व्हीएस न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठाला भरवान खासगी बसने धडक दिल्याने ज्येष्ठाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता निगडीतील अंकुश चौकात घडली.
मारूती अंबादास गायकवाड (वय-60, रा. नालंदा सोसायटी, निगडी) असे मृत्यू झालेल्या ज्य़ेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी बस चालक सुनिल किसन वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांचा जावई पापा पवार (वय-32) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूती गायकवाड सोमवारी दुपारी अंकुश चौकातून रस्ता ओलांडत होते. भरधाव आलेल्या खासगी बसने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
फौजदार मोरे अधिक तपास करत आहेत.