Breaking News

कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी | संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल | पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन |
V. S. News
देशातील ५० लाख चालकांना संघटीत करण्याचा लोड एक्सवनचा संकल्प

व्हीएस न्यूज - माल वाहतूक क्षेत्राचे देश विकासात मोठे योगदान आहे. वाहन चालक हा देशाच्या विकासाचा कणा समजला जातो. कुटुंबाचा त्याग करणारा चालक आजही दुर्लक्षित व असुरक्षित राहिला आहे. यामुळे माल वाहतूक क्षेत्राला मरगळ आलेली आहे. ही आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि चालकांच्या उन्नतीसाठी चिंचवड येथील लोड एक्सवन या संस्थेने देशभरातील ४० ते ५० लाख वाहन मालक-चालक संघटीत करून त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे.

लोडएक्सवन संस्थेने ट्रक चालक मालकांसाठी “अच्छा दाम, अच्छा काम, अच्छा नाम” ही कार्यप्रणाली विकसित केली आहे. ही कार्यप्रणाली जगात प्रथमच आपण विकसित केल्याचा दावा लोडएक्स वनचे संचालक मनोज बक्षी, आशिष राठी, परिन पारेख यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी बोलताना मनोज बक्षी म्हणाले की, आज देशात अडीच टन क्षमतेच्या वरचे ९५ लाख ट्रक आहेत. यापैकी १ ते १० ट्रक असलेले ९४ टक्के ट्रकर्स आहेत. यामध्ये ४०-५० लाख तरुण चालक आहेत. छोटे वाहतूक व्यावसायिक कर्जे काढून ट्रक खरेदी करतात, ट्रकर्स व ग्राहक यांच्यापेक्षा दलाल मोठे झाले.कमी ट्रक असलेल्या ट्रकर्सना आज व्यवसाय मिळत नाही. कारण त्यांना कोणत्या मार्गावर भाडे असेल याची माहिती नसणे, रेट, व्यवसायिक भांडवला अभावी माल वाहतूक व्यवसाय मेटाकुटीला आला.

पुढे ते म्हणाले, भविष्यात सुमारे ७० टक्के माल वाहतूकीचा व्यवसाय आम्ही मिळवून देणार असून यासाठी देशातील बड्या २८ संस्थांशी संबंध प्रस्थापित केले आहे. आम्ही दूध, मद्ययुक्त उत्पादने, वाळू, पाणी या क्षेत्रात आम्ही सेवा देणार नाही. शेतीच्या माल वाहतूकीसाठी अधिक प्राधान्य देणार आहोत. ट्रकर्सला माल वाहतूकीचे काम देणाऱ्या ३ हजार कंपन्या आमच्या संपर्कात आहेत. सर्व चालक मालकांना एकत्र जोडण्यासाठी एक कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर एक ही कार्यप्रणाली आहे.संघटनात्मक कार्य पद्धत, तंत्रज्ञानाचा उपयोग, पर्यावरणपूरक हे या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्ये आहे.

सध्या लोडएक्स वन सोबत एका महिन्यात सुमारे २७ हजार ट्रक जोडले गेलेत. यामुळे चालकांना रोजगारातून स्वावलंबी जीवन जगता येईल. जीवनमान उंचावेल, बेरोजगारी कमी होईल. चालकांना समजात एक प्रतिष्ठा मिळेल. चालकांना अत्यंल्प दरात निवास व भोजन, सुरक्षा व प्रथमोपचार, तपासणी या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी देशभरात ८४ निर्मोह शेल्टर्सची उभारणी केली जाणार आहे. या उपक्रमातून डिजिटल इंडिया,पारदर्शक कारभार, स्वच्छ भारत, स्टार्ट अप इंडिया हे धोरण साध्य होणार आहे. अधिक माहितीसाठी –www.loadxone.net या संकेतस्थळाला भेट द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
...Read More

V. S. News
पिंपरी महापालिकेच्या ५ हजार २३५ कोटींचा अर्थसंकल्प सादर

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ५ हजार २३५ कोटी २३ लाख रुपयांचा केंद्र सरकारच्या निधीसह अर्थसंकल्प स्थायी समिती सभेपुढे सादर केला. महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे यांनी हा अर्थसंकल्प स्थायी सभापती सीमा सावळे यांच्याकडे सादर केला. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे ३६ वे अंदाजपत्रक आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५८५ कोेटी ७२ लाख (शिलकेसह) रक्कम जमा होईल. तसेच २०१८-१९ या वर्षात ३५०६ कोटी ६२ लाख उत्पन्न अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या पुरस्कृत योजनांच्या निधीसह ५ हजार २३५ कोटी २३ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

