व्हीएस न्यूज - पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे धोरण पिंपरी चिंचवड महापालिकेने अवलंबल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता कष्टकरी पंचायतीच्यावतीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
कष्टकऱ्यांचे नेता बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असून प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, शोभा शिंदे, रमेश शिंदे, गणेश आहेर, सुदाम बनसोडे, सोमनाथ कलाटे, आदी मोर्चात सहभागी होणार आहेत.
टपरी पथारी हातगाडी धारकांचे पक्क्या गाळ्यात पुनर्वसन व्हावे, शहरातील टपरी, पथारी हातगाडीधारकांचे पुन्हा सर्वेक्षण व्हावे, फेरीवाला क्षेत्रे जाहीर व्हावीत, अतिक्रमण कारवाई थांबवावी, पुनर्वसनाशिवाय कारवाई करू नये, सर्व फेरीवाल्यांना ओळखपत्र व परवाना मिळावा अशा फेरीवाल्यांच्या मागण्या आहेत असे पंचायत अध्यक्ष रमेश शिंदे यांनी सांगितले. प्रशासनाने सर्व फेरीवाल्यांचे अर्ज दाखल करून घेण्यासाठी व्यवस्था करावी म्हणून आयुक्तांना पत्र दिले असून प्रशासनाने ही व्यवस्था करावी, अशी मागणी पंचायतीचे सचिव प्रल्हाद कांबळे यांनी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002