Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
'मेट्रो प्रकल्पांच्या मार्गिकांचे काम वीस टक्के पूर्ण '

एस न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात सध्या महामेट्रोच्या वतीने मेट्रो प्रकल्पांच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. हे काम वीस टक्के पूर्ण झाले आहे. तर वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे आठ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या वर्षभरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या विविध कामांचा आढावा दीक्षित यांनी घेतला. महामेट्रोकडे जबाबदारी दिली गेल्याने नागपूर मेट्रोसाठी काम करणा-या अनुभवी मनुष्यबळाचा उपयोग करून पुण्यात मेट्रोच्या विविध कामांना गती देण्यात आली. गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हॅरिस ब्रिज (दापोडी) ते पिंपरी-चिंचवड महापालिका दरम्यान काम झपाट्याने सुरु आहे. एका वर्षात या भागातील सुमारे वीस टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोचे काम पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत वेगात सुरू आहे. शहरातील 7.20 किलोमीटर अंतराच्या मार्गावर एकूण 104 फाउंडेशन व 55 पिलरचे काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोच्या कामाच्या भूमिपूजनास एक वर्षे पूर्ण होत असल्याने शहरासाठी ही कामगिरी नक्कीच डोळ्यात भरणारी आहे.

शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गावरील काम पावसाळ्यानंतर सुरु होईल. मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व वनाज ते सिव्हिल कोर्ट असे दोन ठिकाणी काम सुरु आहे. शिवाजीनगर धान्य गोदाम ते रामवाडी आणि रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाच्या कामाच्या निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत या दोन्ही मार्गांवरही कामे सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य व केंद्र सरकारकडून मेट्रोच्या कामासाठी 1300 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे, अवघ्या वर्षभरात प्रत्यक्ष दोन मार्गांवर काम सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले.

मेट्रो प्रकल्पात येणा-या स्थानकांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या अंतर्गत संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले स्थानक तयार होणार आहे. बाकी स्थानकांचे प्राथमिक स्वरुपात काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असल्याने उद्योनगरीत विनाअडथळा मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. महापालिका प्रशासनासह वाहतूक पोलीस व नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने काम वेगात सुरू आहे. सर्व काम 2021 पूर्वी पूर्ण केले जाईल. वाहतूक सुरळीत राहावी म्हणून सर्व दक्षता घेण्यात येत आहे, असे पिंपरी-रेंजहिल्स मेट्रो प्रकल्पाचे प्रमुख सुनील म्हस्के यांनी सांगितले. महामेट्रोच्या कामासाठी आतापर्यंत तीनशे कोटी खर्च झाले असून मार्च अखेरपर्यंत चारशे कोटी खर्च होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विशेष म्हणजे जागतिक पातळीवर सर्वमान्य असलेल्या पुनर्रोपण पद्धतीनुसार वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून या पद्धतीने पुनर्रोपण केल्यास वृक्षांचा तग धरण्याचा दर हा सर्वाधिक असल्याने महामेट्रो ही पद्धत अवलंबित आहे. हे काम सुरू असताना प्रकल्पाच्या मार्गात अनेक वृक्षांचे अडथळे येत आहेत. सदर वृक्षांचे पुनर्रोपण ही संपूर्णत: महामेट्रोची जबाबदारी असून त्या अंतर्गत 86 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 35 कोटी मिळणार आहे. मेट्रोच्या जागेच्या बदल्यात 180 कोटी महापालिकेकडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण दलाची जागा मिळावी यासाठी चर्चा सुरु आहे. मेट्रो स्थानकाबरोबरच वाहनतळाचीही सोय करण्यात येणार आहे.

याबरोबरच संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्थानकाजवळ नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) तयार करण्यात येणार आहे. या पुलाच्या मदतीने मेट्रो स्थानक हे दुस-या बाजूला वल्लभनगर बस स्थानक व आयटी इंडस्ट्री यांना जोडण्यात येणार आहे. सदर पुलाची लांबी ही 65 मीटर तर रुंदी 6 मीटर इतकी असणार आहे. याचा उपयोग मेट्रो स्थानकावर उतरणा-या प्रवाशांबरोबरच या भागातील पादचा-यांनाही होईल. याशिवाय हा पूल जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात येणार असून तो वास्तुस्थापनेचा उत्कृष्ट नमुना असेल, असा विश्वास दाखवत नवीन पूल बांधल्यानंतरच जुना पूल पाडण्यात येणार असल्याचेही डॉ. दीक्षित म्हणाले.

...Read More

V. S. News
जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्काराचे वितरण 

व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार, खेळ पैठणीचा, एकांकिका तसेच गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सभापती संध्या भेगडे यांनी दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारीका भेगडे या उपस्थित राहणार आहे. शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
यावेळी महिलासाठी खेळ पैठणीचा तसेच एकांकिकेची आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सभापती संध्या भेगडे आणि उपसभापती प्राची हेंद्रे यांनी केलेले आहे. तसेच शहरातील विविध भागातून महिलांची दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे.

