व्हीएस न्यूज – सध्या सोशल मीडियावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रकृतीवरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून कदम साहेबांची प्रकृती उत्तम असून अफवांवर कोणाही विश्वास ठेवू नये, असे आवाहन यावर विश्वजित कदम यांनी केले आहे.
नुकतीच एक शस्त्रक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्यावर पार पडल्यामुळे पतंगराव कदम हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. पण सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीवरून उलट- सुलट पोस्ट व्हायरल होत आहेत. पतंगराव कदम यांच्या पकृतीबद्दल सर्वच स्तरातून यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक जण यामुळे चिंता व्यक्त करत आहेत. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांसह हितचिंतकांमध्ये या सर्व प्रकारामुळे अस्वस्थता पसरली आहे.
पतंगराव कदमांच्या स्वास्थ्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांमुळे कदम कुटुंबीय हैराण झाले आहे. विश्वजित कदम यांनी त्यामुळेच अखेर याप्रकरणी पतंगराव कदम यांच्या प्रकृतीबाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे. ज्यामध्ये सर्वांच्या आशीर्वादाने कदम साहेबांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे आणि लवकरच ते सर्वांच्या भेटीला येतील. त्यामुळे कोणत्याही अफवेवर कार्यकर्त्यांसह जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002