Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
सब डिलरकडून ग्राहकांची फसवणूक

व्हीएस न्यूज - रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 सीसी या बुलेटसाठी चिखली, पुर्णानगर येथील सब डिलर असणाऱ्या आधार इंडिया मोटर्स सर्व्हिसेसने पिंपरीतील एका ग्राहकाची 58हजार रूपये घेवून बुलेट न देता फसवणूक केली आहे.

याप्रकरणी शामलाल लालचंद भोजवाणी (रा. पिंपरी) यांनी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, भोजवाणी यांनी चिखली, पुर्णानगर येथील सब डिलर आधार इंडिया मोटर्स सर्व्हिसेसनेमध्ये 14 ऑक्टोबर 2017 रोजी रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 सीसी ही बुलेट बुकिंग केली. त्यावेळी त्यांनी 58 हजार 427 रूपये रोख दिले. तर 99 हजारांचे एल ऍण्ड टी फायनान्सकडून कर्ज घेतले. परंतू, सब डिलर आधार इंडिया मोटर्सने येरवडा येथील नामाकिंत मुख्य डिलरला बुलेटसाठी रोख पैसे न देता धनादेश दिला. तो धनादेश बाऊन्स झाल्याने भोजवानी यांना बुलेट मिळाली नाही. भोजवाणी यांच्या खात्यावरून एल ण्ड टी फायनान्सला 10हजार 974 रूपयांचे तीन हप्तेही भरले. यातून भोजवानी यांची एकूण 69 हजार 401 रूपयांची फसवणूक झाली आहे. आधार इंडिया मोटर्स सर्व्हिसेसचा मालक विक्रमकुमार सिंग हा फरार झाला आहे. यासंदर्भात भोजवाणी कुदळवाडी पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेले होते. तेथील पोलीसांनी भोजवाणी यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, विक्रमकुमार सिंग यांचा भोजवाणी यांनी मोबाईलवर मॅसेज आला असून 17 एप्रिल रोजी शिवाजीनगर न्यायालयात पैसे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

...Read More

V. S. News
भाई वैद्य यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांचे नेतृत्व हरपले

विविध संस्था संघटनांतर्फे श्रद्धांजली

व्हीएस न्यूज - राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांचे नेतृत्व हरपले, त्यांचा आधारवड गेला या शब्दात भाईंना श्रद्धांजली वाहण्यात आली .

कष्टकरी कामगार पंचायततर्फे पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा येथे गुरूवारी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्या वर्षा गुप्ते, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, समाजवादी कार्यकर्ते बी. आर. माडगूळकर, कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे आदींनी श्रद्धांजली वाहिली.

बाबा कांबळे म्हणाले की, सत्याग्रहाचे बाळकडू भाई वैद्य यांच्याकडून मिळाले घरकुलधारक, कष्टकरी, पथारीवाले, रिक्षाचालक यांच्या चळवळीस मार्गदर्शन करणारा नेता आपल्यातून गेला आहे.

नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, पत्रकार संघातर्फे 33 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते. या आयोजनात भाईंनी महत्वाची भूमिका बजावली तेव्हापासून भाईंशी स्नेह जुळला तो अखेरपर्यंत कायम राहिला असे सांगत भाईंच्या जाण्याने कष्टकऱ्यांच्या पाठीशी ताकद उभी करणारा, कार्यकर्त्यांना बळ देणारा, आयुष्यभर साधेपणा जपलेला लढवय्या नेता गमावल्याची भावना व्यक्त केली. चिन साठे म्हणाले की, भाईंचा जीवनप्रवास एक आदर्श आहे. राजकारण्यांची ढासळलेली नीतिमत्ता पाहता आज भाईंसारख्या नेत्यांची समाजाला गरज आहे. माडगूळकर म्हणाले की, समाजवाद कृतीत यावा, यासाठी भाई आयुष्यभर चंदनासारखे झिजले उभे जीवन कष्टकऱ्यांसाठी वेचले. यावेळी बळीराम काकडे, रमेश शिंदे, धर्मराज जगताप, मल्हार काळे, संभाजी गोरे, विजय ओव्हाळ, आशा कांबळे, नरेंद्र बनसोडे, शोभा शिंदे, हिरा जादव, रवी शेलार आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
सध्या श्यामची आई दिसत नाही - कोकाटे

व्हीएस न्यूज - सध्या श्यामची आई दिसत नाही, त्यामुळे श्यामही दिसत नाही. पुर्वीची आई भोळी भाबडी, अशिक्षित होती. पण ती प्रेमाचा सागर होती. सध्याची आई स्मार्ट, सुशिक्षित आणि पगारदार आहे. तिचा पोषाख पूर्णपणे आधुनिक असल्याचे मत भाऊसाहेब कोकाटे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. मोरवाडी म्हाडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. महात्मा गांधीच्या प्रतिमेस माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बी.आर. माडगूळकर, तात्यासाहेब सपकाळ आदी उपस्थित होते.

