+व्हीएस न्यूज - श्री तुकाराम महाराज बीजेनिमित्त येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच तुका झालासे कळस या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
बीजेनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात उद्योजक संतोष खांडगे यांचे हस्ते श्री पांडुरंगाची महापूजा आणि तुकाराम महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी काकड आरती, भजन आणि अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला. अभंगवाणी कार्यक्रमात संगीत विशारद हभप गणेश महाराज मोहिते यांना तुकाराम महाराजांचे अभंग सादर केले. हभप सुखदेव महाराज ठाकर यांनी निवेदन केले. तबल्याची साथ हभप गोरखनाथ कोकाटे, सचिन इंगळे यांनी प्रदीप कुडेकर, ओंकार मोहिते, सुबोध साठे, भाऊ हुलावळे यांनी संगीत साथ दिली. खांडगे यांचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हभप ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, सेवेकरी आप्पा शिरुरे, विठ्ठल दरेकर यांनी परिश्रम घेतले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002