आकुर्डीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात 'केपीआयटी स्पार्कल - 2018' स्पर्धेची सांगता
व्हीएस न्यूज - ऊर्जा आणि वाहतुकीच्या साधनांची सर्वच स्तरांवर मागणी वाढली आहे. एकीकडे ही वाढ होत असताना पर्यावरणाचा -हास होत असून तो रोखण्यासाठी जागतिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यातुनच अपारंपारिक ऊर्जा तसेच पर्यावरणपुरक वाहनांची निर्मिती करण्याकडे कंपन्यांचा कल वाढला आहे. भारतात ही सौर-पवन ऊर्जा, बॅटरी-वीजेवर चालणारी वाहने यावर संशोधन होत आहे. भारतीयांमध्ये संशोधनवृत्ती जोपासण्याचे काम होत असून अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून 'स्पार्कल' सारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पना, विचारांना खतपाणी घालण्याचे कार्य करीत आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे, असे मत ज्येष्ठ संशोधक पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
केपीआयटी कंपनीने आयोजित केलेल्या 'केपीआयटी स्पार्कल - 2018' या अभियांत्रिकी स्पर्धेमधील विजेत्या संघांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पीसीसीओई महाविद्यालय शैक्षणिक भागीदार व भारत सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान विभागाने ज्ञान भागीदार म्हणून काम केले. सुमारे 21 लाखांच्या पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉ. माशेलकर बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन, केंद्र सरकारच्या ऊर्जा-तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार सदस्य हरकेश मित्तल, प्रो. डॉ. पिटर ट्रोपश्च, डॉ. कार्लोस बिलक्ल, केपीआयटीचे सीईओ रवि पंडित, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, एनसीएलमधील शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले, डॉ. सी. एस. कुमार, डॉ. मिलन राणे, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर आदी उपस्थित होते.
डॉ. के. राधाकृष्णन विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, तुमच्याध्ये अफाट आणि चाकोरी बाहेरील विचार करण्याची क्षमता आहे. विचारांना चालना देऊन तुम्ही मोठे संशोधन उभे करू शकता. मागील चार-पाच वर्षांचा विचार केला तर भारताचा मोठा विकास झाला आहे. रवि पंडित म्हणाले, केपीआयटीने आयोजित केलेल्या स्पार्कल स्पर्धेस प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. संशोधनात्मक प्रकल्पांमध्ये दर्जात्मक आणि गुणात्मक वाढ झाली असून विद्यार्थ्यांनी शास्त्रीयदृष्टया विचार करून आपले प्रकल्प सादर केले. ऊर्जा आणि वाहतुक क्षेत्रातील समस्यांवर आपण चांगले मार्ग काढू शकतो.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे - प्लॅटिनम ॲवॉर्ड - आयआयटी खरगपूरच्या टीम इलेक्ट्रोडस् - (बॅक्टेरिया पॉवर बॅटरी) या प्रकल्पास; गोल्ड ॲवॉर्ड - मंगलोर येथील सहयाद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या टीमला - (स्मार्ट हेल्मेट) प्रकल्पास मिळाले. सिल्व्हर अॅवॉर्ड दोन संघांना देण्यात आले - त्यामध्ये पुणे विद्यार्थीगृहाच्या इंजिनिअरिंगच्या टीम नॅनोवोक्सला (ऑईल मिश्रीत पाणी शुध्द करण्याच्या संशोधनास) तर पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या टीम थर्मोला (स्वयंपाकाच्या वाया जाणा-या उष्णतेपासून ऊर्जा निर्मितीच्या) प्रकल्पास मिळाले. मोस्ट पॉप्युलर ॲवॉर्ड - हमिरपूर येथील नॅशनल इन्स्टिट्युटच्या (वाहनांचे अपघात रोखण्यासाठी केलेल्या जनजागृती) प्रकल्पास मिळाले.
यावेळी प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर आभार व्यक्त करताना म्हणाले, पीसीसीओई विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. स्पार्कल स्पर्धेमध्ये सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले 1500 पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प सादर केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पार्कल स्पर्धेव्दारे उत्तमोत्तम संशोधन प्रकल्प पाहण्याची, ज्येष्ठ संशोधकांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. प्रा राहुल पाटील आणि रामकृष्ण वडाळी यांनी पीसीसीओई कडून समन्वयक म्हणून काम केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनास उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या विजय भोईरने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पुण्याच्या गणेश शेडगेने मोस्ट इम्प्रुव्हड तर पुण्याच्याच विशाल साळुंकेने बेस्ट पोजरचा किताब पटकविला.
या स्पर्धेत राज्यभरातील एकूण १६५ स्पर्धक सहभागी झाले होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक डब्बु आसवानी, धनाजी बारणे, नारायण बहिरवाडे, आयोजक सुनील पाथरमल आदी उपस्थित होते.
