असे समन्समध्ये म्हटले आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी आरोपी आहेत. मेहुल चोक्सीच्या कंपनीला ५ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्यांमध्ये या बँकांचाही समावेश होता. तपासाबाबत या बँकांकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. कोच्चर व शिखा शर्मा यांनी स्वत: किंवा त्यांच्या प्रतिनिधीने एसएफआयओच्या कार्यालयात हजर राहावे, असे समन्समध्ये म्हटले आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी सीबीआयने आणखी एकाला ताब्यात घेतले. गीतांजली समुहाचा उपाध्यक्ष विपूल चितालीया याला सीबीआयने ताब्यात घेतले. मुंबई विमानतळावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. तिथून त्याला वांद्रे – कुर्ला संकुलातील सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. विपूल चितालीयाचा या घोटाळ्याशी नेमका काय संबंध होता, हे अद्याप समजू शकलेले नाही.

...Read More

V. S. News
कृष्णाकुमारी बनल्या पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला सिनेटर

व्हीएस न्यूज - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थार येथील कृष्णाकुमारी कोहली यांनी नवा इतिहास रचला असून त्या पाकिस्तानच्या सिनेटवर विजय मिळविणाऱ्या पहिल्या हिंदू-दलित महिला बनल्या आहेत. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या ३९ वर्षीय कोहली या सदस्य आहेत.

कोहली अल्पसंख्यांकांच्या हक्क आणि अधिकारासाठी काम करतात. त्यांनी मुस्लिमबहुल प्रांतात मिळविलेल्या विजयाने अल्पसंख्यांकांसाठींच्या अधिकार चळवळीला बळ येणार आहे. थारमधील नगरपारकर जिल्ह्यात कोहली या राहतात. त्यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या कोहली यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्रात विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

...Read More

V. S. News
राहुल गांधी करणार २० मार्चला कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

व्हीएस न्यूज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी २० मार्च रोजी कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार असून राहुल गांधी २० आणि २१ मार्चला ते म्हैसूर आणि किनारपट्ट्यातील विविध सभा आणि बैठकांना उपस्थित राहतील, अशी माहिती पक्षाचे राज्याचे सचिव के. सी. वेनुगोपाळ यांनी दिली. काँग्रेसने १० फेब्रुवारीला प्रचाराला सुरुवात केली. गांधींनी आत्तापर्यंतच्या २ टप्प्यात ६ जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. काँग्रेसने प्रचारासाठी जनाशीर्वाद यात्रेची सुरुवात केली होती. राहुल गांधींनी या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांना भेटी दिल्या होत्या. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची समाप्ती २६ फेब्रुवारीला झाली. एप्रिल-मेमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून सध्याच्या सरकारचा कार्यकाळ २८ मे रोजी संपणार आहे. सध्या २१ राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे.

...Read More

V. S. News
तब्बल चार तास शहा-भागवत यांच्यात चर्चा

व्हीएस न्यूज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ईशान्येकडील विजयानंतर नागपुरातील संघ मुख्यालयात पक्षाची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. तब्बल साडेतीन तास भागवत-शहा यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान त्रिपुरा, नागालँडच्या निवडणुकीसोबतच आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

शहा यांची सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह भैय्याजी जोशी, सहसरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रय होसबळे आदी नेत्यांसोबत चर्चा झाली. नागपुरात ९ मार्चपासून अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात आली आहे. संघ आणि संघाशी संबंधित विविध संघटनांची यात महत्त्वपूर्ण बैठक मानली जाते. संघाची राजकीय शाखा म्हणून भाजपचे प्रतिनिधीही यात सहभागी होतात.

वर्षभर झालेल्या कामाचा आणि पुढील वर्षी करावयाच्या कामांचे नियोजन या बैठकीत केले जाते. अमित शहा यांनी त्यानुसार सरसंघचालकांकडे भाजपचे रिपोर्ट कार्ड सादर केले तसेच पुढील तीन वर्षांच्या नियोजनावरही चर्चा केली. यावेळी संघातर्फे अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वाद निर्माण होत आहे त्या नेत्यांवर अंकुश ठेवावा, अशी भूमिका मांडण्यात आली तर, भारतीय मजदूर संघातर्फे सरकारविरोधात वक्तव्य केली जात आहे विहिपनेही एल्गार केला आहे संघाने त्यांची समजूत काढावी, अशी भाजपची मागणी आहे. ईशान्येकडील राज्यात घवघवीत यश संपादन केल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.

...Read More

V. S. News
आता तासाभरातही डिलीट करता येणार ‘तो’ व्हॉट्सअ‍ॅप मेसेज

व्हीएस न्यूज व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकदा पाठवलेला मेसेज यापूर्वी डिलीट करता येत नव्हता. पण तो मेसेज अलीकडे काढून टाकता येऊ लागला होता, पण त्यासाठी सात मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. यापुढे ६८ मिनिटे म्हणजे ४०९६ सेकंदात तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरचा मेसेज डिलिट फॉर एव्हरीवनच्या मदतीने काढून टाकू शकता.

ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपच्या बिटा आवृत्ती वापरणाऱ्यांना उपलब्ध असून बिटा २.१८.६९ ही ती आवृत्ती आहे. याशिवाय आता स्टिकर्स पाठवता येणार आहे. डिलिट फॉर एव्हरीवन सेवा आता आयओएसवर दिली जाणार आहे, जी अँड्राइड बिटा आवृत्तीत आहे. डिलिट फॉर एव्हरीवन ही सुविधा फार महत्त्वाची असल्यामुळे चुकीने पाठवलेले संदेश रद्द करता येतात. ही सुविधा स्नॅपचॅट व फेसबुक मेसेंजरवर आधीच होती.

...Read More

V. S. News
विजय सुनील देवधरांच्या मेहनतीमुळेच त्रिपुरात भाजपचा

व्हीएस न्यूज शिवसेनेने त्रिपुरातील भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारे सुनील देवधर यांचे भरभरुन कौतुक केले असून आम्हाला त्रिपुरात भाजपला विजय प्राप्त करुन देणाऱ्या सुनील देवधर यांचा कौतुक आणि अभिमान असून त्रिपुरातील विजय हा वाळवंटातून केशराचे पंचवीस मण पीक काढल्यासारखे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

भाजपने गेल्या २५ वर्षांपासून डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुराच्या लाल किल्ल्यामध्ये भगवा फडकवला. महाराष्ट्रातील सुनील देवधर यांचे भाजपच्या या विजयात मोलाचे योगदान आहे. देवधर यांचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भरभरुन कौतुक करण्यात आले. काँग्रेसने ईशान्येकडील राज्यांकडे कधीच गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे ईशान्येतील सत्ता परिवर्तन महत्त्वाचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

सुनील देवधर आणि त्यांच्या टीमने अफाट मेहनत घेत त्रिपुरातील नापीक जमिनीत गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मराठी सुभेदार सुनील देवधर यांनी जे पेरले ते आता उगवले. सभा, भाषणे किंवा थापेबाजीमुळे नव्हे तर देवधर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हा विजय मिळाला, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले. भाजपचा एक तरी आमदार त्रिपुरात निवडून येईल का, अशी शंका असताना देवधर यांनी भाजपचे सरकार आणले. मेघालय व नागालँडमध्ये भाजपने विजयासाठी झोकून दिले. पण त्रिपुरात देवधर यांनी एकाकी खिंड लढवली. त्रिपुरातील भाजप विजय हा उत्तर प्रदेश व गुजरात विजयापेक्षा मोठा असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. आतापर्यंत देशाला भाजपला विजय प्राप्त करून देणारी फक्त दोनच माणसे माहीत होती. मात्र, १० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून तिसराआदमीसुद्धा आहे. ईशान्येमध्ये साजऱ्या झालेल्या त्रिपुरीपौर्णिमेचे हेच महत्त्व असून तिसऱ्याआदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे, असे सांगत शिवसेनेने देवधर यांचे कौतुक केले आहे.

...Read More

V. S. News
  एन्काऊंटरच्या भीतीने यूपीतील ५५०० आरोपींनी रद्द केला जामीन

व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची धुरा सांभाळल्यापासून पोलीस दलाची कार्यशैलीही बदलली आहे. योगी सरकारच्या पहिल्या १० महिन्यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या भीतीने ५५०० आरोपींनी आपला जामीन रद्द केला आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक ओमप्रकाश सिंह यांनी दिली.

ते म्हणाले, मार्च २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी १३३१ एन्काऊंटर केले आहेत. ३०९१ वाँटेड गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. काही गुन्हेगार अनेक वर्षांपासून फरार होते. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मागील १० महिन्यात ५४०९ गुन्हेगारांनी न्यायालयामार्फत आपला जामीन रद्द केला आहे. यावेळी होळीदरम्यान दोन गटातील वादाचे १४ प्रकरणे समोर आले. यामध्ये काही सांप्रदायिक वादांचाही समावेश आहे. हे वर्ष २०१३ पासून प्रत्येकवर्षी सरासरी ६० प्रकरणांहून कमी आहे. संपूर्ण तयारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे यावेळी होळीचा सण शांततेत साजरा करण्यात आल्याचे सिंह यांनी म्हटले. पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर मुस्लीम नेत्यांनी नमाजाची वेळ बदलली होती. त्यामुळेही कायदा व सुव्यवस्थेवर ताण आला नाही. सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून सर्व सण आणि सार्वजनिक कार्यक्रम पार पाडणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

...Read More

V. S. News
‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकात अखेर शिवाजी महाराजांचे चित्र

व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या मजकुरात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण (एनसीईआरटी) समितीने अखेर महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याबद्दल यापूर्वीच्या पुस्तकात असणाऱ्या अवर पास्ट-2’ या विभागात अत्यंत त्रोटक माहिती असल्यामुळेपाठ्यपुस्तकात बदल करण्यासाठी शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या मोगल राजांच्या माहितीसाठी सातवी इयत्तेच्या या इतिहासाच्या पुस्तकातील १५४ पृष्ठांपैकी बहुतांश पृष्ठे खर्ची घालण्यात आली आहेत, तर केवळ ६ ओळींत छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडून संपवण्यात आला, असे शिवसेनेचे म्हणणे होते.

