व्हीएस न्यूज - प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मित्रानेच दहावीतील मित्राची धारधार चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी निगडी, पूर्णानगर येथे मध्यरात्री बारा वाजता घडली आहे.
वेदांत जयवंत भोसले (वय 15, रा. स्वामी विहार, बी वींग, पूर्णानगर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहन प्रदिप महाळगीकर (वय-18, रा. पुर्णानगर,चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वेदांतची आई जान्हवी जयवंत भोसले (वय-40) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
वेदांत हा निगडी, यमुनानगर येथील अमृत माता विद्यालयात दहावीत शिकत होता. सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. तर आरोपी रोहन पिंपरी, वल्लभनगर येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्गात शिकत होता. वेदांत, रोहन यांची तीन वर्षापासून मैत्री होती.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीची परिक्षा सुरू असल्यामुळे वेदांत व त्याची मैत्रिण वेदांतच्या सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करत होते. अभ्यास झाल्यानंतर वेदांत मैत्रिणीला तिच्या घरी सोडविण्यासाठी दुचाकीवरून गेला. वेदांत व त्याच्या मैत्रिणीला घरी जाताना आरोपी रोहनने पाहिले. मैत्रिणीला सोडून वेदांत घरी जात होता. रस्त्यावर थांबलेल्या आरोपी रोहनने मला थोडे पुढे जायचे आहे. दुचाकीवरून मला सोडव, असे सांगितले. मोरया क्लासिक बिल्डींगसमोर आरोपी रोहनने वेदांतचा गळा चाकूने चिरला. दंडावर, कमरेवर चाकूने वार केल्याने वेदांत क्लासिक बिल्डींगच्या पायऱ्यावर निपचीत पडला. घाबरलेल्या आरोपीने घटनास्थळावरून धूम ठोकली. बराच वेळ झाला तरी वेदांत घरी आला नाही म्हणून त्याची आई वेदांतच्या मैत्रिणीच्या घरी निघाली होती. क्लासिक बिल्डींगच्या पायऱ्यावर वेदांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. त्यांनी त्वरीत वेदांतला महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात त्याला दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002