व्हीएस न्यूज - काळभोरनगर येथील अन्सारी वजन काटा या दुकानाला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे तीन बंब त्वरीत दाखल झाले. काही वेळात आग आटोक्यात आणली. निगडी मधील काळभोर नगर येथे अन्सारी वजन काटा हे दुकान आहे. या दुकानाला सकाळी अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तीन बंब दाखल झाले. जवानांनी आग तात्काळ आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण व झालेले नुकसान समजू शकले नाही.