व्हीएस न्यूज - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाकरिता तळेगाव दाभाडे नगरपरिषद सज्ज झाली असून अखेरचा टप्पा म्हणून विविध भागातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शनिवार व रविवार सुट्टी असूनही अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याला नेमून दिलेली कामे करण्यासाठी प्रयत्न केले.
तळेगाव शहर स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेत उतरले असून शहरातील स्वच्छता आरोग्य यासाठी गेली काही जनजागृती मोहीम राबवीत आहे. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, आरोग्य सभापती अरुण भेगडे पाटील, पक्षप्रतोद सुशील सैदाणे आणि मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारीवर्ग या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. शहराच्या विविध भागातील उपहारगृहे, सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, गृहनिर्माण संस्था, रूग्णालये, व्यापारी संकुले याठिकाणी स्वछता आणि रंगरंगोटी आदी कामांसाठी स्थानिक सहकार्य घेऊन स्पर्धेची तयारी करीत आहेत. याशिवाय कचराडेपो आणि त्याठीकाणची स्वच्छता, कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी आरोग्य विभाग व त्यांचे कर्मचारी शहरभर प्रयत्नशील आहेत. जनजागृतीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, महिला बचतगटांच्या प्रभाग निहाय जागृतीसभा आदी गेले अनेक दिवस सर्व पदाधिकारी, नगरसेवक विशेष प्रयत्नशील आहेत.
शहरातील रोटरी, लायन्स क्लब आदी सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत. तळेगाव रोटरी सिटी क्लबच्यावतीने तळेगाव शहरातील शालेय विद्यार्थ्यांची रॅली रविवारी काढण्यात आली होती. रोटरीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, अध्यक्ष शशिकांत हळदे, दिपक फल्ले, संयोजक संतोष शेळके भगवान शिंदे, संतोष लोणकर, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002