Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
पतसंस्थेत चोरी; चोर सीसीटीव्हीत कैद

व्हीएस न्यूज - पांजरपोळ येथील महात्मा फुले नागरी पतसंस्थेत चोरट्यांनी 15 हजार रुपयांची चोरी केली असून हे चोरटे पंतसंस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. मधुकर कुळधरण (वय-50, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी पतसंस्थेचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील 15 हजार 500 रूपयांची रोख रक्कम चोरली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून ही चित्रफीत पोलिसांनी तपासासाठी हाती घेतली आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
महाराष्ट्र कबड्डी मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी कविता आल्हाट यांची नियुक्ती

व्हीएस न्यूज - पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका कविता संदेश आल्हाट यांची महाराष्ट्र मुलींच्या (19 वर्षाखालील) कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुलनात डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे सराव शिबीर संपन्न झाले. कविता आल्हाट या कबड्डी राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच आहेत. तसेच मोशी येथील लक्ष्यवेध स्पोर्टस् फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. डॉ. डी.वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या मृदुला महाजन यांचे नेहमी आल्हाट यांना मार्गदर्शन लाभते. प्राचार्यांनी आल्हाट यांचे अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. जानेवारी 2018 मधील दिल्लीत होणा-या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आल्हाट या महाराष्ट्र कबड्डी मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी काम पाहणार आहेत.

...Read More

V. S. News
कौमी एकता पुरस्कार इसाक बागवान यांना जाहीर

रविवारी आकुर्डीत पुरस्कार वितरण सोहळा

व्हीएस न्यूज - आकुर्डीतील बीना एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा 2017 चा कौमी एकता पुरस्कार मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 7 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता बीना इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मैदानावर होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती बीना एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे सचिव रफीक आतार, मुख्याध्यापिका समीना मोमीन, खजिनदार हमजा खान, सरचिटणीस आझम खान, विश्वस्त मतलूब उस्मानी, अकमल खान, अब्दुलाह खान आदी उपस्थित होते.

या पुरस्काराचे वितरण कर्नल इर्षाद अहमद खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि प्रमुख पाहुणे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश पाटील आदी उपस्थितीत राहणार आहेत. मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना आतापर्यंत तीन राष्ट्रपती शौर्यपदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील गुन्हेगारी जगतावर प्रकाशझोत टाकणारे ‘बेमिसाल’खरे अनुभव इसाक बागवान हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांनी एकूण पस्तीस वर्षे पोलिस खात्यात सेवा केली. 1984 साली मन्या सुर्वे याचा मुंबईत एन्काऊंटर केला. 26/11 च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ला परतवून लावण्यात बागवान यांनी महत्वपुर्ण कामगिरी केली. अशी माहिती इकबाल खान यांनी दिली.

