व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत गाव घेण्यास विरोधासाठी मारुंजी ग्रामस्थांनी गुरुवारी कृती समिती स्थापन केली आहे. गावाच्या भल्यासाठी महापालिकेच्या या निर्णयाविरुद्ध प्रखर लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतने यापूर्वीच महापालिकेत गाव घेण्यास विरोध असल्याचे ठराव ग्रामसभेत मंजूर केले आहे. आजच्या ग्रामसभेतही असाच निर्णय घेऊन कृती समिती स्थापन केली आहे. यात अंकुश जगताप यांनी प्रास्ताविक मांडल्यावर समितीत जगताप यांच्यासह बाळासाहेब बुचडे (पाटील), गणपत जगताप, हिरामण बुचडे, आकाश बुचडे यांनी समितीत प्राथमिक सदस्य म्हणून भाग घेतला आहे. यानंतर समिती विस्तारणार आहे. अंकुश जगताप म्हणाले, "महानगपालिकेत गाव जाऊ नये. यासाठी कृतिशील विरोध दर्शविण्याचं काम होण्यास कृती समिती गरजेची ठरेल. रचनात्मक पद्धतीने विरोध करून ग्रामस्थांचा हा लढा यशस्वी करता येईल." बाळासाहेब बुचडे म्हणाले, "पालिकेचा पसारा आधीच वाढलाय. त्यावरच त्यांचं नियंत्रण राहिलं नाही. विकास आराखडा रखडलाय. त्याआधी गाव घेण्याची घाई कशाला." हिरामण बुचडे म्हणाले, " प्रशासकीय निर्णयांमुळे मारुंजीला यापूर्वी अनेकदा झळ बसली आहे. आता तरी बिल्डरांच्या हिताचे निर्णय होऊ नये. महानगपालिकेत गाव घेवू नये म्हणून विरोधी कृती समिती स्थापन करण्यास मारुंजीने पुढाकार घेतला आहे. इतर गावांमध्येही अशी कृती समिती स्थापण झाल्यास सर्वांचे संघटन करण्याची तयारी आहे. मारुंजीत ज्या ग्रामस्थांचा विरोध आहे ते दर्शविण्यासाठी घरोघरी सह्यांची मोहोम लवकरच राबविणार आहे. पालिकेचा ठराव नाकारावा यासाठी विरोधाच्या सह्यांची ही प्रत राज्य सरकारला पाठविणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. गाव समवेशाचा हा निर्णय प्रशासनाने रद्द करावा यासाठी मोठा लढा उभा राहील असं चित्र पंचक्रोशीत आहे.
व्हीएस न्यूज - लोणावळा-पुणे लोकल समोर उडी घेऊन एका इसमाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. नितीन आनंत गायकवाड (वय-37, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गायकवाड हे खासगी गाडीवर चालक म्हणून काम करत होते. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बिजलीनगर रेल्वे पुलावरुन लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसमोर त्यांनी चिंचवड येथील डी. वाय. पाटील रेल्वे पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्यूज - स्वयंपाक केला नाही या कारणावरून चिडून नवऱ्याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना नवलाख उंबरे गावच्या शिवारात भगवान संतू दरेकर यांच्या विटभट्टीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. अशोक विठ्ठल चौरे (वय40) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. शारदा अशोक चौरे (वय 34, रा.भगवान संतू दरेकर विटभट्टी, नवलाख उंबरे,ता. मावळ,जि.पुणे )असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात देवेश शंकर वाघमारे (वय 17 रा.भगवान संतू दरेकर विटभट्टी,नवलाख उंबरे,ता.मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याल फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण बनवले नाही या कारणावरून विठ्ठल चौरे याने चिडून पत्नी शारदा चौरे हिला लाकडी दांडक्याने मारहाण करून दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून तिचा खून केला. आरोपीला शुक्रवारी वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीने पत्नीचा खून केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर करीत आहेत.
व्हीएस न्यूज - स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या दोन एटीएममध्ये बॅकअपसाठी बसविण्यात आलेल्या ऍमरॉन कंपनीच्या सव्वा लाख रूपये किंमतीच्या 28 बॅटऱ्या चोरट्याने चोरून नेल्या आहेत. ही घटना पिंपळे-गुरव भागात गुरूवारी उघडकीस आली आहे. स्टेट बॅंकेचे चॅनल मॅनेजर चैतन्य शेट्टी (वय-29, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेचे पिंपळे-गुरव येथील सृष्टी चौकात व त्रिमुर्ती कंन्स्ट्रक्शन या इमारतीमध्ये एटीएम आहे. सृष्टी चौकातील एटीएममध्ये बॅकअपसाठी 100 पॉवर ऍमरॉनच्या 22 तर त्रिमुर्ती इमारतीमध्ये एटीएममध्ये 6 अशा 28 बॅटऱ्या बसविण्यात आल्या होत्या. चोरट्याने एटीएम सेंटरचे दरवाजे तोडून एक लाख 32 हजार रूपये किंमतीच्या 28 बॅटऱ्या चोरून नेल्या. फिर्यादी यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फौजदार आर. पी. केंद्रे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज (आकुर्डी ) येथील एस .बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एम. बी .ए .महाविद्यालयातील विध्यार्थी, विधार्थिनी आणि प्राचार्य यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत आकुर्डी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले, या स्वच्छता मोहिमेतून महाविद्यालयीन विधार्थांनी समाजाला आपले घर, घराचा परिसर , आणि शहर सवचछ ठेवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये वॉटर एटीएम मशीन बसविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. हे मशीन बसविण्याचा सर्व खर्च करण्याची समितीने तयारी दर्शविली आहे.
यासंदर्भात जलकल्याण समितीने आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जलकल्याण समितीमार्फत समाजातील विविध क्षेत्रात लोकोपयोगी सेवाकार्य केले जातात. त्यानुसार चिंचवड, संभाजीनगर येथील धनश्री रुग्णालय परिसरात समितीमार्फत २० जानेवारी २०१८ रोजी वॉटर एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची सोय होत असून, त्याला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. यातील अनेक रुग्णांकडे अगदी माफक दर असलेले केसपेपर काढण्यासाठी तसेच औषधोपचारासाठी देखील पैसे नसतात. असे रुग्ण पिण्यासाठी २० रुपये किंमतीची पाण्याची बाटली घेऊ शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना एक ते दोन रुपयांत पिण्याचे शुद्ध पाणी मिळाल्यास त्यांचे आरोग्य चांगले होण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सर्व रुग्णालयांमध्ये वॉटर एटीएम मशीन बसविण्याची जलकल्याण समितीला परवानगी द्यावी. हे मशीन बसविण्याचा सर्व खर्च समितीमार्फत केले जाईल. तसेच मशीनच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारीही समिती घेईल.” आयुक्तांना निवेदन देताना जलकल्याण समितीचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर डंबे, सहप्रकल्प प्रमुख संतोष निंबाळकर, अध्यक्ष डॉ. राजीव पटवर्धन, उपाध्यक्ष समीर पाटील, डॉ. गीता आफळे, कार्यवाह योगेश थेटे, आरोग्य प्रकल्प प्रमुख डॉ. अविक्षित काळे, कार्यालय प्रमुख भालचंद्र देशपांडे, निधी व संपर्कप्रमुख चिन्मय कवी आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत पोस्टरविरुद्ध केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी कार्यालयात येवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात दिली आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी एकुमसिंग कोहली (रा. दापोडी) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
तुषार कामठे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एकुमसिंग हा मला सातत्याने फोन करत आहे. तसेच अनधिकृत पोस्टरविरुध्द केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रत्यक्ष आमच्या कार्यालयात येवून मला दमदाटी केली. त्याने अनेक वेळा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आम्ही त्याला सौजन्याने फोनवर बोलूनसुद्धा त्याचा उर्मटपणा थांबला नाही. तो सातत्याने अनधिकृत पोस्टरविरुद्ध आम्ही उचललेले धोरण थांबविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत आहे. एकुमसिंग हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील कामठे यांनी तक्रारीत केली आहे.
