व्हीएस न्यूज - नवीन आरटीओ कार्यालय आवारात पासिंगसाठी आलेल्या एका पीएमपीएमएल बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
स्वारगेट डेपोच्या आठ बस गाड्या आरटीओ पासिंगसाठी चिखली आरटीओ कार्यालयात आल्या होत्या. पाच गाड्यांची पासिंग झाली. (एमएच 14, सीडब्ल्यू 2008) ही बस पासिंगसाठी पुढे जात असताना अचानक इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याने बसच्या चालकाने तात्काळ बसमधील अग्निशमन उपकरणाचा वापर केला. मात्र, आग वाढल्याने चालकाने बसमधून उडी मारली. चालू बस मागच्या दिशेने गेली व एका भिंतीला फोडून खड्ड्यात घसरली. पिंपरी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये मोठे बसचे नुकसान झाले.