व्हीएस न्यूज - मिळकत कराची थकबाकी ५ हजार रुपये पेक्षा अधिक असणाऱ्या मिळकतधारकांना नोटीसा बजाविल्यानंतरही सात दिवसांच्या आत मिळकत कराची रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे अशा १ लाख १३ हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतर मिळकतीवर जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत ३ जानेवारी अखेर ज्या मिळकतधारकांकडे ५ हजार रुपयेपेक्षा जास्त थकबाकी आहे. अशा १ लाख १३ हजार ३७२ मिळकत धारकांना मिळकत कर भरण्याच्या नोटीसा देण्यात येत आहेत. नोटीस बजावुनही मिळकत कराची थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास अशा थकबाकीधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
आजअखेर २ लाख ७८ हजार मिळकत धारकांनी ३८० कोटी ४३ लाख एवढा मिळकतकराचा भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख १८ मिळकत धारकांनी ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करून १३५ कोटी ६० लाख रुपये भरणा केला आहे. नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व कर संकलन विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत.
मिळकत करधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा उपयोग घेणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.
पिंपरी – महापालिका…
पिंपरी-चिंचवड शहरातील १ लाख १३ हजार मिळकतींना जप्तीची नोटीस
व्हीएस न्यूज - श्री गणेश प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील राजगुरव कॉलनीमधील श्री गणेश मंदिर प्रांगणात आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते उद्या (गुरुवार) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक गणेश खांडगे, संतोष शिंदे, नगरसेविका नीता काळोखे, काजल गटे, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे आदी उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे 'छत्रपती शिवाजी महाराज' हा विषय मांडतील. शुक्रवारी कीर्तनकार डॉ.जयंत करंदीकर 'सुखी जीवनाची गुरूकिल्ली' या विषयावर तर व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प शनिवारी ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन गुंफणार असून 'अशांत सीमा आणि अस्वस्थ भारत' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - महिलांना स्वतःमधल्या सुप्त गुणांची जाणीव व्हायला हवी. महिलांनी आणि पुरुषांनी बरोबरीने काम करुन आपली योग्यता सिद्ध करावी. आपण केलेलं चांगलं कार्य आपल्याला विकासाच्या पथावर घेऊन जातं. महिलांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरून रडत बसू नये. प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढत महिलांनी स्वतः मधे असणाऱ्या शक्तींना ओळखून आपल्या कार्यातून स्वतःला सिद्ध करावं. असे प्रतिपादन सुरेखा कटारिया यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात 'स्वयंसिद्धा प्रतिष्ठान' च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त 'एकाच या जन्मी जणू' या अतंर्गत 'स्त्री जाणीवा' या विषयावरील नृत्य, नाटक, पोवाडा व समुहगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कटारिया बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ कवयिञी अंजली कुलकर्णी तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी यांची होती. राज अहेरराव, राजेंद्र घावटे, नितिन हिरवे, कवी नंदकुमार मुरडे, आश्विनी बावीसकर, विजय जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खिवंसरा पाटील विद्यालयातील विद्यार्थींनीने माता भगिनींचा सन्मान व्हावा महत्व नारीच जाणून घ्यावा हे समुहगीत गायले. यावेळी समृद्धी ,सुर्वे मानसी चिटणीस, संयोगिता खुडे, आश्विनी मोरे, सरीता सावकर, दिपाली शिंदे, डॉ. नंदा हरम, मनीषा आवेकर, ज्योती सरदेसाई, सुनीता देशपांडे, राणी तांगडे यांच्यासह 70 महिलांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन नंदकुमार मुरडे, ज्ञानेश्वर भंडारे, मनिषा पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र काकंरिया यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन दिनेश भोसले यांनी तर आभार वर्षा बालगोपाल यांनी मानले.