अदांजपत्रकातील खास वैशिष्ट्ये

* महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या विकासकामांसाठी ७३७ कोटी ५४ लाखांची भरीव तरतूद करण्यात आलीय.
* शहरी गरिबांसाठी ९२८ कोटी ८९ लाखांची तरतूद
* जेंडर बजेट-महिलांच्या विविध योजनांसाठी ३३ कोटींची भरीव तरतूद
* महापौर विकास निधीसाठी ५ कोटींची तरतूद
* अपंग कल्याणकारी योजना २० कोटी
* मेट्रो विकास आराखड्यासाठी ५० कोटी तरतूद
* पाणी पुरवठा विशेषनिधी २३ कोटी
* पीएमपीएमएल करीता १६४ कोटी ५६ लाख तरतूद
* स्मार्ट सिटीसाठी १०० कोटी तरतूद
* अमृत योजनेसाठी ५९ कोटी ६३ लाख तरतूद
* पंतप्रधान आवास योजना ९२ कोटी ४५ लाख तरतूद
* स्वच्छ भारत मिशनसाठी २८ कोटी तरतूद
* नगररचना भू-संपादनाकरिता १४० कोटी तरतूद
...Read More

V. S. News
भक्ती शक्ती उद्यानातील राष्ट्रध्वजाची दुरूस्ती

व्हीएस न्यूज - येथील भक्ती शक्ती उद्यानात भारताचा सर्वोच्च राष्ट्रध्वज दुरस्तीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
देशातील सर्वोच्च राष्ट्रध्वज 26 जानेवारी रोजी निगडीत उभारण्यात आला आहे. या ध्वजाची देखरेख मनपाच्या सुरक्षा विभागामार्फत करण्यात येते. बुधवारी राष्ट्रध्वजाची देखरेखीच्या दृष्टीने खाली उतरवुन तपासणी केली. त्याचे धागे ओडले गेल्याचे व शिलाई उसवल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ध्वज बदलण्यात येणार आहे, व सध्या वापरात असलेला ध्वज दुरुस्तीसाठी पाठविण्यात येणार आहे.
या दरम्यान राष्ट्रध्वज स्तंभातील तारा (वायर रोपची) व
इतर यंत्रणेची तपासणी करण्यात येणार असल्याने पुढील 2 दिवसामध्ये ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अशा प्रकारच्या ध्वजांच्या बाबतीत वेळोवेळी करावी लागत असते. देशातील सर्व दिवस-रात्र फडकणाऱ्या ध्वजाबाबतीत अशाप्रकारे कार्यवाही करण्यात येत असते.
...Read More

V. S. News
तळेगाव हद्दीत ऑनलाईन 7/ 12 चे काम अंतिम टप्यात

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र शासनाच्या बहुउद्देशीय प्रकल्प इ-चावडी अंतर्गत येणारा इ फेरफार प्रकल्पासाठी हस्तलिखित सात बाऱ्यानुसार तळेगाव हद्दीतील आँनलाईन करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामधील चुका दुरुस्त करण्याची वेळ वाढून देण्यात आल्याची माहिती तलाठी एस. बी.जाधव यांनी सांगितली.
राज्यशासनाच्या या प्रकल्प अंतर्गत 7/12 उतारे आँनलाईन करण्याचे काम शासनाने हाती घेतले होते. परंतु आँनलाईन करताना काही 7/12 वर भोगवटादाराची नावे, भोगावट्यांमधील क्षेत्र, 7/12 उतारे नावआले पण आँनलाईन नाही, भोगवटादार वर्ग झाला, पिक पाहणी व अन्य काही त्रुटी आढळल्यास त्यादुरुस्त करून घेण्याची मुदत शासनाने दि. 21 फेब्रुवारी पर्यंत वाढविली आहे.
याबाबत सात बाऱ्यावर दुरुस्ती करण्यासाठी संबधितांनी तलाठी कार्यालयास संपर्क करून दुरुस्तीसाठी अर्ज दाखल करावा, असे आवाहन एस.बी.जाधव यांनी केले आहे.
...Read More

