व्हीएस न्यूज - महाराष्ट्र शासनाच्या बहुउद्देशीय प्रकल्प इ-चावडी अंतर्गत येणारा इ फेरफार प्रकल्पासाठी हस्तलिखित सात बाऱ्यानुसार तळेगाव हद्दीतील आँनलाईन करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामधील चुका दुरुस्त करण्याची वेळ वाढून देण्यात आल्याची माहिती तलाठी एस. बी.जाधव यांनी सांगितली. राज्यशासनाच्या या प्रकल्प अंतर्गत 7/12 उतारे आँनलाईन करण्याचे काम शासनाने हाती घेतले होते. परंतु आँनलाईन करताना काही 7/12 वर भोगवटादाराची नावे, भोगावट्यांमधील क्षेत्र, 7/12 उतारे नावआले पण आँनलाईन नाही, भोगवटादार वर्ग झाला, पिक पाहणी व अन्य काही त्रुटी आढळल्यास त्यादुरुस्त करून घेण्याची मुदत शासनाने दि. 21 फेब्रुवारी पर्यंत वाढविली आहे. याबाबत सात बाऱ्यावर दुरुस्ती करण्यासाठी संबधितांनी तलाठी कार्यालयास संपर्क करून दुरुस्तीसाठी अर्ज दाखल करावा, असे आवाहन एस.बी.जाधव यांनी केले आहे.