त्याचबरोबर शिवरायांचे चित्र पुस्तकात जागा असूनही छापले नाही. याउलट बाबर आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांची छायाचित्रे मात्र पुस्तकात छापण्यात आली होती. शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला होता. राज्य सरकारला एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के बदल करण्याचा अधिकार असतो. तत्कालीन काँग्रेस सरकारने गोव्यात आंदोलन केल्यानंतर पूर्ण पाठ्यपुस्तकच बदलले होते. पण गेली ८ वर्षे केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करूनही, छत्रपतींच्या जन्म आणि कर्मभूमीतच त्यांची उपेक्षा होत आहे, असे मत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकात काही बदल एनसीआरटीकडून करण्यात आले. त्यानुसार आता अवर पास्ट-२या विभागातील तिसऱ्या आणि दहाव्या धड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या मजकुरात १०० शब्दांची भर घालण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी महाराजांचे गनिमी पद्धतीचे युद्धतंत्र, लहान वयात त्यांनी जिंकलेल्या लढाया आणि त्यांनी कशाप्रकारे भक्कम साम्राज्याची पायाभरणी केली, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. याशिवाय या धड्यांमध्ये शिवाजी महाराजांचे चित्रही छापण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात दाखल

व्हीएस न्यूज - तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी पोटदुखी आणि अस्थमाच्या त्रासामुळे भुजबळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भुजबळांना अन्ननलिका आणि आतड्यांचा आजार आहे. याआधी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मनी लॉड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ मुंबईतील आॅर्थर रोड कारागृहात कोठडीत आहे. मागील वर्षी प्रकृती बिघडल्याचे कारण देत ३५ पेक्षा जास्त दिवस छगन भुजबळ यांनी बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये उपचार घेतला होता.

...Read More

V. S. News
पतंगराव कदम यांची प्रकृती उत्तम, अफवांवर कोणाही विश्वास ठेवू नये

व्हीएस न्यूज सध्या सोशल मीडियावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रकृतीवरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून कदम साहेबांची प्रकृती उत्तम असून अफवांवर कोणाही विश्वास ठेवू नये, असे आवाहन यावर विश्वजित कदम यांनी केले आहे.

नुकतीच एक शस्त्रक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्यावर पार पडल्यामुळे पतंगराव कदम हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. पण सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीवरून उलट- सुलट पोस्ट व्हायरल होत आहेत. पतंगराव कदम यांच्या पकृतीबद्दल सर्वच स्तरातून यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक जण यामुळे चिंता व्यक्त करत आहेत. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांसह हितचिंतकांमध्ये या सर्व प्रकारामुळे अस्वस्थता पसरली आहे.

पतंगराव कदमांच्या स्वास्थ्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांमुळे कदम कुटुंबीय हैराण झाले आहे. विश्वजित कदम यांनी त्यामुळेच अखेर याप्रकरणी पतंगराव कदम यांच्या प्रकृतीबाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे. ज्यामध्ये सर्वांच्या आशीर्वादाने कदम साहेबांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे आणि लवकरच ते सर्वांच्या भेटीला येतील. त्यामुळे कोणत्याही अफवेवर कार्यकर्त्यांसह जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
साताऱ्यात राज्यातील पहिल्या अद्ययावत मेगा फूड पार्कचा शुभारंभ

व्हीएस न्यूजकेंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या शेतकऱ्यांच्या शेती मालावर आधारित मेक इन इंडियामार्फत भारत विकास ग्रुप (बीवीजी) राबवत असलेल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचीही यावेळी उपस्थिती होती.

राज्यातील पहिल्या आणि अत्याधुनिक मेगा फूड पार्कचा उद्घाटन सोहळा सातारा येथे मोठ्या दिमाखात पार पडला. हा मेगा फूड पार्क एकूण ६६ एकरमध्ये उभारण्यात आला आहे. १ लाख मेट्रिक टन अन्नधान्यावर वर्षाला प्रक्रिया या पार्कमध्ये होईल. ५००० रोजगारांच्यासंधी या माध्यमातून निर्माण होणार असून याचा लाभ २३ हजारांवर शेतकर्‍यांना मिळणार आहे. २४ तास एक्सप्रेस फीडरने या पार्कला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतीवरील संकटे दूर करण्यासाठी शेती पूरक उद्योगांना चालना द्यावी लागेल, असे सांगितले. महाराष्ट्रातील कोल्ड स्टोअरेजना अल्पदरात वीज देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सोलर फिडर योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसादेखील वीज उपलब्ध करुन देता येईल, असेही ते म्हणाले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!