व्हीएस न्यूज– केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या शेतकऱ्यांच्या शेती मालावर आधारित मेक इन इंडियामार्फत भारत विकास ग्रुप (बीवीजी) राबवत असलेल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचीही यावेळी उपस्थिती होती.
राज्यातील पहिल्या आणि अत्याधुनिक मेगा फूड पार्कचा उद्घाटन सोहळा सातारा येथे मोठ्या दिमाखात पार पडला. हा मेगा फूड पार्क एकूण ६६ एकरमध्ये उभारण्यात आला आहे. १ लाख मेट्रिक टन अन्नधान्यावर वर्षाला प्रक्रिया या पार्कमध्ये होईल. ५००० रोजगारांच्यासंधी या माध्यमातून निर्माण होणार असून याचा लाभ २३ हजारांवर शेतकर्यांना मिळणार आहे. २४ तास एक्सप्रेस फीडरने या पार्कला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतीवरील संकटे दूर करण्यासाठी शेती पूरक उद्योगांना चालना द्यावी लागेल, असे सांगितले. महाराष्ट्रातील कोल्ड स्टोअरेजना अल्पदरात वीज देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सोलर फिडर योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसादेखील वीज उपलब्ध करुन देता येईल, असेही ते म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002