राहुल गांधी करणार २० मार्चला कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात
नवी दिल्ली
2018-03-06
व्हीएस न्यूज –काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी २० मार्च रोजी कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार असून राहुल गांधी २० आणि २१ मार्चला ते म्हैसूर आणि किनारपट्ट्यातील विविध सभा आणि बैठकांना उपस्थित राहतील, अशी माहिती पक्षाचे राज्याचे सचिव के. सी. वेनुगोपाळ यांनी दिली. काँग्रेसने १० फेब्रुवारीला प्रचाराला सुरुवात केली. गांधींनी आत्तापर्यंतच्या २ टप्प्यात ६ जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. काँग्रेसने प्रचारासाठी ‘जनाशीर्वाद यात्रे’ची सुरुवात केली होती. राहुल गांधींनी या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांना भेटी दिल्या होत्या. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची समाप्ती २६ फेब्रुवारीला झाली. एप्रिल-मेमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून सध्याच्या सरकारचा कार्यकाळ २८ मे रोजी संपणार आहे. सध्या २१ राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे.