व्हीस न्यूज - आपल्या देशात होणारे आर्थिक परिवर्तन पाहता 2030 पर्यंत भारत हा जगात आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास चिरुपल्ली येथील आय.आय. एमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी व्यक्त केला.
चऱ्होली येथील डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट व स्कूल ऑफ एमसीए आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त "समकालीन धोरण: जागतिक दृष्टिकोन" या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी केबांग्सन मलेशिया विद्यापीठाचे विशेष अतिथी डॉ. जॉन अंतोनी झेवियर, कॅनडा देशाचे डॉ कृष्ण लाल, श्रीलंकेचे डॉ अशोका जीनादासा व आरोषा जयसुंदरा, बांगलादेशाचे डॉ सैफुल मजीद, जाफना विद्यापीठ श्रीलंकेचे डॉ बी निमालाथासन, अन्नामलाई विद्यापीठ तामिळनाडूचे डॉ एस. पंचानाथम, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते.
डॉ. मेत्री पुढे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्पादनचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. देशातील काही उद्योग चुकीच्या धोरणामुळे लोप पावत आहे. अडचणीत सापडलेल्या उद्योजकांनी आत्मपरीक्षण करून विकास साधला पाहिजे.
जागतिक औद्योगिक क्रांतीचे चार टप्पे समजावून सांगत असताना डॉ कृष्णलाल, कॅनडा म्हणाले की सध्याची औद्योगिक क्रांती हि चौथी आहे. तसेच त्यांनी उद्योग व्यवसाय हा मानवी जीवनाशी व पारंपारिक अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. तसेच त्यांनी भारत व कॅनडा या देशाच्या अर्थव्यवस्थेची तुलना करताना म्हणाले की, कॅनडा मध्ये आरोग्यावर 10.9 टक्के तर शिक्षणावर 6 टक्के खर्च केला जातो व 12 वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. तसेच भारतामध्ये आरोग्यावर 4 टक्के तर शिक्षणावर 3 टक्के पेक्षाही कमी खर्च केला जातो.
कुलगुरू डॉ खेडकर म्हणाले की, औद्योगिक क्रांतीमुळे औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आले आहेत. परिणामी जागतिक स्पर्धा वाढली, नव्याने विकास क्षेत्र निर्माण झाले व कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले. तसेच देशाच्या आर्थिक विकासदरात वाढ झाली. औद्योगिक क्षेत्राचा विकास साधण्यासाठी कार्यक्षमता, लवचिकता, ध्येय, प्रतिभा, मूल्यसंवर्धन व शाश्वत या सहा सूत्रांचा वापर केला पाहिजे.
सूत्रसंचालन डॉ. श्रीकला बच्छाव तर आभार डॉ ओ पी हलदार यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002