व्हीएस न्यूज – देहुरोड येथेपीएमपीएमएल बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने रस्त्यावरील चार वाहनांना धडक दिली. या घटनेती तीन जण गंभीर असून दोघे किरकोळ जखमी आहेत. हा अपघात दुपारी बाराच्या सुमारास झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी-वडगाव बस क्रमांक 305 (एम एच 12 ई क्यू 3190) देहूरोड येथे ओव्हर ब्रिज जवळ आली. यावेळी बसचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यावरील तीन दुचाकी आणि एका मोटारीला धडक दिली. धडक दिलेल्या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोघांना किरकोळ मार लागला असून जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने बसमधील प्रवासी सुखरूप असून मोठी दुर्घटना टळली. अपघातामुळे निगडीकडून देहूरोडकडे जाणाऱ्या मार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून वाहतुक विस्कळीत झाली होती.