व्हीएस न्यूज - पुण्याच्या कल्याणीनगर भागात उभारल्या गेलेल्या ट्रम्प टॉवर या अलिशान इमारतींचे उद्घाटन ट्रम्प व्यवसायाचे प्रमुख ज्युनिअर डोनाल्ड ट्रम्प याच्या हस्ते पुण्यात पार पडले. पंचशील डेव्हलपर याच्या भागीदारीत या दोन इमारती बांधल्या गेल्या असून येथे ऋषीकपूर पासुन कतरिना कैफ पर्यंत अनेक सेलेब्रिटीजच्या सदनिका आहेत असे समजते. देशातला हा दुसरा इको फ्रेंडली २३ मजली टॉवर असल्याचे पंचशीलचे अतुल चोरडिया यांनी सांगितले. येथील सदनिकांची किंमत १५ कोटींपासून आहे व अमेरिका, इंग्लंड येथील ट्रम्प टॉवर्सपेक्षा या इमारती अधिक चांगल्या बांधल्या गेल्याचे ते म्हणाले.
या दोन्ही टॉवर्स मधील बहुतेक सदनिका विकल्या गेल्या आहेत. टॉवर बी मधील सदनिका ग्राहकांना ट्रम्प ज्युनिअर याच्या हस्ते टोकन ऑफ अॅप्रिसिएशन देण्यात आले. येथील सदनिका ६१०० चौरस फुटांच्या आहेत आणि आधुनिक फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल, बायोमेट्रिक कार्ड प्रवेश, वल्डक्लास स्पा, १३५०० चौरस फुटांचे कलादालन, वल्डक्लास सिक्युरिटी सिस्टीम अश्या सुविधा आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड ते पुणे मेट्रो प्रकल्पास सुरवात झाली आहे ,त्या दरम्यान खराळवाडी ते हॅरिस ब्रिज पर्यंत मेट्रो प्रकल्पाचे २०% काम पूर्ण झाले आहे . या मध्ये ८८ पिलरचे फाउंडेशन झाले व फिक्सर कॅप २० आणि ५० पिलरचा समावेश आहे. खराळवाडी ते नाशिक फाटा ५ मीटर ची उंची ठेवण्यात येणार आहे व नाशिक फाटा उड्डाणपूलावर १७ मीटर ची उंची ठेवण्यात येणार आहे . पिंपरी चिंचवड ते पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये १३५ झाडे काढली व त्या पैकी ५ झाडांचे वल्लभनगर एस टी बसस्थानकाच्या परिसरात प्रत्यारोपण झाले आणि ९ झाडांचे डेक्कन नदी पात्रात प्रत्यारोपण करण्यात आले आहे. हे प्रत्यारोपण अत्याधुनिक पध्दतीचे असल्यामुळे प्रत्यारोपण केलेली झाडे १००% जगतात.
अशी माहिती मेट्रो प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक मा .श्री सुनील म्हस्के यांनी दिली .
व्हीएस न्युज - गुरूवार दि.२२ रोजी लालटोपी नगर मधील अनेक समस्या (पाणी,चेंबर्स,शौचालयांचा निधी,राजाराम जोशी चौकात स्पिड ब्रेकर्स फोटोपास,नळ कनेक्शन) साठी संमती या अशा महत्वाच्या समस्येकडे पालीका आयुक्तांचे लक्ष वेधून तत्पर कारवाई व्हावी म्हणून मोर्चा काढण्यात आला होता.पोलीसांनी परवानगी नाकारली होती,परंतु त्यांना महत्वाचे प्रश्ना बाबत माहीती देवून फक्त महिलांचाच मोर्चा असेल आणि जास्त गर्दी न करता शिस्त व शांततेत मोर्चा असेल हे सांगितल्या नंतर परवानगी दिली व मोर्चा यशस्वी पार पडला. मा.आयुक्तांना निवेदन देण्यात आले. पुढील काळांत जर समस्या सुटल्या नाहित,तर रास्ता रोको सारखे तीव्र आंदोलन केले जाइल. मा. आयुक्तांना निवेदन देतांना,मा.नसिमा सैय्यद,शाम जोशी,शंकरराव तायडे,लक्ष्मी जोशी, कविता खराडे,ललीता जोशी,मेहबूब शेख,तिमय्या जेकलेट,प्रविण भोसले उपस्थित होते.