...Read More

V. S. News
ज्ञानाच्या निर्मितीवरच भारत महासत्ता होईल - लक्ष्मीकांत देशमुख

व्हीएस न्यूज - ज्ञानाच्या भांडवल निर्मितीवरच भारत देश जगात महासत्ता म्हणून उदयास येईल. संस्कृती व बौध्दिकता जपत भारताने जगाला शांततामय सहजीवनाचा आर्दश घालून दिला आहे. ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि कलेचा हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महोत्सव म्हणजे भारताच्या बहुसंस्कृतीचा सुरेख अविष्कार आहे. सर्व धर्माचे सार, विचार, मुल्य, तत्व मानवतेसाठी जगा आणि जगू द्या अशी मार्गदर्शक आहेत. असे मार्गदर्शन बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आझम कॅम्पस, कॅम्प पुणे येथे महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन मराठी ॲकेडमीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीईचे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार, अकादमीच्या संचालिका नुरजहॉ शेख, मानद सचिव लतिफ मगदूम, आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या प्राचार्या शैला बुटवाला, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग उपसचिव अर्पणा गावडे, डॉ. केतकी भोसले, प्रा. अर्चना देसाई, दिलशाद सैय्यद आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, अखिल भारतीय मराठी संमेलन देखील तीन दिवसाचे असते. मात्र, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पंधरा दिवस एवढ्या भव्य प्रमाणात पुण्यात साजरा केला जात आहे. ही अभिमानाचीबाब आहे. ज्ञान,साहित्य, संस्कृती, कलेचा हा महोत्सव प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी अक्षरांशी, पुस्तकांशी, ज्ञानाशी मैत्री करावी यातूनच आपले जीवन संपन्न होईल. मानवी जीवनात पुस्तकांचे आणि वाचनाचे स्थान अनमोल आहे. पुस्तके ज्ञानाचे वाहक आहेत. 21 वे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. बुध्दी हेच भांडवल आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांचे एकत्रित शिक्षण एकाच कॅम्पस मध्ये एवढ्या बहुसंख्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. बेगलूरु येथील आयआयएम पेक्षा ही पाचपट जास्त येथे संगणीकरण झाले आहे. हे अभिमानास्पद व गौरवास्पद आहे अशा शब्दात देशमुख यांनी एमसीई सोसायटीचा गौरव केला. ज्या भाषेतून ज्ञानाची, विज्ञानाची व रोजगारांची निर्मिती होते. ती भाषा संपन्न होते. आपली मातृ भाषा आपण गमावून बसत आहोत. शासकीय मराठी शाळा बंद पडत आहेत ही चिंतेची बाब आहे. जगात फक्त चार टक्के व्यवहार इंटरनेट वरुन इंग्रजीत होतात. भारतात याचे प्रमाण दहा टक्के आहे. गुगल ट्रान्सलेटमुळे आता आपल्या मातृभाषेतून देखील व्यवहार वाढतील असा आशावाद देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. स्वागत प्रास्ताविक नुरजहॉ शेख, प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. केतकी भोसले, सूत्रसंचालन दिलशाद सैय्यद आणि आभार प्रा. अर्चना देसाई यांनी मानले.

...Read More

V. S. News
उदयनराजेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

व्हीएस न्यूज - काल भिडे गुरुजींची साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीरपणे पाठराखण केली होती. दरम्यान, उदयनराजेंच्या याच मुलाखतीचा आधार घेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बारामती पोलिसांकडे ही मागणी बारामतीमधील हेमचंद्र मोरे या वकीलांनी एक पत्रक काढून केली आहे. या मुलाखतीमध्ये उदयनराजेंनी वारंवार जातीचा उल्लेख करुन दलितांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भिडे गुरुजींवर भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर आरोप सुरु झाल्यानंतर त्यांच्या पाठिशी उदनयराजे उभे राहिले आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. याशिवाय उदयनराजे भोसलेंनी जितेंद्र आव्हाड यांना बोलताना विचार करावा असा सल्लाही दिला.

भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीचे सूत्रधार भिडे गुरुजी असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच काही हिंदुत्त्ववादी संघटना या घटनेमागे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केला आहे.

...Read More

V. S. News
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने राजेंद्र जगताप यांचा सन्मान

व्हीएस न्यूज - रमेशदादा बागवे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा.मार्तंड साठे यांच्या हस्ते माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीचा सहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. कारगिल विजयामध्ये मोलाची कामगिरी केलेल्या मेजर संतोष कांबळे व गणेश दामोदरे या जवानाना कारगिल विजय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श पुरस्कार शिवाजीराव माने व गजानन वाव्हळ यांना देण्यात आला. तर सावळेराम भोर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आण्णासाहेब गोडसे, भरत शितोळे, शिवाजीराव काटे, रामचंद्र पाटील, शिवाजी मोरे यांना वारकरी भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, सुषमा तनपुरे, मावळ लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल, राजन नायर, वीरेंद्र गायकवाड, हभप वाघ महाराज, जेष्ठ नेते सुदामराव ढोरे, महेश भागवत, बाळासाहेब शितोळे, कर्नल स्वामी बारवे, किशोर धगाटे, बापु घेडे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यश शेषराव कसबे व मावळ लोकसभा युवक कॉंग्रेस सरचिटणीस नरेंद्र कसबे, शिवाजी शिंदे, राजेंद्र कसबे, सनी कसबे, विजय देवरे, कुंदन कसबे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष नवले यांनी केले. आभार धर्मेद्र कसबे यांनी मानले.
...Read More