...Read More

V. S. News
तळेगावात 100 टक्के  करवसुली करण्याचे उदिष्ट्य 

व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली असून यावर्षी 100 टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ठये असल्याचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले.
यावर्षी घरपट्टीची एकूण मागणी 16 कोटी 44 लाख रुपये तर पाणी पट्टीची एकूण मागणी 5 कोटी 10 लाख रुपये आहे. आतापर्यंत 8 कोटी 54 लाख तर पाणीपट्टी पोटी 1 कोटी 55 लाख रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती कर संकलन अधिकारी विजय भालेराव यांनी सांगितले. शहरात एकूण 28 हजार मालमत्ताधारक असून 16 हजार नळ जोड आहेत.
कर वसुलीसाठी नगरपरिषदेकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहराचे एकूण आठ विभाग करण्यात आलेले आहे. या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी वर्ग देण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले.
करनिरीक्षक भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली करवसुली अधिकारी संभाजी भेगडे, सुनील कदम, प्रवीण माने, तुकाराम मोरमारे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, विशाल लोणारी, आदेश गरुड विशेष प्रयत्नशील आहेत.
सर्व मालमत्ता धारकांना घरपट्टी आणि पाणी पट्टी बिलांचे वाटप करण्यात आलेले असून मोठ्या थकबाकी दारांची विशेष यादी तयार करण्यात आलेली त्याचे साठीचे जप्ती वॉरट तयार करून संबधिताना बजवण्यात आले असल्याचे भालेराव आणि आवारे यांनी सांगितले. नागरिकांनी आपआपले कर येत्या मार्चअखेर पूर्ण भरून विकासाच्या कामात योगदान द्यावे असे आवाहन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके आणि सर्व नगरसेवकांनी केले आहे.

...Read More

V. S. News
श्री वेताळ महाराज उत्सव समिती अध्यक्षपदी सचिन ढोरे 

व्हीएस न्यूज - जुनी सांगवी ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन ढोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान ग्रामदैवत श्री वेताळ महाराजांचा उत्सव विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावर्षी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तने, भजने, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर असे अखंड हरिनाम सप्ताह तसेच पालखी व काटी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 26 मार्च पर्यंत करण्यात आले असल्याचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज ढोरे यांनी कळविले आहे.
उत्सव समिती पुढीलप्रमाणे : अध्यक्ष -सचिन ढोरे, उपाध्यक्ष- लालिदास ढोरे, खजिनदार -राजेंद्र ढोरे, किरण पाले, सेक्रेटरी-राजेंद्र शितोळे, सुभाष ढोरे, शिवाजी ढोरे, कार्याध्यक्ष-जनार्धन पवार, प्रकाश ढोरे, चेतन ढोरे, क्रियाशील सदस्य- खंडूजी किसान ढोरे, अतुल ढोरे, गणेश सुभाष ढोरे, सनी पांडुरंग शितोळे, सतपाल ढोरे, गणेश ढोरे, सल्लागार - अशोक ढोरे-पाटील, विजय बाप्पू ढोरे, सिकंदर अण्णा पोंगडे, युवराजसिंह गायकवाड, राजू कड, चंद्रकांत ढोरे, गोटीराम ढमाले, बबन नथु ढोरे, वर्गणी प्रमुख-शाहरुख सय्यद, अजिंक्य सुभाष ढोरे, अभिजित गोवर्धन ढोरे, अमित रमेश ढोरे, प्रशांत ढोरे, अविनाश पोंगडे, राहुल माकर, भूषण हांडे, नितीन गोटे, अक्षय चव्हाण, सुनील बा. कांबळे, गणेश वाळुंज, भावड्या धापटे, मुकुंद शिंदे, ईश्वर पाटील, गणेश वाळुंज यांचा सहभाग आहे.

...Read More

V. S. News
बीजेनिमित्तविठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम 

+व्हीएस न्यूज - श्री तुकाराम महाराज बीजेनिमित्त येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच तुका झालासे कळस या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
बीजेनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात उद्योजक संतोष खांडगे यांचे हस्ते श्री पांडुरंगाची महापूजा आणि तुकाराम महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी काकड आरती, भजन आणि अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला. अभंगवाणी कार्यक्रमात संगीत विशारद हभप गणेश महाराज मोहिते यांना तुकाराम महाराजांचे अभंग सादर केले. हभप सुखदेव महाराज ठाकर यांनी निवेदन केले. तबल्याची साथ हभप गोरखनाथ कोकाटे, सचिन इंगळे यांनी प्रदीप कुडेकर, ओंकार मोहिते, सुबोध साठे, भाऊ हुलावळे यांनी संगीत साथ दिली. खांडगे यांचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हभप ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, सेवेकरी आप्पा शिरुरे, विठ्ठल दरेकर यांनी परिश्रम घेतले.

