व्हीएस न्यूज - रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 सीसी या बुलेटसाठी चिखली, पुर्णानगर येथील सब डिलर असणाऱ्या आधार इंडिया मोटर्स सर्व्हिसेसने पिंपरीतील एका ग्राहकाची 58हजार रूपये घेवून बुलेट न देता फसवणूक केली आहे.
याप्रकरणी शामलाल लालचंद भोजवाणी (रा. पिंपरी) यांनी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, भोजवाणी यांनी चिखली, पुर्णानगर येथील सब डिलर आधार इंडिया मोटर्स सर्व्हिसेसनेमध्ये 14 ऑक्टोबर 2017 रोजी रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 सीसी ही बुलेट बुकिंग केली. त्यावेळी त्यांनी 58 हजार 427 रूपये रोख दिले. तर 99 हजारांचे एल ऍण्ड टी फायनान्सकडून कर्ज घेतले. परंतू, सब डिलर आधार इंडिया मोटर्सने येरवडा येथील नामाकिंत मुख्य डिलरला बुलेटसाठी रोख पैसे न देता धनादेश दिला. तो धनादेश बाऊन्स झाल्याने भोजवानी यांना बुलेट मिळाली नाही. भोजवाणी यांच्या खात्यावरून एल ॲण्ड टी फायनान्सला 10हजार 974 रूपयांचे तीन हप्तेही भरले. यातून भोजवानी यांची एकूण 69 हजार 401 रूपयांची फसवणूक झाली आहे. आधार इंडिया मोटर्स सर्व्हिसेसचा मालक विक्रमकुमार सिंग हा फरार झाला आहे. यासंदर्भात भोजवाणी कुदळवाडी पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेले होते. तेथील पोलीसांनी भोजवाणी यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, विक्रमकुमार सिंग यांचा भोजवाणी यांनी मोबाईलवर मॅसेज आला असून 17 एप्रिल रोजी शिवाजीनगर न्यायालयात पैसे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002