व्हीएस न्यूज - घराकडे जाण्याच्या रस्त्यावर लावलेला टेम्पो काढण्यास सांगितल्यामुळे आठ जणांनी महिलेला शिवीगाळ करत दोन भावांना जबर मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडेसात वाजता चिखली येथे घडली.
रविंद्र रोकडे (वय-40, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय उत्तम रोकडे याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी संजय रोकडे याने टेम्पो लावला होता. रस्त्यातील टेम्पो काढ, असे फिर्यादीच्या आईने आरोपीला सांगितले. यावरून चिडलेल्या आरोपींने महिलेला शिवीगाळ केली. इतर नातेवाईकांना बोलावून घेत फिर्यादाचा लहान भाऊ शैलेंद्र रोकडे याला लोखंडी गजाने डोक्यात, कपाळावर मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीलाही लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीचे वडील संपत रोकडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
फौजदार भोये अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002