V. S. News
सांगवीतील महेश मंडळला 'रक्तमित्र पुरस्कार'

व्हीएस न्यूज - सामाजिक कार्य करीत असताना कोणाचेही मन दुखवणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यानुसार आपले कर्म असावे, असे उद्गगार आमदार राहुल कुल यांनी काढले.
दौंड येथे स्व. रोहीणी जाधव ट्रस्टच्या वतीने गेल्या 22 वर्षापासून नियमीत दरवर्षी देण्यात येणारे राज्य पातळीवरील विविध सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी ऍड. असीम सरोदे, प्रेमसुख कटारिया, ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र जाधव उपस्थित होते.
रक्तदाते अथवा रक्त मिळवुन मदत करणारे तसेच रक्तदान शिबीर घेवून रक्त मिळवुन देणाऱ्या कार्यकर्त्यास देण्यात येणारा 'रक्तमित्र पुरस्कार' पिंपरी- चिंचवड येथील सांगवी परीसर महेश मंडळचे अध्यक्ष सत्यनरायण लोहीया यांना देण्यात आल्या. तर गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त वेळा रक्तदान केल्याबद्दल राज्यस्तरीय रक्तदाता पुरस्कार जळगाव येथील राजेश यावलकर यांना बहाल करण्यात आला. तर एडस जनजागृती पुरस्कार मिरज येथील बारामतीचे आरटीओ अधिकारी अनिल शामराव वळीव यांना देण्यात आला. नंदुरबार जिल्हयातील तळोदे येथील विठ्ठल चंदु मगरे यांना निसर्ग पर्यावरण मित्र हा पुरस्कार देण्यात आला.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार नैसर्गिक संपत्तीचा नाश करीत असून, मिडीया त्याला खतपणी घालत आहे, असे मत ऍड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. देशाची लोकशाही अबादीत राहण्यासाठी सर्वांनी निष्ठेने प्रयत्न करणे गरजेचे असल्याची अपेक्षाही ऍड. सरोदे यांनी यावेळी व्यक्त केली.
...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड अॅड. बार असो. तर्फे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड अॅड. बार असो. तर्फे ८ मार्च रोजी होणाऱ्या पिंपरी न्यायालयाच्या वर्धापन दिन निमित्त कॅरम, बुद्धिबळ ,लिंबुचामचा, रांगोळी स्पर्धा तसेच क्रिकेट स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धे मध्ये विजेत्या संघ व स्पर्धक यांना वर्धापन दिनी बक्षिसे वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन पिंपरी अॅड. बार असो.चे अध्यक्ष अॅड राजेश पुणेकर ,अॅड मदनलाल छाजेड व अॅड. अनिल तेजवानी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अॅड. सुनील कड, अॅड. विजय शिंदे ,अॅड. कालिदास इंगळे, अॅड. सुजाता बिडकर,अॅड. अतिश लांडगे, अॅड. बाळकृष्ण रणपिसे,अॅड. योगेश थंबा, अॅड. सविता तोडकर, अॅड संजय दातिरपाटील, अॅड.शोभा कदम आदी मान्यवर उपस्तित होते.
...Read More

V. S. News
पीसीसीओईआरमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषदेचे आयोजन

व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी व शुक्रवारी (दि. 15 व 16 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पीसीईटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या परिषदेत ‘माहिती संकलन शास्त्र आणि यांत्रिक बुध्दीमत्ता’ (Data Science and Machine Intelligence) या विषयावर ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवन विदयापिठाच्या डॉ. लिसा आर्मस्ट्रॉंग, डॉ. अमिया त्रिपाठी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर,पीसीसीओईच्या आयटी विभाग प्रमुख डॉ. स्वाती शिंदे,नांदेडचे डॉ. उदय कुलकर्णी आदी मार्गदर्शन करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमा अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे.

...Read More

V. S. News
मोहन भागवतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.....संजोग वाघेरे

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने पिंपरीत भागवतांचा निषेध

व्हिएस न्युज - वेळप्रसंगी स्व:ताच्या जीवाची बाजी लावून देशवासीयांचे रक्षण करणा-या भारतीय सैन्याबाबत अनुद्‌गार काढणारे आरएस्‌एस्‌चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस राज्यभर आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरीत दिला.

पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 13 फेब्रुवारी) पिंपरी (पुणे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भागवतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फझल शेख, शिक्षण मंडळ माजी सदस्य लता ओव्हाळ, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदिप गायकवाड, युवक प्रदेश संघटक विशाल काळभोर, लाला चिंचवडे, शहर युवक उपाध्यक्ष आलोक गायकवाड, हर्षवर्धन भोईर, मयुर जाधव, विशाल पवार, कुणाल थोपटे, मंगेश बजबळकर , शेखर काटे, निलेश निकाळजे, सरचिटणीस योगेश मोरे, सैफ खान, अब्दुल क्षिरसागर, साहीश कोकाटे, सनी ढाळे, कविता खराटे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, रशिद सैय्यद, मनोज जाधव, रोझारीओ डिसुझा, दिपक गायकवाड, दिपक साकोरे, वंदना कांबळे, आशा शिंदे, निर्मला माने आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

