व्हीएस न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ व डॉ.डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या डॉ.डी.वाय.पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी यांच्या संयुक्त विदयामाने घाटघर कळसुबाई हरिषचंद्रगड अभयारण्यात वनस्पती शास्त्राच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुर्मिळ औषधी वनस्पती अभ्यास करणे, त्यांचा अभ्यास करून तेथील आदिवासी बांधवांना त्याची जपवणुक कशी करावी याची माहिती देणे तसेच निसर्ग आणि जैवविविधता यांचा अभ्यास करणे हा हेतु होता. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन प्रवरा इंन्स्ट्यूटचे कुलगुरू डॉ. वाय.एम.जयराज, स्वामी रांमानंदतीर्थ मराठवाडा विदयापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विदयासागर उपस्थित होते. या परिषदेला महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठातील वनस्पतीषास्त्रातील तज्ञ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. सचिन पुणेकर, डॉ. मिलींद सरदेसाई, डॉ.डी.आर शिर्के, डॉ.महेश शिंदीकर यासारख्या वनस्पतीषास्त्रात अभ्यासक असणाऱ्या व्यक्ती होत्या. या परिषदेमध्ये सहभागी व्यक्तींना नाईट टक करणे, निसर्गाची पाहणी करणे, आपला इतिहास अभ्यासणे या गोष्टींचा अनुभव घेता आला. या परिषदेच्या आयोजनामध्ये महाविदयालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रमुख प्रा. अर्चना सुतार, ए. आर.सी.अंजली अकीवाटे, प्रा.हेमल ढगे,प्रा.मुकेष तिवारी यांचा समावेष होता. प्रास्ताविक प्रा. अंजली अकीवाटे यांनी केले. आभार प्रा.अर्चना सुतार यांनी मानले. ...Read More
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेक्टर क्रमांक येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीसाठी आज (गुरुवार) शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विद्युत विभागातील रावेत पंपीग स्टेशनमधील तातडीची आवश्यक कामांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. ...Read More
व्हीएस न्यूज - वाहनतळात पार्क केलेल्या तीन दुचाकी व एक सायकलला अज्ञाताने आग लावली. यामध्ये 88 हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री चिंचवड येथील अजंठानगरातील टीसीआय कंपनीसमोरील वाहनतळ येथे घडली. सुमन गायकवाड (40, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड, लता मोहन खरचणे यांची ड्रिम युगा, एक ऍटलस कंपनीची रेंजर सायकल तर भाऊसाहेब सुर्यभान ठोसर यांची हिरो होंडाची दुचाकी अशा तीन दुचाकीला व एका सायकल टीसीआय कंपनीसमोरील वाहनतळात लावली होती. अज्ञात आरोपीने आग लावून 88 हजार रूपयांचे नुकसान केले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार एस. एस. सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - बंगल्याच्या कंपाऊंटवरून उडी मारून चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातील रोख 25 हजार, सोन्याचे दागिने असा 6 लाखांचा ऐवज दिवसाढवळ्या चोरून नेला. ही घटना खडकीतील अर्जुन मार्ग येथे सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत घडली. विश्वजीत मित्रा (वय-39, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रा यांचा खडकीतील अर्जुन मार्ग येथे बंगला आहे. मंगळवारी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. याकालावधीत चोरट्याने बंगल्याच्या कंपाऊंटवरून उडी मारली. घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील रोख 25 हजार, सोन्याचे दागिने असा 6 लाख 1 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार एस. बी. भोसले अधिक तपास करत आहेत. ...Read More
व्हीएस न्यूज - - नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. पण जनमानसात याविषयी जनजागृती नसल्याने सहसा कुणी नेत्रदान करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे नेत्रदानाचे महत्व पटवून देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नेत्र रूग्णालयाच्या माध्यमातून गोर-गरीब रूग्णांना माफक दरात सेवा उपलब्ध करून दिल्याने ही एक सामाजिक सेवा आहे, असे मत भारत सरकारच्या कस्टम्सचे उपायुक्त भारत नवले यांनी व्यक्त केले. तसेच दृष्टीहीनांसाठी प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