माणसाच्या जीवनात आईचे महत्व अपूर्व आहे. ईश्वराला सर्व घरात पोहचता येणार नाही म्हणून त्याने घरा-घरात आई निर्माण केली आहे. आई ही ईश्वराचे स्वरूप आहे, असे मत माडगूळकर यांनी व्यक्त केले. यावेळी थोर समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पंडीत भोसले यांनी सुत्रसंचालन केले. उल्हास झिरपे यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
भाजपच्या 'घर चलो' अभियानास चिंचवड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

व्हीएस न्यूज - चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 19 भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शितल शिंदे यांच्या वतीने 'घर चलो' अभियान राबविण्यात आले. प्रभागातील नागरिकांचा या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शितल शिंदे, शहर कार्यकारणी सदस्य बिभीषण चौधरी, प्रमोद ननावरे, हेमंत ननावरे, संतोष शिंदे, चैत्यन्य आहेर, अभिजित डागलीया, अनिरुद्ध संकपाळ, निलेश देवधरे, विशाल कुलकर्णी, श्रीनिवास रेड्डी, संजय अरबूज, विलास वैद्य, भाई राऊत, अशोक ब्यानर्जी, विकास पिल्ले, किशोर शिंदे आदी कार्यकर्तेउपस्थित होते.

नगरसेवक शिंदे म्हणाले की, शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांचे गट तयार करून नागरिकांना जस्तीत जास्त लाभ कसा मिळेल, याची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच अभियानाच्या दरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहोत. भाजप घर चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचे तसेच सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे

...Read More

V. S. News
पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल; तीन जण गंभीर जखमी

व्हीएस न्यूज – देहुरोड येथे पीएमपीएमएल बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने रस्त्यावरील चार वाहनांना धडक दिली. या घटनेती तीन जण गंभीर असून दोघे किरकोळ जखमी आहेत. हा अपघात दुपारी बाराच्या सुमारास झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी-वडगाव बस क्रमांक 305 (एम एच 12 ई क्यू 3190) देहूरोड येथे ओव्हर ब्रिज जवळ आली. यावेळी बसचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यावरील तीन दुचाकी आणि एका मोटारीला धडक दिली. धडक दिलेल्या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोघांना किरकोळ मार लागला असून जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने बसमधील प्रवासी सुखरूप असून मोठी दुर्घटना टळली. अपघातामुळे निगडीकडून देहूरोडकडे जाणाऱ्या मार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून वाहतुक विस्कळीत झाली होती.

...Read More

V. S. News
निगडीत तरुणीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी

व्हीएस न्यूज - तरुणीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार निगडी परिसरात सोमवारी रात्री घडला. याबाबत एका 18 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्याततक्रार दाखल केली आहे. यावरून राजेंद्र सुरेश पवार (वय 19, रा. ओटा स्कीम, निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घरातील सामान आणण्यासाठी बाजारात गेली. राजेंद्र याने तिचा पाठलाग करून तिला ओटा स्कीम येथील स्मशानभूमीजवळ बोलावले. तरुणी स्मशानभूमीजवळ गेली असता, तू मला आवडतेस, चल गाडीवर बस आपण पळून जाऊ. असे म्हणत तिच्या अंगावर हात टाकला. घडलेल्या प्रकाराला तरुणीने नकारदेत घरी सांगेन असे म्हणाली. यावरून राजेंद्र याने कोणाला काही सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
निगडीत आठ लाखांची घरफोडी

व्हीएस न्यूज - बंद बंगल्याचे कुलूप उचकटून चोरट्यांनी घरातील कपाटातून 8 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना 24 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान निगडी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी, राजकुमार मित्तल (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हे आपल्या परिवारासह 24 मार्चला घरगुती कामासाठी बाहेरगावी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील 8 लाख 23 हजार रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले. मित्तल मंगळवारी गावावरून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
नागपूर - पुणे मेट्रो प्रकल्पासाठी भरगोस निधी

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरतुद करून दोन्ही प्रकल्पाला गती प्रदान करण्यास महत्वाची भूमिका केंद्र सरकारने निभावली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी रुपयाची तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पातुन जाहीर केली आहे. दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी एकंदरीत २८२९ कोटी रुपये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे.

याआधी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ३१० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मागील आर्थिक वर्षात नागपूर मेट्रो प्रकल्पाकरिता २६० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता ११० कोटी रुपय मंजूर करण्यात आले होते. एकंदरीत मागील वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात राज्य सरकारने दोन्ही प्रकल्पाना मिळून ७० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला आहे.

नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या १५०७ कोटी रुपयापैकी २७९ कोटी रुपये इक्विटी अंतर्गत, १८५ कोटी रुपये सबोर्डिनेटेड डेट (एसडी) केंद्र सरकार तर्फे लावलेल्या कर्जाच्या निमित्ताने आणि उरलेली १०४३ कोटी रुपये केएफडब्ल्यू आणि एएफडी तर्फे कर्जस्वरूपात प्राप्त होतील. तसेच पुणे मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या १३२२ कोटी रुपयापैकी २५० कोटी रुपये इक्विटी अंतर्गत, १६९ कोटी रुपये सबोर्डिनेटेड डेट (एसडी)- केंद्र सरकार तर्फे लावलेल्या कर्जाच्या निमित्याने आणि उरलेली ९०३ कोटी रुपये ओव्हर सिझ डेव्हलपमेंट असिस्टंस (ओडीए) कर्जस्वरूपात मिळतील.

गेल्या वर्षी २०१८-१९ या आर्थिक वर्षात सादर झालेल्या अर्थ संकल्पात नागपूर आणि पुणे अश्या दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १३५० आणि ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तर यंदाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थ संकल्पात नागपूर आणि पुणे अश्या दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १५७ कोटी आणि ८२२ कोटी रुपयांची वाढीव तरतूद केली आहे.

...Read More

V. S. News
भाजपा - सेनेच्या चुकीच्या धोरणांना तीव्र विरोध करु - विशाल वाकडकर

व्हीएस न्यूज - लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील शेतकरी, कामगार, महिला व युवकांना उज्ज्वल भविष्य आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा देशात प्रथम क्रमांकावर येईल. असा विश्वास युवकांमध्ये निर्माण झाल्याने पिंपरी चिंचवड मधील युवा सेनेच्या शंभराहून जास्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. अशी माहिती राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल शंकर वाकडकर यांच्या अभिष्टचिंतन मेळाव्यात मंगळवारी (दि. 3 एप्रिल) वाकड येथे झालेल्या कार्यक्रमात युवा सैनिकांनी प्रवेश केला. यावेळी वाकडकर यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात भोसरी आणि चिंचवड येथे होणा-या हल्लाबोल आंदोलनात भाजपा, सेना, मनसे आणि आरपीआय मधील हजारों कार्यकर्ते, महिला व पदाधिकारी लोकनेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. आगामी काळात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने राज्यात राबविलेली चुकीच्या धोरणांना तीव्र विरोध करु. तसेच पिंपरी चिंचवड मधील अन्यायकारक शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, चोविसतास पाणीपुरवठा, कचरा डेपो समस्या, शहरात घटणारे रोजगारांचे प्रमाण आदी प्रश्नांवर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांचे वाकडकर यांनी श्रीफळ देऊन स्वागत केले. यामध्ये युवा सेना पिंपरी चिंचवडचे सरचिटणीस पंकज चोपदार, उपाध्यक्ष शुभम काळे, उपाध्यक्ष कुणाल रावडे, सरचिटणीस सुरज उंबरकर, सांगवी प्रभागमधील विरेंद्र हेगडे, कुणाल वाघमारे, हर्षद म्हेत्रे, शेखर स्वामी,ऐश्वर्या देशपांडे तसेच डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयातील युवा सेनेच्या पदाधिका-यांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप लाला चिंचवडे, उपाध्यक्ष विशाल पवार, मयूर जाधव, सरचिटणीस चैतन्य चोरडीया, सतीश कोकाटे, योगेश मोरे, अमेय नेरूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
टोळक्याची जबर मारहाण 

व्हीएस न्युज-दुचाकीवरून दोन महिला कामगारांना घेवून जाताना तरूणाकडे दोघांनी रागाने बघितले. याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरूणाला आठ जणाच्या टोळक्याने शिवीगाळ, आरडा-ओरड करत लाकडी दांडक्याने, लोखंडी कोयत्याने मनगटावर, हातावर, डोक्यावर वार केले. हा प्रकार 28 मार्च रोजी नेरेगाव येथे घडला. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून सात जण फरार आहेत. अभिषेक चंदन (वय-19, रा. नेरेगांव, मुळशी) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. तुषार महादू बादकर (वय-23,रा. कासारमाई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार फरार आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक नेरेतील एका कंपनीत पेंट्री बॉय म्हणून कामाला आहे. 28 मार्च रोजी तो दुचाकीवरून दोन महिला कामगारांना घेवून जात होता. आरोपी प्रतिकेश व कुणाल याने अभिषेककडे रागाने बघितले. याचा जाब विचारण्यासाठी अभिषेक मित्रासह गेला असता त्याला आरोपींनी शिवीगाळ, आरडा-ओरड करत लाकडी दांडक्याने, लोखंडी कोयत्याने मनगटावर, हातावर व डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. फौजदार न्यामणे अधिक तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!