युवक अध्यक्ष विशाल वाकडकर निषेध व्यक्त करताना म्हणाले की, सैनिकांच्या जीवावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करायचा आणि त्याची वारेमाप प्रसिध्दी घ्यायची असे भाजपाचे प्रसिध्दी लोलूप नेते वागतात. जगभर भारतीय सैनिकांचा दबदबा आहे. अशा सैनिकांबाबत अनादर करणारे वक्तव्य करुन भागवतांनी सैनिकांचा व देशभरातील सव्वाशे कोटी जनतेचा अपमान केला आहे. भागवतांनी सैनिकांची व जनतेची जाहीर माफी मागावी नाहीतर त्यांच्यावर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन करेल असे वाकडकर म्हणाले.

कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे निषेध करताना म्हणाले की, सीमेवर जाऊन सैनिकांबरोबर फोटो काढून पंतप्रधान स्व:ताची प्रसिध्दी करुन घेतात. मनुवादी प्रवृत्तीचे सरसंघचालक मोहन भागवत सैनिकांचा अपमान करणारे वक्तव्य करतात. त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. भागवतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी शितोळे यांनी केली आहे. यावेळी वैशाली काळभोर, वर्षा जगताप, लता ओव्हाळ, पुष्पा शेळके आदींनी निषेधाचे भाषण केले.
...Read More

V. S. News
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा  

व्हीएस न्यूज - पुणे येथे मांज्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला, तर पिंपरी-चिंचवड शहरात मांज्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी मांजाविक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. वाकड पोलिसांनी डांगे चौकातील दुकानातून एक हजार 215 रुपयांचा मांजा जप्त करून दुकान चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डांगे चौकातील क्लासिक स्टेशनरी मालक रताराम रघुनाथराम सोळंकी (वय-37, रा. विशालनगर, वाकड) आणि चंपालाल रघुनाथ सोळंकी (वय-34) या दोघांविरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंदी असलेला पतंगाच्या नायलॉन मांज्यामुळे पुण्यातील सुवर्णा मुजुमदार या महिलेचा 11 फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर जानेवारी महिन्यात काळेवाडीतील हमजा खान या दोन वर्षाच्या मूलाच्या पतंगाच्या मांज्यामुळे जबर जखम झाली होती. यामध्ये त्याच्या डोळ्याला तब्बल 32 टाके पडले आहेत. तर रंगनाथ बाळकृष्ण भुजबळ (रा. ज्योतिबा नगर काळेवाडी), गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे बंदी असलेल्या माजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर ध़रू लागली होती. याची गंभीर दखल घेत
वाकड पोलीसांनी मंगळवारी डांगे चौकातील क्लासिक स्टेशनरी या दुकानावर कारवाई करत एक हजार 215 रुपयांचा मांजा जप्त केला. दुकान चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

व्हीएस न्यूज - ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर सहा येथे सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
रोहिणी राजेंद्र अष्टेकर (वय 35, रिद्धी-सिद्धी संस्कृती अपार्टमेंट, सेक्टर नं. 6, मोशी प्राधिकरण, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी अष्टेकर मोशी ब्युटी पार्लर चालवतात. त्यांचे पती राजेंद्र अष्टेकर एका खाजगी कंपनीत काम करतात. सोमवारी रोहिणी यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस उपनिरीक्षक हेमंत कोकणी अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
दोन सराईत वाहन चोरटे गजाआड; 13 गुन्हे उघडकीस

व्हीएस न्यूज - वाहन चोरी रोखण्यासाठी लावलेल्या सापळ्यात दोन सराईत चोरट्यांना गजाआड करण्यास एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 13 दुचाकी व सहा मोबाईल जप्त करण्यात आले असून 13 गुन्हे उघडकीस आले आहेत.
अमोल रखमाजी खंडाळे (वय-34, रा. स्वराज गार्डन समोर, हिंद कॉलनी पिंपळे-सौदागर), राजेश ऊर्फ मुन्ना हरीचंद्र डोलारे (वय-28, रा. आनंदनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत.
तसेच संशयावरून ताब्यात घेतलेल्या एकाकडून एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. सोनाजी विष्णु लगाडे (वय-31, रा. तळवडे, चव्हाणनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून 1 सोन्याची चैन, 1 अंगठी असा 70 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. तिन्ही आरोपींकडून 4 लाख 78 हजार 500 रूपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, फौजदार भालेराव आदींनी केली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!