स्वच्छ कारभाराची भाषा करणाऱ्यानाही मुंढे सारखे अधिकारी नकोच!
पिंपरी चिंचवड
2018-02-13
व्हीएस न्यूज - स्वच्छ व पारदर्शक कारभाराची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला तुकाराम मुंढे सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी नकोसे वाटत असल्याबाबत खेद वाटतो, असे मत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे. बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची नुकतीच नाशिक महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांनी दहा महिन्याच्या काळात काही चांगले तसेच कठोर निर्णय घेतले. त्यांनी पीएमपीएमएलमधील कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारत अऩेक कर्मचाऱ्यांना घरी बसविले. एकाही पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना त्यांनी जुमानले नाही. त्यामुळे पारदर्शक व स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांची बदली करण्यास भाग पाडले. पारदर्शक कारभाराचे ढोल बडविणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे 'पारदर्शक' आहेत, हेच त्यांनी मुंढे यांची बदली करून दाखविले आहे, असे मत बकाल यांनी व्यक्त केले आहे.