व्हीएस न्यूज - दरवर्षीप्रमाणे डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी येथे दृष्टी 2018 हा वार्षीक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फुगे हवेत सोडून करण्यात आले. विदयार्थ्यांनी त्यांच्यातील विविध कलागुणांचे दर्शन या कार्यक्रमात उपस्थितांना घडवून आणले. गायन, विविध सांस्कृतीक तसेच पाश्चात्य नृत्यप्रकार, विविध नाटयप्रसंग या ठिकाणी विदयार्थ्यांनी सादर केले. तृतीय वर्षे बी.फार्मच्या मुलांनी सोशल ईलनेसफ या विषयावर सादर केलेला फॅशनशो कार्यक्रमाचे प्रमुख आर्कषण ठरला.तसेच द्वितीय वर्षे बी.फार्म मुलींनी सादर केलेल्या फॅशनशो च्या माध्यमातून त्यांनी स्त्री सुरक्षेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले. आधुनिकतेने भरलेल्या या कार्यक्रमात वैभव दाणी या विदयार्थ्याचा मराठी अभंग तसेच अभिलाषा हर्णे या विदयार्थीनीने प्रस्तुत केलेली शिवस्तुती आपली वेगळीच छाप सोडून गेली. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन अंतीम वर्षातील विदयार्थ्यांनी प्राचार्य डॉ.निरज व्यवहारे तसेच महाविदयालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मुकेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. अभिषेक स्वामी याने आभार मानले.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र शासन आणि स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 मार्च रोजी शहाजीराजे भोसले यांची 424 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खा. संभाजीराजे भोसले (कोल्हापूर घराणे), प्रिन्स ऑफ तंजावर म्हणजे तंजावर घराण्याचे राजे शिवाजीराजे भोसले आणि नागपूर घराण्याचे राजे राजे मुधोजी भोसले या राजघराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली वेरुळ येथे हा सोहळा संपन्न होत आहे, अशी माहिती शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विलास पांगारकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन गावंडे, शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजू सावळे, उद्भवराजे काळे, राजेंद्र चव्हाण, गणेश सोनवणे, सुमित टूमलाईत, सुनील सावंत, इम्रान शेख, सुमित लोहरे आदी उपस्थित होते. जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महात्मा गांधी मिशन ट्रस्टचे सचिव अंकुशरावजी कदम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रो कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर, औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा स्मारक नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष नवल किशोर राम, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा श्रीमती रेखा चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमस्थळी प्रसिद्ध शाहिर सुरेश जाधव यांचे शहाजीराजांच्या जीवन चरित्रावर पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी, शिवकालीन युद्धनिती आणि विविध हत्यारासहचे प्रात्यक्षित गोरक्षनाथ कुंडलवाल यांचे पथक साजरे करणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध व्याख्याते प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा जयंती उत्सव गेल्या पंधरा वर्षापासून अथक परिश्रम घेऊन जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण करीत आहेत. जयंती महोत्सव कार्यकारिणी जाहीर सन 2018-19 साठीची जयंती महोत्सव कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी जाहीर केली केली. अध्यक्षपदी विलास पांगारकर, उपाध्यक्षपदी राजेंद्र दाते पाटील, प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, चंद्रकांत भराट, रमेश केरे, रवींद्र काळे, सुरेश वाकडे, सुनील कोटकर, विलास चव्हाण, योगेश केवारे, विवेकानंद बाबर, ज्ञानेश्वर गायकवाड आदींचा समावेश आहे.
व्हीएस न्यूज - सत्तास्थान हे लोककल्याणाचा एक मार्ग आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपले काम लोकशाही पध्दतीने चालले आहे कि नाही, याचे कठोर आत्मपरिक्षण नित्य केले पाहिजे, असे लोककल्याणाला मार्गदर्शक ठरणारे विचार यशवंतराव चव्हाण यांचे होते. आज त्यांच्या विचारांचे सर्व सत्ताधाऱ्यांनी चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष साठे यांच्या हस्ते सोमवारी वल्लभनगर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सरचिटणीस सज्जी वर्की, हिरा जाधव, शोभा कोराटे, हुरबानो शेख, इर्शाद शेख, वसंत मोरे, मकर यादव, अनिरुध्द कांबळे, किसन भालेकर, सुनिल राऊत, तुषार पाटील, माधव पुरी, श्रीरंग सरपते आदी उपस्थित होते. साठे म्हणाले की, 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात जन्मलेले यशवंतराव चव्हाण हे उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी, अभ्यासू व्यक्तीमत्व, रसिक व साहित्यिक होते. युगांतर, सह्याद्रिचे वारे, कृष्णाकाठ, ऋणाबंध हे त्यांचे ग्रंथ आजही महाराष्ट्रातील अभ्यासकांना मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्राच्या औद्योगिकी करणाचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी उभारला. आज शेती आणि उद्योगात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे यांचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांचे आहे.