इंद्रायणी नदीच्या काठी देहूगाव येथे ‘नेत्र सेवेसाठी समर्पित’ या उद्देशाने सुरू केलेल्या इंद्रायणी नेत्र रूग्णालय व फेको सेंटरचे भारत नवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी देहूनरीच्या सरपंच उषा चव्हाण, हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता काळोखे, उपसरपंच संतोष हगवणे, संत तुकाराम महाराज देहूगाव संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे-इनामदार, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला करंडे, औंध जिल्हा रूग्णालयाचे डॉ. बाळासाहेब शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे, सुनिल घोडेकर, माजी सरपंच मधुकर यादव, ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ अँड. सुग्रीव नेरे, सरकारी वकील अँड. प्रतिभा नेरे-तांबारे, डॉ. किशोर यादव, डॉ. संतोष सोमटकर, डॉ. परमेश्वर तिडके, डॉ. रोहन चव्हाण, ऍड. निर्मला यादव, डॉ. विद्या यादव, गंगा यादव, जेजेराम यादव, प्राचार्य सदाशिव कांबळे, पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण पवार, कर्तव्य फांऊडेशनचे अमित शिवले यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
”देशात लाखो लोक अंध आहेत. त्यांना जगण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या मृत्यूनंतर शरीराचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे अंध व्यक्तींना सुंदर सृष्टी पाहण्यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करावा. नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना नवसंजीवनी मिळणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे”, असे आवाहनही भारत सरकारच्या कस्टम्सचे उपायुक्त भारत नवले यांनी केले. ”अंध व्यक्तींना नवीन नेत्र बसवून त्यांना नवसंजीवनी देण्याचे तंत्रज्ञान प्रगत आहे. मात्र, नेत्रदात्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने आपण गरजूंना नवीन नेत्र बसवू शकत नाही. जर आपण मरणोत्तर नेत्रदान केले तर निश्चित गरजूंना त्याचा उपयोग होईल आणि त्यांना नवसंजीवनी देता येईल”, असेही नवले यावेळी म्हणाले. याप्रसंगी देहूच्या सरपंच उषा चव्हाण, हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता काळोखे, उपसरपंच संतोष हगवणे, रत्नमाला करंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेजेराम यादव यांनी केले. तर, अँड. निर्मला यादव यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - - रस्ता रुंदीकरणासाठी व आरक्षित जागांवर विकास प्रकल्प उभारणीसाठी नागरीकांनी सहकार्य करावे. त्यामुळे शहरातील विकास कामांना गती मिळेल आणि पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे मार्गी लागतील त्यामुळे या औद्योगिक नगरीच्या नावलौकिकात व सौंदर्यात भर पडेल असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
खराळवाडी पिंपरी येथील सदानंद तरुण मित्र मंडळाच्या नविन गणेश मंदिराचा गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ श्री सिध्द सद्गुरु शंखनाथजी महाराज व चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, माजी विरोधी नेते कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, माजी नगरसेविका निर्मला कदम, मंडळाचे अध्यक्ष अतुल दाभोळकर,उपाध्यक्ष नितीन निकम, सचिव बंन्सीशेठ बहारे, खजिनदार रविंद्र पालाडे आदींसह खराळवाडी, संभाजीनगर, बजरंगनगर, कामगारनगर, गांधीनगर परिसरातील हजारों भक्त भाविक उपस्थित होते. तत्पुर्वी श्रीच्या मुर्तीची व कलशाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जगताप म्हणाले की, पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून नेहरूनगर चौकाकडे जाणा-या या रस्त्यावर स्व. महादेव कदम यांनी मंदिर स्थापन केले होते. या गणेश मंदिराचा जिर्णोध्दार करण्यासाठी माजी विरोधी नेते कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम आणि या परिसरातील नागरीक व सावित्री अपार्टमेंटमधील सदस्यांनी सहकार्य केले. असे सहकार्य नागरीकांनी करावे, असेही आवाहन जगताप यांनी केले. यावेळी होमहवन, वास्तूशांती,वास्तुनिक्षेप पुजन आदी धार्मिक विधींसह महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थितांचे स्वागत कैलास कदम, सुत्रसंचालन अतुल दाभोळकर आणि आभार नितन निकम यांनी मानले.
व्हीएस न्यूज - - पुणे सत्र न्यायालयाने भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. मिलिंट एकबोटे गुन्हा दाखल झाल्यापासून गायब आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारीला विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. एका व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला होता. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी या जमावाला चिथावल्याचा आरोप आहे. पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी एकबोटे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.
ही घटना ज्या दिवशी झाली त्यावेळेस आपण तिथे नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. २२ जानेवारीला एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
व्हीएस न्यूज - तंत्रज्ञान हे आपल्या जिवनातील अविभाज्य घटक असले तरी तंत्रज्ञानाच्या आहारी जावू नका. असा सल्ला उदगार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संगणक व्यवस्थापन अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य डॉ अमोल गोजे यांनी दिला.
