व्हीएस न्यूज - दुचाकी घसरुन दुभाजकावर आदळल्याने 22 वर्षीय तरुणीचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मोशीतील गावडेवस्ती येथील रोशन गार्डन समोर घडली. शीतल पवन सैद (वय 22 रा. संतनगर मोशी) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल ही आपल्या दुचाकीवरून (एमएच 14 जीएम 5412) पुण्याहुन मोशीला जात असताना अचानक गाडी घसरून दुभाजकावर आदळली. तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने शीतलचा जागीच मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.