55 किलो वजनगटात -1) नीलेश कोळेकर (मुंबई उपनगर), 2) आशिष बिलीया (चंद्रपूर), 3) अक्षय पार्टे (पुणे), 4) शैलेश कुलकर्णी (पुणे), 5) मोहंद आयाझ (परभणी). 60 किलो वजनगटात -1) विशाल साळुंखे (पुणे), 2) प्रथमेश कांबळे (पुणे), 3) उस्मा शेख (पुणे), 4) अब्दुल रेहमान(परभणी), 5) महेश मनोहर (पुणे). 65 किलो वजनगटात -1) निखील गोळे (मुंबई उपनगर), 2) प्रविण मगावणे (मुंबई), 3)अक्षय सरवण (पुणे), 4) कश्यप खंडागळे (पुणे), 5) अमोल कामटे (पुणे) 70 किलो वजनगटात -1) आतिक शेख (पुणे), 2) सोमनाथ पानसरे (पुणे), 3) बाबु चव्हाण (पुणे), 4) यतीन फुटेकर (पुणे), 5)शैलेंद्र पिंपळकर (औरंगाबाद)
75 किलो-1) गौरव शिंदे (पुणे), 2) ऋषिकेश पासलकर (पुणे), 3) अक्षय पवार (पुणे), 4) दिलीप राजीवडे (पुणे), 5) अमीर पठाण(अमरावती) 80 किलो वजनगटात -1) विजय भोईर (अमरावती), 2)असिफ अहमद (पुणे), 3) गणेश थेरगळ (पुणे), 4) संदेश नलावडे (पुणे), 5) रोशन पाटील (बारामती) 80 किलो व त्यावरील 1) गणेश शेडगे (पुणे), 2) मोहसीन नाजीम (औरंगाबाद), 3) विक्रम चांडक (अमरावती), 4) आकाश नाटेकर (पुणे), आशिष कांबळे (पुणे).
व्हीएस न्यूज - तडीपारीचा आदेश झुगारून उथळ माथ्याने फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिस्तुल व एक जिवंत काडतुसासह पिंपरी पोलीसांनी खराळवाडी येथील भागवत गिता मंदीराजवळून अटक केली.
दिनेश विलास शिंगाडे (वय-25, रा. भागवत गिता मंदिराजवळ, खराळवाडी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पिंपरी पोलीसांनी बातमीदारामार्फत शिंगाडे खराळवाडीत आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलीसांनी सापळा लावून सराईत गुन्हेगार शिंगाडेला अटक केली. त्याच्याकडून सात हजार 500 रूपयांचे एक पिस्तुल व एक जिवंत असा ऐवज जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, गुन्हे शाखेचे मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर आदींच्या पथकाने केली.
व्हीएस न्यूज - पत्रकारांनी समाज जीवनाशी एकरूप होऊन आपली पत्रकारिता करावी, असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ रामचंद्र देखणे यांनी येथे व्यक्त केले. तळेगाव शहर पत्रकार संघ आणि योगीराज फाऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 206 व्या जयंती निमित्त कार्यक्रमात डॉ देखणे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे तर व्यासपीठावर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील वाळूंज, जेष्ठ पत्रकार सुरेश साकवळकर, बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर, तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुट पाटील, पुणे पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष बबन भेगडे, पक्षप्रतोद सुशील सैदाणे, माजी नगराध्यक्ष रविद्र दाभाडे, बाळासाहेब जांभूळकर, सुरेश धोत्रे, यादवेंद्र खळदे, गणेश भेगडे, उद्योजक किशोर आवारे, नगरसेविका सुलोचना आवारे आदि उपस्थित होते. समाजाच्या मार्गदर्शनासाठी पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी असे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे म्हणाल्या. पत्रकार हा समाजाला आधार देणारा आणि दिशा देणारा असावा अशी भावना माजी आमदार कृष्णाराव भेगडे यांनी व्यक्त केली. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पणतू प्रा. बाजीराव जांभेकर यांनी सकारात्मक उत्तर दिले. रामनाथ पंडित यांच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या हस्तलिखित साहित्य प्रदर्शन मांडल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गणेश खांडगे, संग्राम काकडे, अशोक काळोखे आदींचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, पंडित आल्पे, संपदा थिटे तसेच श्रुती देशपांडे यांची संगीत मैफल आयोजित केली होती. त्यास हर्मोनियामाची साथ हिमांशू जोशी आणि तबल्याची साथ संतोष साळवे यांनी दिली. सूत्रसंचालन अतुल पवार व कांचन सावंत यांनी केले. नियोजन आशिष पाठक, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोहर दाभाडे, सचिव अतुल पवार, बी एम भसे, सोनबा गोपाळे, तात्या धांडे, श्रीकांत चेपे यांनी केले.
