श्री साईबाबा देवस्थानच्या 50 वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
पिंपरी चिंचवड
2018-02-13
व्हीएस न्यूज - खडकीतील श्री साईबाबा देवस्थानच्या 50 वर्धापन दिनानिमित्त श्री साई भक्त स्नेह संमेलनाचे दि. 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत खडकीत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. काकड आरती, मंगलस्नान अभिषेक पुजा आरती, मध्यान्ह आरती, धूपारती, श्री गणेश होम, श्री साईसच्चरीत्र सामुदायिक पारायण, गुरूपाठ अभंग, भजन यासह शेवटच्या दिवशी ह.भ.प. डॉ.अजय आप्पा मार्जने महाराज यांचे काल्याचे किर्तन, श्री साई महाभंडारा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री साईबाबा देवस्थान ट्रस्टचे सुभाष कचरे, शिवा एम. शेट्टी, अरूण उत्तरकर यांनी दिली आहे.