व्हीएस न्यूज - मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस गाडीच्या धकडेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडला. अपघातात ठार झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. तरुणाने अंगावर निळ्या पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. रंगाने सावळा, केस काळे आहेत. पोलीसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास एक 25 वर्षीय तरुण आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. मुंबईवरून पुण्याकडे जात असलेल्या डेक्कन एक्सप्रेसची धडक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - बॅंकेतून पैसे घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला खाली पैसे पडल्याचे सांगून दुचाकीच्या हॅन्डलला अडकवलेली 90 हजार रूपयांची पिशवी भामट्याने पळविली. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कासारवाडीतील युनियन बॅकेच्या बाहेर घडली. निलेश लांडे (वय-31, रा. गुळवे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडे यांनी सोमवारी कासारवाडीतील युनियन बॅकेतून 90 हजार 900 रूपये काढले होते. पैसे घेऊन दुचाकीवरून घऱी जात असताना एकाने पैसे खाली पडल्याचे त्यांना सांगितले. लांडे खाली पडलेले पैसे उचलत असताना दुचाकीच्या हॅन्डलला लावलेली पैशांची पिशवी पळवून नेली. फौजदार पी. आर. कठोरे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - घराकडे जाण्याच्या रस्त्यावर लावलेला टेम्पो काढण्यास सांगितल्यामुळे आठ जणांनी महिलेला शिवीगाळ करत दोन भावांना जबर मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडेसात वाजता चिखली येथे घडली. रविंद्र रोकडे (वय-40, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय उत्तम रोकडे याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी संजय रोकडे याने टेम्पो लावला होता. रस्त्यातील टेम्पो काढ, असे फिर्यादीच्या आईने आरोपीला सांगितले. यावरून चिडलेल्या आरोपींने महिलेला शिवीगाळ केली. इतर नातेवाईकांना बोलावून घेत फिर्यादाचा लहान भाऊ शैलेंद्र रोकडे याला लोखंडी गजाने डोक्यात, कपाळावर मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीलाही लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीचे वडील संपत रोकडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फौजदार भोये अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठाला भरवान खासगी बसने धडक दिल्याने ज्येष्ठाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता निगडीतील अंकुश चौकात घडली. मारूती अंबादास गायकवाड (वय-60, रा. नालंदा सोसायटी, निगडी) असे मृत्यू झालेल्या ज्य़ेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी बस चालक सुनिल किसन वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांचा जावई पापा पवार (वय-32) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूती गायकवाड सोमवारी दुपारी अंकुश चौकातून रस्ता ओलांडत होते. भरधाव आलेल्या खासगी बसने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. फौजदार मोरे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मित्रानेच दहावीतील मित्राची धारधार चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी निगडी, पूर्णानगर येथे मध्यरात्री बारा वाजता घडली आहे. वेदांत जयवंत भोसले (वय 15, रा. स्वामी विहार, बी वींग, पूर्णानगर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहन प्रदिप महाळगीकर (वय-18, रा. पुर्णानगर,चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वेदांतची आई जान्हवी जयवंत भोसले (वय-40) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वेदांत हा निगडी, यमुनानगर येथील अमृत माता विद्यालयात दहावीत शिकत होता. सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. तर आरोपी रोहन पिंपरी, वल्लभनगर येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्गात शिकत होता. वेदांत, रोहन यांची तीन वर्षापासून मैत्री होती. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीची परिक्षा सुरू असल्यामुळे वेदांत व त्याची मैत्रिण वेदांतच्या सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करत होते. अभ्यास झाल्यानंतर वेदांत मैत्रिणीला तिच्या घरी सोडविण्यासाठी दुचाकीवरून गेला. वेदांत व त्याच्या मैत्रिणीला घरी जाताना आरोपी रोहनने पाहिले. मैत्रिणीला सोडून वेदांत घरी जात होता. रस्त्यावर थांबलेल्या आरोपी रोहनने मला थोडे पुढे जायचे आहे. दुचाकीवरून मला सोडव, असे सांगितले. मोरया क्लासिक बिल्डींगसमोर आरोपी रोहनने वेदांतचा गळा चाकूने चिरला. दंडावर, कमरेवर चाकूने वार केल्याने वेदांत क्लासिक बिल्डींगच्या पायऱ्यावर निपचीत पडला. घाबरलेल्या आरोपीने घटनास्थळावरून धूम ठोकली. बराच वेळ झाला तरी वेदांत घरी आला नाही म्हणून त्याची आई वेदांतच्या मैत्रिणीच्या घरी निघाली होती. क्लासिक बिल्डींगच्या पायऱ्यावर वेदांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. त्यांनी त्वरीत वेदांतला महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात त्याला दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्यूज - नवीन आरटीओ कार्यालय आवारात पासिंगसाठी आलेल्या एका पीएमपीएमएल बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. स्वारगेट डेपोच्या आठ बस गाड्या आरटीओ पासिंगसाठी चिखली आरटीओ कार्यालयात आल्या होत्या. पाच गाड्यांची पासिंग झाली. (एमएच 14, सीडब्ल्यू 2008) ही बस पासिंगसाठी पुढे जात असताना अचानक इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याने बसच्या चालकाने तात्काळ बसमधील अग्निशमन उपकरणाचा वापर केला. मात्र, आग वाढल्याने चालकाने बसमधून उडी मारली. चालू बस मागच्या दिशेने गेली व एका भिंतीला फोडून खड्ड्यात घसरली. पिंपरी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये मोठे बसचे नुकसान झाले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002