व्हीएस न्यूज - शिव जयंती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी लढाईस 353 वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधत वसंत चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक पत्रे, युध्द नौकांच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनास राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
हे प्रदर्शन पुण्यातील बालगंर्धव रंगमंदिर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना गुराब, गलबत, युध्दनौका, व पाल या लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती, ढाल, तलवार, कट्यार, कुकरी, भाले, मुल्हेरी मूठ, दांडपट्टा, संगीन, अंकुश कुऱ्हाड, गुप्ती पेशकबज, खंजराली, जंबिया यासारखी शस्त्रे पाहता आली. एकदिवशीय प्रदर्शन भेटीचे आयोजन प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. श्रेया दाणी, प्रा. सविता वीर, डॉ. सीमा काळभोर यांनी केले होते.
व्हीएस न्यूज - राष्ट्रीय कराटे स्पर्धेतील शहरातील विजेत्या खेळाडूंचा सत्कार नगरसेवक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. पिंपरी-चिंचवड कराटे असोसिएशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कराटे स्पर्धेतील खेळाडूंची नावे ः सुवर्ण पदक विजेते ः आकाश वाकडे, राज भराटे, प्रणाद कटकंबलेकर, अंजली रणधीर, रोहन विचारे, दिपन दत्ता.
रजत पदक विजेते खेळाडू ः श्रुती चुडमुंगे, पियुष करडे, आदित्य चौधऱी. कास्य पदक विजेते खेळाडू ः श्रावणी भोईर, समृध्दी कड, राज चौधरी, तेजस विशे, अनुष्का भोंग, धनश्री भांगिदरे, जय चौधरी. ब्राऊन बेल्ट ः अनुज उब्रंजकर, मेहूल घोडके, साहिल बोबाटे, दिव्या आब्दागिरे, श्रीयान ठाकुर, सानवी खांडेकर. ग्रीन बेल्ट ः जान्हवी बनहैत, श्रावणी काळे, माही तेडुलकर, ज्ञानेश्वर गावडे, इशान गाडे, विश्वजीत केणी. प्रास्ताविक कराटे प्रशिक्षक अशोक कदम यांनी केले. अशोक फरगडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर कदम, प्रशांत फरगडे, सागर पुजारी आदींनी परीश्रम घेतले.
व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एक महान योध्दा व चारित्र्यसंपन्न राजा होते, असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक प्रमोद लाड यांनी केले. भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाव्दारे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारीया, प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. डॉ. एच. पी. शिंदे, विद्यापीठ प्रतिनिधी पुजा ठाकर, प्रा. पांडूरंग भास्कर, प्रा. रेणू आग्रवाल, प्रा. डॉ. स्वाती वाघ, प्रा. प्रविण म्हस्के, प्रा. एस. पी. बैसाणे, प्रा. विभा ब्राम्हणकर, प्रा. महालक्ष्मी ठुबे आदी उपस्थित होते. प्रा. पगारीया म्हणाले की, देशातील निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही या दक्षिणेतील राजसत्तांबरोबरच उत्तरेतील मोगल साम्राज्याशी एकाच वेळी शिवरायांनी टक्कर दिली. त्यामुळेच छत्रपतींच्या कार्यकाळात इंग्रजांची डाळ शिजू शकली नाही. दाढी वाढवून व कपाळावर अर्धचंद्र कोरून शिवाजी होता येणार नाही. त्यासाठी छत्रपतींच्या विचारांचे आचरण करणे आवश्यक असल्याचे प्राचार्य सदाशिव कांबळे म्हणाले. प्रा. डॉ. हनुमंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुधा चौधरी हिने सुत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. स्वाती वाघ यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 हे अभियान यशस्वीपणे राबविले आहे. आगामी काळातही हे अभियान अतिशय सक्षमपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले. नगरपरिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आवारे यांनी नगरपरिषदेमध्ये घेतली. या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण 2018 या अभियानाचा आढावा घेण्यात आला. गेल्याच आठवड्यात या अभियानाची शासकीय पातळीवरील समितीने मुल्यांकन पाहणी केली. या पाहणीनंतर सर्वांनी समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले. सहा दिवस चाललेल्या या पाहणीत समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नगरपरिषद राबवीत असलेल्या अभियानाची कागदपत्रे नगरपरिषद कार्यालयात तपासली व शहरातील स्वच्छता अभियानासाठी निवडलेल्या जागांवर जाऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे शहरातील वेगवेगळया भागातील नागरिकांच्या या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अभियाना बाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या अधिकारी समितीने शहरातील वेगवेगळ्या भागातील 177 जागांची पाहणी केली. नागरिकांच्या 220 मुलाखती घेतल्या. केंद्र शासन व राज्य शासनाने देश पातळीवर हे अभियान सुरु केलेले आहे. या अभियानातील स्वच्छता पाहणीचा निकाल 15 ते 30 मार्चच्या दरम्यान लागणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या सार्वजनिक संस्थाना 15 कोटी रुपये, व्दितीय क्रमांक येणाऱ्याला 10 कोटी रुपये आणि तृतीय क्रमांक येणाऱ्यास 5 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. हे अभियान असेच सक्षमपणे आगामी काळातही चालु ठेवणार आहे. याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना नेमून दिलेली कामे अशीच पुढे चालू ठेवावीत अश्या सूचना मुख्याधिकारी आवारे यांनी दिल्या आहेत.
