व्हीएस न्यूज - पांजरपोळ येथील महात्मा फुले नागरी पतसंस्थेत चोरट्यांनी 15 हजार रुपयांची चोरी केली असून हे चोरटे पंतसंस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. मधुकर कुळधरण (वय-50, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी पतसंस्थेचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील 15 हजार 500 रूपयांची रोख रक्कम चोरली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून ही चित्रफीत पोलिसांनी तपासासाठी हाती घेतली आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.