व्हीएस न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे स्थापित झालेल्या रोटॅ्रक्ट क्लब ऑफ डीवाय पीव्हीपीच्या वतीने आर-वोल्युशन या बुध्दिमता चाचणी व व्यक्तिमत्व विकासावर आधारित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरूवारी होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर प्राथ मिक फेरीतून निवडल्या जाणाऱ्या स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. अंतिम फेरी 18 फेब्रुवारी रोजी पिंपरीत होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुरेश माळी यांनी दिली.