व्हीएस न्यूज - 12 वी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण शुभेच्छांच्या रूपाने कमी व्हावा, परीक्षेचा उत्साह वाढावा या दृष्टीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व उपस्थित प्राध्यापकांनी पुरंदर परिसरातील केंद्र क्र्रमांक 171 मध्ये आलेल्या 12 वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेतली. यावेळी महाविद्यालयाचे उपकेंद्र संचालक प्रा. जांभळे, प्रा. भगवान, प्रा. जिरापुरे आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक षिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. माया गायकवाड व प्रा. दिपक जांभळे यांनी एचएससी बोर्डाकडून आलेल्या सर्व सूचना व माहिती दिली. इ. 12 वी तील पुर्वाराणी जगताप हिने बोर्डाने दिलेली कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रतिज्ञेचे वाचन केले. यामध्ये आपण एक परीक्षार्थी असून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी आई वडीलांनी जे संस्कार केले त्याचे स्मरण करून ही परीक्षा देईन, वर्षभरात केलेल्या अध्ययनावर आधारीत परीक्षा देईन. परीक्षा मोकळया वातावरणात देईन तसेच या परीक्षेत माझ्याकडून कॉपी किंवा अन्य गैरमार्गाचा वापर होणार नाही अशा आशयाची शपथ यावेळी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी देखील यावेळी शपथ घेतली. या कल्पनेचे पालकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
व्हीएस न्यूज - बहिणीच्या शोधात आईसोबत चाललेल्या तरुणीचा बाप-लेकाने विनयभंग केल्याची घटना काळेवाडी येथे घडली. याबाबत 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी आपल्या आईसोबत बहिणीच्या शोधात काळेवाडी येथे जात असताना दोन इसमांनी घरगुती भांडणाच्या कारणावरून तिचा विनयभंग केला. आरोपीने पीडितेच्या शरीराचा चावा घेतला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातून उग्र वास आल्याने मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. तरूणाने तीन-चार दिवसांपुर्वी आत्महत्या केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. रमाकर फुलचंद राजभर (रा.कुदळवाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाकर यांचे घर गेल्या तीन-चार दिवसापासून बंद होते. मंगळवारी त्यांच्या घरातून उग्र वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी दरवाजा तोडला. रमाकर यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला. रमाकर हा मित्रासोबत राहत होता. मागील काही दिवसांपूर्वी मित्र गावी गेला होता. तीन दिवसांपूर्वी रमाकर यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - बॅकेतून पैसे घेवून बाहेर आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर दोघांनी खाज येणारी पावडर टाकली. पावडर धुण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या ज्येष्ठाकडील सव्वा लाख रूपयांची रोकड, पासबुक असलेली बॅग पळवून नेली. ही घटना भोसरीतील चांदणी चौकातील मेघदुत हॉटेलमध्ये मंगळवारी भरदिवसा दुपारी एकच्या सुमारास घडली. तुकाराम साळवी (वय-64, रा. प्राधिकरण, आकुर्डी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी माहिती दिली. साळवी हे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास चांदणी चौकातील देना बॅंकेतून एक लाख 23 हजार रूपये काढून बाहेर आले होते. बॅकेच्या बाहेर काही अंतरावर आल्यानंतर दोघांनी त्यांच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकली. साळवी पावडर साफ करण्यासाठी मेघदुत हॉटेलमध्ये गेले. साळवी यांनी पैशांची बॅग पाण्याच्या कुलर जवळ ठेवून अंगावरील पावडर साफ करत होते. पाठीमागून आलेल्या एका आरोपीने सव्वा लाख रूपयांची रोकड व पासबुक असलेली बॅग घेवून पोबारा केला. साळवी यांनी आरडा-ओरड केली तोपर्यंत आरोपी पसार झाला. फौजदार चामले अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002