आकुर्डी येथील डॉ डी.वाय.पाटील इंस्टिट्यूट ऑफ मास्टर कंप्युटर प्लिकेशन्सच्या वतीने "इंटरनेट ऑफ थिंग्ज- टेक्नॉलॉजी ऑफ फ्युचर "या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे पर्सिस्टंट सिस्टिम कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. आर वेंकटेश्वरन हे उपस्थित होते व्यासपीठावर कॅंपस संचालक कर्नल (नि) एस के जोशी,डीवाय पाटील एमसीए इंस्टीट्यूटच्या संचालिका डॉ के निर्मला,समन्वयक डॉ कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. डॉ गोजे पुढे म्हणाले कि, दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा खूपच उपयोग होत आहे. मशीनवर अवलंबून राहुन तंत्रज्ञानाच्या आहारी जावू नका. मानवनिर्मित तंत्रज्ञानावर मानवाचे नियंत्रण हवे. यावेळी स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे वेंकटेश्वरन म्हणाले कि, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिन स्निंग, डाटा नॅलिटिक्स यांच्या संयुक्त वापरामुळे मानवी जीवन अधिक सुकर होणार आहे. यावेळी स्वयंचलित असलेल्या टेस्ला कारचे उदाहरण दिले. डॉ के निर्मला यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाचा उपयोग स्मार्ट सीटी उभारणीमध्ये मोठा उपयोग होणार असल्याचे सांगितले.
नंतरच्या सत्रात औद्योगिक प्रशिक्षक मनीष जैन, इंटेलिमेंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पानसरे, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षक अखिलेश चौसरा, काशीबाई नवले इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ परिक्षीत महाल्ले, लार्सन न्ड टूब्रो कंपनीचे सुशील कुमार,सिस्को सिस्टिमचे सल्लागार साजिद इलास्कर यांनी मार्गदर्शन केले.या परिसंवादात मुबंई, नागपूर, धुळे, जळगाव, पुणे म. प्रदेश मधून सुमारे 65 प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक व सुत्र संचालन डॉ कविता सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा. राहुल चौधरी यांनी मानले.
व्हीएस न्यूज - काळभोरनगर येथील अन्सारी वजन काटा या दुकानाला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे तीन बंब त्वरीत दाखल झाले. काही वेळात आग आटोक्यात आणली. निगडी मधील काळभोर नगर येथे अन्सारी वजन काटा हे दुकान आहे. या दुकानाला सकाळी अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तीन बंब दाखल झाले. जवानांनी आग तात्काळ आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण व झालेले नुकसान समजू शकले नाही.
व्हीएस न्यूज - हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तिर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही नऊ गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत तातडीने समाविष्ट करून घेण्याचा निर्णय आजच्या महासभेत झाला. विरोधी राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी यावेळी ही गावे समाविष्ट करण्यास विरोध दर्शविला. मात्र सत्ताधारी भाजपने हा विषय मंजूर करून घेतला. जानेवारी महिन्याची तहकूब मासिक सभा आज पार झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
महापालिका हद्दीच्या पश्चिमेकडील हिंजवडी, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही ७ गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव यापूर्वी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. त्यामुळे ही ७ गावे महापालिकेत समावेश करण्याची आवश्यकता नसल्याचे पत्र राज्याच्या नगरविकास विभागाने पिंपरी महापालिकेला पाठविले.
त्यानंतर महापालिकेने ७ एप्रिल २०१७ रोजी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून महापालिकेच्या हद्दीपासून पश्चिमेकडे असलेल्या हिंजवडी, माण, मारूंजी, गहुंजे, जांभे, नेरे आणि सांगवडे ही सात गावे तसेच उत्तरेकडे असलेले देहूगाव, विठ्ठलनगर या गावांचे देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र आणि आळंदी नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र महापालिका हद्दीत समावेश करण्याचा उचित अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार हिंजवडी, माण, जांभे, मारूंजी, नेरे, गहुंजे आणि सांगवडे तसेच देहूगाव आणि विठ्ठलनगर या नऊ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांनी ही गावे महापालिकेत समावेश करण्यास विरोध दर्शविला. पूर्वीच्या समाविष्ट झालेल्या गावांचा आजवर विकास झाला नसल्याचा सर्व सदस्यांनी सुर आवळला. सध्या शहरातील सर्व भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. स्वच्छता, आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर असताना या समाविष्ट गावांना कसा पाणी पुरवठा करणार, मुलभूत सुविधा कशा पुरवणार असा सवाल उपस्थित करत ही गावे समाविष्ट करण्याची ही योग्य वेळ नसल्याचं सांगत शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांनी लक्ष वेधले. २० वर्षापूर्वी महापालिकेत समावेश झालेल्या गावांमध्ये ज्या पद्धतीने विकास करता आला नाही, तशी अवस्था या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर होऊ नये, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002