व्हीएस न्यूज - स्वयंपाक केला नाही या कारणावरून चिडून नवऱ्याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना नवलाख उंबरे गावच्या शिवारात भगवान संतू दरेकर यांच्या विटभट्टीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. अशोक विठ्ठल चौरे (वय40) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. शारदा अशोक चौरे (वय 34, रा.भगवान संतू दरेकर विटभट्टी, नवलाख उंबरे,ता. मावळ,जि.पुणे )असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात देवेश शंकर वाघमारे (वय 17 रा.भगवान संतू दरेकर विटभट्टी,नवलाख उंबरे,ता.मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याल फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण बनवले नाही या कारणावरून विठ्ठल चौरे याने चिडून पत्नी शारदा चौरे हिला लाकडी दांडक्याने मारहाण करून दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून तिचा खून केला. आरोपीला शुक्रवारी वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीने पत्नीचा खून केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002