व्हीएस न्यूज-पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर शिवसेना रहाटणी - काळेवाडी विभागप्रमुख युवराज दाखले यांनी विविध सामाजिक कार्य केले असून नुकताच त्यांच्या कामाचा आढावा प्रकाशीत झाला. आकुर्डी येथील शिवसेना कार्यालयात शिव संपर्क अभियान निरीक्षक सत्यवान उभे व चिंचवड विधानसभा संपर्क प्रमुख वैभव थोरात यांच्या हस्ते कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, संपर्क अभियानात युवराज दाखले यांनी केलेल्या कामाचे कौतुकही मान्यवरांनी केले. यावेळी, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटीका सुलभाताई उभाळे, युवासेना चिंचवड विधानसभा अधिकार राकेश वाकुडे, सल्लागार भगवान वाल्हेकर, मधुकर बाबर, शिवसैनिक मोहन बारटक्के, शिव व्यापारीसेना उपशहरप्रमुख गणेश आहेर, निलेश भोरे, गोरख पाटील, रविकिरण घटकार, सुशीलाताई पवार, सुनिताताई चव्हाण, शहरसंघटीका भाग्यश्रीताई मस्के, अनिताताई तुतारे, वैशाली मराठे, मंगला भोकरे, चिंचवड विधानसभा प्रमुख गजानन चिंचवडे, शाखाप्रमुख अंकुश कोळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
व्हिएस न्यूज – बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. यावर ‘पावर’बाज उत्तरे पवारांनीही दिली. या मुलाखती दरम्यान आपल्यावर अनेक आरोप झाले त्याचे आपण कधीच लगेच खंडण न केल्यामुळे गैरसमज वाढले का? या राज ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दाऊदशी संबंध असल्याच्या त्यांच्यावरील आरोपाचा किस्सा शरद पवार यांनी ऐकवला.
पवार याविषयी सविस्तर बोलताना म्हणाले, अनेक आरोप आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात झाले. पण मला या आरोपांचे खंडण करत त्यांचे स्पष्टीकरण करणे कधी महत्वाचे वाटले नाही. आपल्याला या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे माहीत होते आणि त्यामुळे अशा आरोपांची पर्वा कधी केली नाही. अनेक आरोप होऊनही त्यातून काय समोर आले हे स्पष्ट असल्यामुळे आपण खोट्या आरोपांची चिंता केली नाही. माझे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांनी एकेकाळी मोठी राळ उठवून देण्यात आली होती. त्यावेळी अनेक आरोप झाले पण त्यात काही तथ्य नाही. मात्र, हा आरोप कसा झाला त्याच्या मुळाशी जाऊन माहिती घेतली.
पवार या आरोप होण्यामागचा किस्सा सांगताना म्हणाले,त्यावेळी एका वर्तमानपत्राचा पत्रकार दुबईमध्ये असलेल्या दाऊदच्या भावाला भेटला आणि त्याला मुंबईबाबत प्रश्न विचारले. मुंबई पोलीस दाऊदमुळे आपल्यालाही पकडतील त्यामुळे दुबईत राहत असल्याचे सांगत मुंबईत परतण्याची खूप इच्छा असल्याचेही त्याने सांगितले होते. पत्रकाराने त्यावर त्याला बॉलिवूड मधले कोण आवडते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, वैगरे प्रश्न विचारले. त्यावर त्याने महाराष्ट्राच्या सीएमना कोण ओळखत नाही, आपण त्यांना ओळखतो, असे उत्तर दिले आणि संबंधित पत्रकाराने बातमीचा फक्त तेवढाच भाग हेडलाईन करून वापरला. खासदार राम नाईक यांनी पुढे याच बातमीचा आधार घेत संसदेत हा मुद्दा उपस्थित करून प्रकरणाला वेगळेच वळण दिले आणि दाऊदच्या संबंधांबाबत अधिकच राळ उठली, असा किस्सा शरद पवार यांनी ऐकवला.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002