व्हिएस न्यूज – मेघालयच्या मुख्यमंत्रिपदी नॅशनल पीपल पार्टीचे (एनपीपी) अध्यक्ष कोनराड संगमा विराजमान झाले असून संगमा यांना मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या सोहळ्यास गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित आहेत.
३४ आमदारांनी नॅशनल पीपल पार्टीला पाठिंबा दिला असून संगमा यांनी ४ मार्च रोजी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली होती. भाजप-एनपीपी यांच्या युती सरकारमध्ये युडीपीचे ६, एनपीपीचे १९,पीडीएफचे ४, एचएसपीडीपीचे २, भाजपचे २ आणि १ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस राज्यात सर्वाधिक २१ जागा जिंकलेला पक्ष आहे. पण ३१ हा बहुमताचा आकडा पार करण्यासाठी त्यांना मित्रपक्षांना सोबत घेता न आल्यामुळे त्यांना सत्तेत सहभागी होता आले नाही.