व्हीएस न्यूज - तंत्रज्ञान हे आपल्या जिवनातील अविभाज्य घटक असले तरी तंत्रज्ञानाच्या आहारी जावू नका. असा सल्ला उदगार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संगणक व्यवस्थापन अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य डॉ अमोल गोजे यांनी दिला.
आकुर्डी येथील डॉ डी.वाय.पाटील इंस्टिट्यूट ऑफ मास्टर कंप्युटर प्लिकेशन्सच्या वतीने "इंटरनेट ऑफ थिंग्ज- टेक्नॉलॉजी ऑफ फ्युचर "या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे पर्सिस्टंट सिस्टिम कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. आर वेंकटेश्वरन हे उपस्थित होते व्यासपीठावर कॅंपस संचालक कर्नल (नि) एस के जोशी,डीवाय पाटील एमसीए इंस्टीट्यूटच्या संचालिका डॉ के निर्मला,समन्वयक डॉ कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. डॉ गोजे पुढे म्हणाले कि, दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा खूपच उपयोग होत आहे. मशीनवर अवलंबून राहुन तंत्रज्ञानाच्या आहारी जावू नका. मानवनिर्मित तंत्रज्ञानावर मानवाचे नियंत्रण हवे. यावेळी स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे वेंकटेश्वरन म्हणाले कि, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिन स्निंग, डाटा नॅलिटिक्स यांच्या संयुक्त वापरामुळे मानवी जीवन अधिक सुकर होणार आहे. यावेळी स्वयंचलित असलेल्या टेस्ला कारचे उदाहरण दिले. डॉ के निर्मला यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाचा उपयोग स्मार्ट सीटी उभारणीमध्ये मोठा उपयोग होणार असल्याचे सांगितले.
नंतरच्या सत्रात औद्योगिक प्रशिक्षक मनीष जैन, इंटेलिमेंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पानसरे, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षक अखिलेश चौसरा, काशीबाई नवले इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ परिक्षीत महाल्ले, लार्सन न्ड टूब्रो कंपनीचे सुशील कुमार,सिस्को सिस्टिमचे सल्लागार साजिद इलास्कर यांनी मार्गदर्शन केले.या परिसंवादात मुबंई, नागपूर, धुळे, जळगाव, पुणे म. प्रदेश मधून सुमारे 65 प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक व सुत्र संचालन डॉ कविता सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा. राहुल चौधरी यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002