V. S. News
टेरेसवर चालणारी हॉटेल्स बंद करा : मनसेची मागणी

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेली हॉटेल्स बंद करण्यात यावीत अशी मागणी मनसेचे महापालिकेतील गटनेता सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
मुंबईतील लोअर परळ भागात कमला मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या रुफटेरेस हॉटेलला 29 डिसेंबर रोजी आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर चिखले यांनी ही मागणी केली आहे. शहरात अनेक रुफ टेरेस हॉटेल्स असून काही त्यातील काही बेकायदेशीरही आहेत. याठिकाणी कमला मिल प्रमाणे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे चिखले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वाकड येथील सयाजी हॉटेल, पिंपळे सौदागर येथील स्पॉट नाईन हॉटेल आणि पिंपरीतील सेंट्रल मॉलमध्ये रुफटेरेस हॉटेल्स चालविली जात असून तेथे बार्बेक्यू देखील असतो. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. शिवाय, या हॉटेल्समध्ये दुर्घटना घडलीच तर खाली उरतण्यासाठी योग्य ती सोयही नाही असे निवेदनात म्हटले आहे.
...Read More

V. S. News
घरात घुसून महिलेला मारहाण, तीन मोबाईल हिसकावले

व्हीएस न्यूज - घरात जबरदस्तीने घुसून एकाने महिलेला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. महिलेकडील 36 हजारांचे मोबाईल हिसकावून नेले. लॅपटॉपचे नुकसान केले. ही घटना वाकड येथे सोमवारी रात्री साडेबारा वाजता सुखासा सोसायटीत घडली.
दिग्विजय सुनिल राजुरकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. महिलेकडील 36 हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेले. तसेच लॅपटॉपचेही नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. घोळवे अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
पिंपरीत तरूणावर चाकूने वार

व्हीएस न्यूज - दुकानासमोर मित्रासमवेत गप्पा मारत थांबलेल्या तरूणाला 'तु माझ्याकडे रागाने का पाहतो' असे म्हणत एकाने चाकूने वार केले. त्याच्या दोन साथीदारांनी सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना पिंपरीतील साईराज रेफ्रीजरेशन कंपनी रोडलगत सायंकाळी सहा वाजता घडली.
सचिन तापकीरे (वय-30, रा. पिंपरी) असे गंभीर जखमी झालेल्य़ा तरूणाचे नाव आहे. सतीश सुनसुना (वय-24, मिलिंदनगर, पिंपरी), करण ओव्हाळ (वय-25) इतर एका असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पिंपरीतील साईराज रेफ्रीजरेशन कंपनी रोडलगत मित्रासमवेत गप्पा मारत थांबला होता. आरोपी सतीशने सचिनला 'तु माझ्याकडे रागाने का पाहतो' असे म्हणत चाकूने वार केले. त्याच्या दोन साथीदारांनी सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर जखमी केले. फौजदार सागर पाटील अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
एटीएम कार्ड नुतणीकरणाच्या बहाण्याने महिलेला दोन लाखांचा गंडा

व्हीएस न्यूज - बॅकेतून मॅनेजर बोलत असून 'तुमचे एटीएम कार्ड नुतणीकरण' करण्याचे सांगून एका 63 वर्षीय महिलेची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार दि. 22 ते 25 डिसेंबर 2017 या कालावधीत पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर फोन करून बॅंकेतून मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. 'तुमचे एटीएम कार्ड नुतणीकरण करायचे आहे,' असे खोटे सांगितले. त्यांच्या विश्वास संपादन करून कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून त्याकार्डव्दारे 1 लाख 99 हजार 994 रूपये ऑनलाईन काढून घेवून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे अधिक तपास करत आहेत.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!