...Read More

V. S. News
अंगावर घाण पडल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

व्हीएस न्यूज - पिंपळे सौदागर येथे ज्येष्ठ नागरिकाला अंगावर घाण पडली आहे असे सांगून त्याचे लक्ष विचलित करत चोरट्याने 50 हजार रुपये असलेली पिशवी पळवून नेली. ही घटना शनिवारी पिंपळे सौदागर येथे घडली.
याबाबत पंढरीनाथ वाघ (वय 65, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघ हे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रोडवर असलेल्या चहाच्या टपरीजवळून पायी जात होते. अचानक एका अंदाजे 45 वर्षाच्या रंगाने सावळ्या, अंगावर निळी जीन्स व पांढरा टीशर्ट घातलेल्या एका इसमाने त्यांना थांबवले व वाघ यांना त्यांच्या अंगावर वरून घाण पडली असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित झाले. याचा फायदा घेऊन त्या इसमाने वाघ यांच्याकडे असलेली पिशवी हिसका देऊन पळवून नेली. पिशवीमध्ये 50 हजार रुपये रोख व महत्वाची कागदपत्रे होती.
फौजदार एम टी शिंदे अधिक तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
टाटा मोटर्सच्या पाच कामगारांचा पंतप्रधान श्रम पुरस्काराने गौरव

व्हीएस न्यूज - कंपनीच्या माध्यमातून काम करताना गुणवत्तेमध्ये सुधारणा, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता, उत्पादक वाढीसाठी प्रयत्न करणे आदी गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पंतप्रधान श्रम पुरस्काराने टाटा मोटर्समधील पाच कामगारांचा नुकताच दिल्ली येथे गौरव करण्यात आला.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे 26 जानेवारी रोजी भारताचे उपराष्ट्रपती वैकंय्या नायडु यांच्या हस्ते टाटा मोटर्समधील कर्मचारी राजेंद्र राजाराम निंबाळकर, राकेश भास्कर देशमुख, डॉ. वसंत गंगाधर भांदुर्गे, कैलास विठ्ठल माळी, मनोजकुमार विठ्ठल आणेकर यांना पंतप्रधान श्रम पुरस्कार व मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय श्रम रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार उपस्थित होते.

...Read More

V. S. News
भारत हा आर्थिक महासत्ता बनेल

व्हीस न्यूज - आपल्या देशात होणारे आर्थिक परिवर्तन पाहता 2030 पर्यंत भारत हा जगात आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास चिरुपल्ली येथील आय.आय. एमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी व्यक्त केला.
चऱ्होली येथील डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट व स्कूल ऑफ एमसीए आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त "समकालीन धोरण: जागतिक दृष्टिकोन" या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रसंगी केबांग्सन मलेशिया विद्यापीठाचे विशेष अतिथी डॉ. जॉन अंतोनी झेवियर, कॅनडा देशाचे डॉ कृष्ण लाल, श्रीलंकेचे डॉ अशोका जीनादासा व आरोषा जयसुंदरा, बांगलादेशाचे डॉ सैफुल मजीद, जाफना विद्यापीठ श्रीलंकेचे डॉ बी निमालाथासन, अन्नामलाई विद्यापीठ तामिळनाडूचे डॉ एस. पंचानाथम, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते.
डॉ. मेत्री पुढे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्पादनचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. देशातील काही उद्योग चुकीच्या धोरणामुळे लोप पावत आहे. अडचणीत सापडलेल्या उद्योजकांनी आत्मपरीक्षण करून विकास साधला पाहिजे.
जागतिक औद्योगिक क्रांतीचे चार टप्पे समजावून सांगत असताना डॉ कृष्णलाल, कॅनडा म्हणाले की सध्याची औद्योगिक क्रांती हि चौथी आहे. तसेच त्यांनी उद्योग व्यवसाय हा मानवी जीवनाशी व पारंपारिक अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. तसेच त्यांनी भारत व कॅनडा या देशाच्या अर्थव्यवस्थेची तुलना करताना म्हणाले की, कॅनडा मध्ये आरोग्यावर 10.9 टक्के तर शिक्षणावर 6 टक्के खर्च केला जातो व 12 वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. तसेच भारतामध्ये आरोग्यावर 4 टक्के तर शिक्षणावर 3 टक्के पेक्षाही कमी खर्च केला जातो.
कुलगुरू डॉ खेडकर म्हणाले की, औद्योगिक क्रांतीमुळे औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आले आहेत. परिणामी जागतिक स्पर्धा वाढली, नव्याने विकास क्षेत्र निर्माण झाले व कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले. तसेच देशाच्या आर्थिक विकासदरात वाढ झाली. औद्योगिक क्षेत्राचा विकास साधण्यासाठी कार्यक्षमता, लवचिकता, ध्येय, प्रतिभा, मूल्यसंवर्धन व शाश्वत या सहा सूत्रांचा वापर केला पाहिजे.
सूत्रसंचालन डॉ. श्रीकला बच्छाव तर आभार डॉ ओ पी हलदार यांनी मानले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!