व्हीएस न्यूज - राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका डॉ. कमरुन्निसा माजिद खान यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
करमरुन्निसा या राष्ट्रवादीकडून खराळवाडी येथून (2002 ते 2007) निवडून आल्या होत्या. तसेच त्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती देखील होत्या. त्यांचा नेहरुनगर येथील कबरस्तानात सोमवारी दफनविधी करण्यात आला.